Total Pageviews

हरभरा व गहू प्रमाणित बियाण्याकरिता ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम २०२०-२१

राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत 

बियाणे लागवड व साहित्य उपअभियान 

हरभरा व गहू प्रमाणित बियाण्याकरिता 

ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम २०२१-२२


योजना कोणत्या विभागामार्फत  राबवली जाते  -


महाबीज व कृषी विभाग 


योजनेची माहिती -



शेतकरी यांना गहू व हरभरा बियाण्याचे प्रमाणित  बियाणे अनुदानावर मिळते. 

या शेतकऱयांना महाबीज मार्फत बीजोत्पादन कार्यक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते. 

सर्व तांत्रिक बाबींची  काळजी घेऊन यापासून उत्पादित होणारे बियाणे शेतकरी यांनी योग्य रीतीने जातं करून पुढील दोन हंगामापर्यंत स्वतः साठी व उर्वरित बियाणे आजूबाजूचे शेतकरी यांना पेरणीसाठी देणे आवश्यक आहे. 

परंतु तीन हंगामानंतर शेतकरी यांनी बियाणे बदल करणे आवश्यक आहे. 

 




योजनेत शेतकरी यांना काय लाभ मिळतो -


शेतकरी यांना गहू व हरभरा बियाण्याचे प्रमाणित बियाणे अनुदानावर मिळते. 

हरभरा बियाण्यासाठी रु. २५ प्रति किलो इतके अनुदान तर गहू बियाण्यासाठी रु. १६ प्रति किलो इतके अनुदान. 

लाभार्थी शेतकरी अनुदान वगळता उर्वरित बियाण्याची रक्कम भरून महाबीज चे तालुक्यातील अधिकृत विक्रेते यांचेकडून बियाणे उचल करतील. 

 


लाभार्थी निवड-

सन 2021-22 पासून सदर योजना केंद्रीभूत दृष्टीकोन स्वरुपात राबवण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षाकरीता तालुक्यातील प्रती वर्ष १/३ गावांची निवड करुन या गावांमधील लाभार्थी निवड करण्यात येणार आहे.



बियाणे कसे आणि कोठे मिळेल-



बियाणे परमिट वर मिळेल. बियाणे हे तालुक्यातील महाबीज च्या अधिकृत विक्रेते  कृषी केंद्रात मिळेल.


बियाणे परमिटची छपाई करून परमिटचा पुरवठा महाबीज कडून कृषी विभागास करण्यात येईल. परमिट चे वाटप कृषी विभागामार्फत करण्यात येते.  


कोणते बियाणे मिळणार-


हरभरा व गहू



हरभरा - 



वाण         पॅकिंग साईझ (किलो)    किंमत(रु.)     अनुदान (रु.)           अनुदानित किंमत(रु.) 



जॅकी-९२१८          30            2400        750                      1650

                                            


गहू-


वाण -


एकेए -४६२७ ‘ फुले नेत्रावती (NIAW-1415), एमएसीएस-6478, युएएस-           

४२८, फुले समाधान, पीडीकेव्ही -सरदार,लोक-१.

GW-496, एचडी-२१८९, एमएसीएस-६२२२,NIAW-301, एचआय-१५४४, 

एचआय-८६६३,


वाण                     पॅकिंग साईझ (किलो)    किंमत(रु.)     अनुदान (रु.)           अनुदानित किंमत(रु.) 



10 वर्षाआतील वाण -      40                    1560                  640                      920



10 वर्षावरील वाण -      40                    1480                    640                      840


HD-2189          40                    1600                    640                    960

   

 

शेतकऱ्यांना किती बियाणे मिळेल-



एक एकर क्षेत्र मर्यादे पर्यंत . ( हरभरा 30 किलो) (गहू -४० किलो)



अर्ज कुठे करावा-

महाडीबिटी वर https://mahadbtmahait.gov.in 

अर्ज करण्याची अंतीम तारीख- 25 सप्टेंबर 2021

ऑनलाईन अर्ज कमी आल्यास ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेण्यात येतील.

 

आवश्यक कागदपत्रे-

७/१२ व आधार कार्ड, मोबाईल नंबर

 

संपर्क-


महाबीज कार्यालय 

कृषी विभाग कार्यालये 

 

मार्गदर्शक सूचना २०२१-२२ दि १५-९-२०२१ 

 

मार्गदर्शक सूचना 2021-22 दि. २९-९-२०२१

 

पत्र दि ३०-९-२०२१