Total Pageviews

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत- मृद आरोग्य व सुपिकता (जमीन आरोग्य पत्रिका व व्यवस्थापन कार्यक्रम) सन २०२२-२३

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत-

मृद आरोग्य व सुपिकता (जमीन आरोग्य पत्रिका व व्यवस्थापन कार्यक्रम) सन  2022-23 


योजनेची माहिती-

 

राष्ट्रिय शाश्वत शेती अभियान अंतर्गत मृद आरोग्य पत्रिका ही योजना सन २०१५-१६ पासून राबविण्यात येत आहे. सदर योजना सन २०२२-२३ मध्ये राष्ट्रिय कृषी विकास योजने अंतर्गत राबविण्यात येत आहे. योजना राबविण्याकरिता केंद्र शासनाचा 60 टक्के आणि राज्य शासनाचा 40 टक्के आर्थिक सहभाग आहे.

या योजने अंतर्गत प्रत्येक तालुक्यात किमान 6 गावे  निवडली जातात. व प्रत्येक गावातून किमान 90 मृद नमुने काढुन त्याच्या जमीन आरोग्य पत्रिका शेतकरी यांना देण्यात येतात.


तसेच निवडलेल्या गावात प्रती तालुका 2 हेक्टर क्षेत्रावर जमीन आरोग्य पत्रिकेच्या आधारे कमतरता असलेल्या सूक्ष्म मुलद्रव्य युक्त खतांच्या वापराबाबत प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येते. यासाठीजिल्हा स्तरावर निश्चीत केलेल्या खतमात्रेनुसार संबंधीत शेतकरी त्यांना लागणारे सूक्ष्म मुलद्रव्ययुक्त खत खरेदी खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीनुसार स्वत: करु शकतात. तसेच यासाठी त्यंना प्रती हेक्टर 500 रु. अर्थसाह्य दिले जाते. प्रात्यक्षिकाच्या सलग 1 हेक्टर क्षेत्रासाठी एकापेक्षा जास्त शेतकरी सहभागी होवू शकतात. निवड क्षेत्र 1 हेक्टर पेक्षा कमी असेल तर क्षेत्राच्या प्रमाणात अनुदानाचे वाटप करण्यात येते. तालुका कृषी अधिकारी डीबीटी द्वारे अनुदान शेतकरी यांना बैंक खात्यावर वितरित करतात.


जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकरी यांना त्यांच्या शेतजमिनिची रासायनीक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी, सूक्ष्म मुलद्रव्यांची कमतरता स्थिती व त्यानुसार पिकांना दयावयाच्या खत मात्रेची माहिती  प्रात्यक्षिक व प्रशिक्षण यामधून मिळते.


योजनेचे ऊद्देश-

 

1.रासायनीक खतांचा अनिर्बंध वापर कमी करुन मृदा तपासणीवर आधारीत, अन्नद्रव्यांच्या कमतरते नुसार खतांच्या संतुलीत आणि कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देउन उत्पादन खर्चात बचत करणे..

2.मृदा आरोग्य सुधारण्यासाठी तसेच अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रीय खते, गांडू ळ खत, निंबोळी/सल्फर आच्छ्यादीत युरिया सारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणारे खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे.

3.एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापना द्वारे पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे.

4. शेतकरी यांना जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आनुषंगिक विषयावरील प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणे.



प्रत्येक तालुक्यातुन किमान 6 गावे निवड करण्यासाठी प्राधान्यक्रम-


1) तालुक्यातील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी असलेली गावांची निवड प्राधान्याने करावी. त्याचप्रमाणे सूक्ष्म मुलद्रव्यांची कमतरता असलेली गावे निवडावीत.तसेच जमीन सुपिकता निर्देशांका नुसार अन्नद्रव्य कमतरता असलेली गावे, समस्या ग्रस्त जमिनिची गावे. याकरीता http://mrsac.maharashtra.gov.in/MahaAgritech या वेबसाईट वर soil health card module चा वापर करावा. सदर मोडुल मध्ये तालुकानिहाय अन्नद्रव्यनिहाय जमीन सुपिकता नकाशे उपलब्ध आहेत.

2)  मुख्य पिकांचे सरासरी उत्पन्न हे तालुक्याच्या/जिल्ह्याच्या सरासरी पेक्षा कमी असलेली गावे.

3) सन 2019-20 मध्ये मॉडेल व्हिलेज कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या गावाची व सन 2020-21 मध्ये जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रमात निवड केलेल्या गावांची पुन्हा निवड करु नये.


एका गावातून किती मृद नमुने काढण्यात येतात व कोणते घटक तपासण्यात येतात-

 

एका गावात किमान 90 नमुने कृषी सहाय्यक यांचे मार्फत काढण्यात. सदर नमुन्यांची 12 घटकांसाठी प्रयोगशाळेत तपासणी होते (जमिनीचा सामू ph, क्षारताEC, सेंद्रीय कर्ब(OC), उपलब्ध नत्र(N), उपलब्ध स्फुरद(P), उपलब्ध पालाश(K), गंधक(S), लोह(Fe), मंगल(Mn), बोरॉन(B),  उपलब्ध जस्त(ZN), तांबे(Cu).)

मृद नमुने प्रयोगशाळेस प्राप्त झाल्यानंतर मृद नमुन्यांची नोंदणी केंद्र शासनाच्या https://www.soilhealth.dac.gov.in या वेबसाईट वर करण्यात येते.  तसेच मृद विश्लेषणाचे काम पुर्ण झालेवर सदर वेबसाईटवर निष्कर्ष भरुन रंगीत जमीन आरोग्य पत्रिका विहित नमुन्यात १०० जीएसएम पेपरवर प्रिंट करुन क्षेत्रीय पातळीवरील यंत्रणेमार्फत शेतकरी यांना मार्गदर्शनासह वितरित करण्यात येते. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंचायत राज/ग्रामपंचायत संस्थेचा सहभाग घेणे आवश्यक आहे.


एका नमुन्यासाठी खर्चाचा मापदंड काय आहे-


केंद्र शासनाने मृद नमुना विश्लेषण व जमीन आरोग्य पत्रिका वितरण यासाठी प्रती नमुना रु.300 याप्रमाणे खालीलप्रमाणे मापदंड निश्चीत केलेला आहे.

1.मृद नमुना काढणे, नमुना पिशवी(कापडी), नमुना चिठ्ठी, वाहतुक व जमीन आरोग्य पत्रिका वितरण यासाठी रु.40 ची तरतूद आहे.

2. मृद नमुना विश्लेषण, विश्लेषणाचे निष्कर्ष संगणक प्रणालीवर अपलोड करणे, रंगीत जमीन आरोग्य पत्रिका तयार करणे,प्रयोगशाळा व्यवस्थापन , आवश्यक रसायने, कंत्राटी कर्मचारी यांचे मानधन व इतर अनुषंगिक  बाबीसाठी प्रती नमुना रु.260 ची तरतुद आहे.

 


अधिक माहिती साठी मार्गदर्शक सूचना दि.१२ मे २०२२

 

सूक्ष्म मुलद्रव्ययुक्त खत वापरास प्रोत्साहन प्रात्यक्षीके सुचना दि. 11.11.2022




------------------------------------------------------------------