Total Pageviews

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा -आत्मा


Agriculture Technology Management Agency (ATMA)
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)

शेतकरी यांना विस्तार विषयक सेवा पुरविण्यासाठी आत्मा ही जिल्हास्तरावरील एक नोंदणीकृत स्वायत्त संस्था आहे.

सर्वसाधारण धोरणात्मक निर्देश देण्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील आत्मा नियामक मंडळ ही 
आत्मा ची जिल्हास्तरावरील सर्वोच्च समिती आहे. या योजनेची जिल्हा स्तरावर दैनंदिन अंमल बजावणी करण्यासाठी 
आत्मा कार्यकारी समिती असते. या योजनेचे नियोजन व अंमलबजावणी याबाबत शेतकरी यांची मते जाणुन घेण्यासाठी 
जिल्ह्यातील शेतकरी सदस्य असलेली जिल्हास्तरीय शेतकरी सल्लागार समिती असते. जिल्ह्याचा धोरणात्मक संशोधन व
विस्तार आराखडा केला जातो. तालुका स्तरावर तालुका तंत्रज्ञान चमू (Block Technology Team- BTT) ज्यामध्ये कृषी व 
संलग्न विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी असतात तसेच तालुका शेतकरी सल्लागार समिती 
(Block Farmers' Advisory Committee- BFAC) ज्यामध्ये तालुक्यातील निवडक शेतकरी सदस्य असतात.
या दोन्ही समिती तालुक्याचा तालुका कृती आराखडा (Block Action Plan- BAP) तयार करतात तसेच तालुक्यातील 
शेतकरी यांना विस्तार विषयक सेवा पुरवतात.गाव स्तरावार दोन गावां साठी एक शेतकरी मित्र नेमण्यात येतो. हा 
शेतकरी मित्र म्हणजे विस्तार यंत्रणा व शेतकरी यांचेमधील एक दुवा असतो.

आत्मा अंतर्गत खालील बाबी राबविण्यात येतात.

B.जिल्हा स्तरावरील बाबी

I .शेतकरी यांचेसाठीचे घटक

B1- धोरणात्मक संशोधन व विस्तार आराखडा तयार करणे/दुरुस्ती करणे-

प्रती जिल्हा यासाठी रु.2.50 लाख इतकी तरतूद असते. हा 5 वर्षात एकदा केला जातो.

B2. शेतकरी प्रशिक्षण-

a.आंतर राज्य शेतकरी प्रशिक्षण-
यासाठी प्रती शेतकरी प्रती दिन रु.१५००/- इतके अर्थ सहाय्य शेतकरी यांना देण्यात येते.

b.राज्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण-
यासाठी प्रती शेतकरी प्रती दिन रु.१२५०/- इतके अर्थ सहाय्य शेतकरी यांना देण्यात येते.

c. जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण-
निवासी शेतकरी प्रशिक्षण यासाठी प्रती शेतकरी प्रती दिन रु.५००/- इतके अर्थ सहाय्य शेतकरी यांना देण्यात येते.

d. ग्रामीण युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण-
हे २५ दिवसांचे प्रशिक्षण असते. प्रति लाभार्थी प्रति दिन ५०० रु. इतकी तरतूद असते.

B3. प्रात्यक्षिके आयोजित करणे-

a. कृषी विषयक प्रात्यक्षिके-
0.40 हे क्षेत्रावरील प्रात्यक्षिकासाठी रु.६०००- इतके अर्थसहाय्य देण्यात येते.

b. कृषी संलग्न क्षेत्राची प्रात्यक्षिके-
यासाठी ही रु.६०००/- इतके अर्थ साह्य शेतकरी यांना देण्यात येते.

