Total Pageviews

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

 *शरद पवार ग्रामसमृद्धी योजना*


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत काही योजनांच्या संयोजनातून सदर योजना राज्य योजना म्हणुन राबविण्यात येत आहे.


या योजनेत कोणती कामे घेण्यात येतात-

1. गाय व म्हैस यांच्या करिता पक्का गोठा बांधणे 

2. शेळी पालन शेड बांधणे 

3. कुक्कुटपालन शेड बांधणे 

4. भू-संजीवणी नाडेप कंपोस्टींग 


या बाबींचा लाभ घेण्या साठी अनुदान किती आहे-


1.गाय व म्हैस यांच्या करिता पक्का गोठा बांधणे साठी-

2 ते 6 गुरांसाठी एक गोठा - रु.77188/-. 

6 पेक्षा जास्त गुरे असतील तर दोन गोठेसाठी - रु. 154376/-

12 पेक्षा जास्त गुरे असतील तर तीन गोठ्यांसाठी- रु. 231564/-.


2. शेळी पालन शेड बांधणे साठी- 

2 ते 10 शेळ्यांसाठी एक शेड - रु.49284/-. 

20 पेक्षा जास्त शेळ्या असतील तर दोन शेडसाठी - रु. 98568/-

30 पेक्षा जास्त शेळ्या असतील तर तीन शेडसाठी- रु. 147852/-


3. कुक्कुटपालन शेड बांधणे साठी- 100 पक्ष्यांसाठी एक शेड रु. 49760/-

150पेक्षा जास्त पक्षांसाठी दोन शेड साठी- रु. 99520/-


4. भू-संजीवणी नाडेप कंपोस्टींग यूनिट बांधणे साठी- रु.10537/-



या योजनेचा लाभ कुणाला मिळेल-

मनरेगाच्या निकषानुसार स्वतःची जमीन तसेच वैयक्तीक लाभाच्या निकषा नुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी.

तसेच शेळीपालन शेड आणि कुक्कुट पालन शेड साठी भुमीहीन कुटुंबांना सुद्धा लाभ देण्यात येईल.



शेड बांधकाम किती आकारमानाचे असावे-

1. गाय व म्हैस यांच्या करिता पक्का गोठा बांधणे साठी 6 जनावरां करीता 26.95 चौ.मी. 

गोठा लांबी- 7.7 मी. आणि रुंदी- 3.5 मी.

गव्हाण- 7.7 मी x 0.2 मी. X 0.65 मी.

तसेच 250 ली.क्षमतेचे मुत्रसंचय टाके आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची 200 ली.क्षमतेची टाकी सुद्धा बांधण्यात यावी.


2. शेळी पालन शेड बांधणेसाठी 10 शेळ्यांसाठी 7.50 चौ.मी. ( लांबी- 3.75 मी, रुंदी- 2 मी.)


3. कुक्कुटपालन शेड बांधणे साठी- 100 पक्षांकरीता 7.50 चौ.मी. (लांबी- 3.75 मी, रुंदी- 2 मी.)


4. भू-संजीवणी नाडेप कंपोस्टींग साठी-

जमिनी वरील बांधकाम 3.6 मी. x 1.5 मी. x 0.9 मी.


अर्ज कुठे करावा- 

ग्रामपंचायती मध्ये.


अधिक माहितीसाठी शासन निर्णय दि. 3 फेब्रुवारी 2021-