B4. शेतकरी अभ्यास दौरे-

a.आंतर राज्य अभ्यास दौरे-

शेतकरी यांना राज्याबाहेर सुरु असणारे कृषी विषयक नव नविन तंत्रज्ञान, संशोधन याबाबतची माहिती मिळावी 

व शेतकरी यांनी आपल्या शेतात या संशोधनाचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,शेतकरी सक्षम बनावेत आणि तंत्रज्ञान 
प्रसारामध्ये त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने राज्याबाहेर शेतकरी अभ्यास दौरे आयोजित करुन  प्रशिक्षण संस्था/ संशोधन 
संस्था/प्रगतीशील शेतकरी यांची शेती, प्रक्रिया उद्योग इ . ठिकाणी भेटी आयोजित करण्यात येते.
प्रती शेतकरी प्रती दिन रु.१५००/- इतके अर्थ सहाय्य शेतकरी यांना देण्यात येते.
यामध्ये प्रवास खर्च (बस किंवा द्वितीय श्रेणी स्लीपर रेल्वे), जेवण, नाश्ता, राहण्याचा खर्च इ .चा समावेश आहे.
आत्मा कार्यालयाची परवानगीने शेतकरी स्वत: किंवा शेतकरी गट या अभ्यास दौरा करु शकतात.
हा अभ्यास दौरा कालावधी कमाल ७ दिवसांचा असतो (प्रवासाचा कालावधी वगळून).
शेतकरी अभ्यास दौरा आटोपून परत आल्यानंतर त्यांना प्रतीदिन कमाल रु.१५००/- इतके अर्थ सहाय्य जिल्हा

स्तरावरुन पी एफ एम एस प्रणा लीद्वारे त्यांचे थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.

b. राज्यांतर्गत अभ्यास दौरे-

शेतकरी यांना राज्यात सुरु असणारे कृषी विषयक नव नविन तंत्रज्ञान, संशोधन याबाबतची माहिती मिळावी व 

शेतकरी यांनी आपल्या शेतात या संशोधनाचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,शेतकरी सक्षम बनावेत आणि तंत्रज्ञान 
प्रसारामध्ये त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने राज्यात शेतकरी अभ्यास दौरे आयोजित करुन  प्रशिक्षण संस्था/ संशोधन संस्था/प्रगतीशील 
शेतकरी यांची शेती, प्रक्रिया उद्योग इ . ठिकाणी भेटी आयोजित करण्यात येते.
प्रती शेतकरी प्रती दिन रु.१०००/- इतके अर्थ सहाय्य शेतकरी यांना देण्यात येते.
यामध्ये प्रवास खर्च (बस किंवा द्वितीय श्रेणी स्लीपर रेल्वे), जेवण, नाश्ता, राहण्याचा खर्च इ .चा समावेश आहे.
आत्मा कार्यालयाची परवानगीने शेतकरी स्वत: किंवा शेतकरी गट या अभ्यास दौरा करु शकतात.
हा अभ्यास दौरा कालावधी कमाल 5 दिवसांचा असतो (प्रवासाचा कालावधी वगळून).
शेतकरी अभ्यास दौरा आटोपून परत आल्यानंतर त्यांना प्रतीदिन कमाल रु. १०००/- इतके अर्थ सहाय्य जिल्हा

स्तरावरुन पी एफ एम एस प्रणा लीद्वारे त्यांचे थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.

c. जिल्हयांतर्गत अभ्यास दौरे-

शेतकरी यांना जिल्ह्यात सुरु असणारे कृषी विषयक नव नविन तंत्रज्ञान, संशोधन याबाबतची माहिती मिळावी 

व शेतकरी यांनी आपल्या शेतात या संशोधनाचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,शेतकरी सक्षम बनावेत आणि तंत्रज्ञान 
प्रसारामध्ये त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने जिल्ह्यात शेतकरी अभ्यास दौरे आयोजित करुन  प्रशिक्षण संस्था/ 
संशोधन संस्था/प्रगतीशील शेतकरी यांची शेती, प्रक्रिया उद्योग इ . ठिकाणी भेटी आयोजित करण्यात येते.
प्रती शेतकरी प्रती दिन रु.५००/- इतके अर्थ सहाय्य शेतकरी यांना देण्यात येते.
यामध्ये प्रवास खर्च (बस किंवा द्वितीय श्रेणी स्लीपर रेल्वे), जेवण, नाश्ता, राहण्याचा खर्च इ .चा समावेश आहे.
आत्मा कार्यालयाची परवानगीने शेतकरी स्वत: किंवा शेतकरी गट या अभ्यास दौरा करु शकतात.
हा अभ्यास दौरा कालावधी कमाल १ दिवसांचा असतो (प्रवासाचा कालावधी वगळून).
शेतकरी अभ्यास दौरा आटोपून परत आल्यानंतर त्यांना प्रतीदिन कमाल रु.५०० इतके अर्थ सहाय्य जिल्हा 

स्तरावरुन पी एफ एम एस प्रणा लीद्वारे त्यांचे थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.

B5. गट नीर्मिती-
आत्मा अंतर्गत विविध वस्तू/पिकांचे गट तयार करण्यात येतात.
एका गटामध्ये 20 ते 25 सदस्य असावेत.
तालुक्यातील त्या त्या पिकांचे गट तालुका स्तरावर एकत्र येणे अपेक्षीत आहे. तसेच तालुका स्तरावर एकत्र 

येउन जिल्हा स्तरावर या सर्व गटांची मिळून शेतकरी उत्पादक कंपनी बनवणे अपेक्षीत आहे.
गटांनी सर्व अभिलेखे व रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे. उदा. बैठकांचे इतिवृत्त, बँक पासबूक रकमांचा हिशेब इ .
a.या गटांना क्षमता वृद्धी, कौशल्य विकास यासाठी रु.१०००० प्रती गट या प्रमाणे सहाय्य करण्यात येते.
b.तसेच सक्षम गटास बीज भांडवल/फिरता निधी यासाठी रु.२५००० प्रती गट याप्रमाणे सहाय्य करण्यात येते.

c.याव्यतिरिक्त महिलांचे अन्न सुरक्षा गट तयार करण्यात येतात. या गटांना परसबाग, कुक्कुट पालन, 

शेळी पालन, अळिंबी ऊत्पादन, पशू संवर्धन इ . व्यवसाय सुरु करणेसाठी प्रशिक्षण, प्रकाशने व निविष्ठा खरेदी
यासाठी रु.२५००० इतके बीज भांडवल देण्यात येते.

B6.
जिल्हास्तर- उत्कृष्ट शेती करणारे प्रगतीशील शेतकरी यांना रु.२५००० इतके पारितोषिक देण्यात येते.
तालुकास्तर-उत्कृष्ट शेती करणारे प्रगतीशील शेतकरी यांना रु.१०००० इतके पारितोषिक देण्यात येते.

II. शेती विषयक माहितीचा प्रसार-

B7. जिल्हा स्तरावर कृषी महोत्सव/ फळे फुले प्रदर्शनी -
याबाबतचे आयोजन करणे साठी रु. ६ लाख इतकी तरतूद आहे.

B8.a. तसेच सोशल मेडिया, छापिल घडी पत्रीका व स्थानिक जाहिराती इ .द्वारे माहितीचा प्रसार करणे 
यासाठी प्रती जिल्हा रु. ६ लाख इतकी तरतूद असते.

B8.b. कमी खर्चाची प्रकाशने-
एका प्रकाशनाची कमाल किंमत रु.२० असावी. एका प्रकाशनाच्या १० प्रती.अशी ६ प्रकारची प्रकाशने एका गावात 

वितरित करणे.  तालुक्यात अशा प्रकारे १०० गावात वितरित करणे साठी रु. १२००००/-इतकी तरतूद असते.

B8.c . - कला जत्था- यासाठी प्रति कार्यक्रम रु. २००००/- इतकी तरतूद असते.

B9. तंत्रज्ञान डिजिटल माध्यमातून तयार करणे  जे माहिती तंत्रज्ञान जाळया मध्ये पाठवता येइल. यासाठी 

एका तंत्रज्ञान प्रती साठी रु. ५०००० याप्रमाणे जिल्ह्यास रु.५ लाख तरतुद असते.

III. संशोधन-विस्तार कार्य-शेतकरी यांना जोडणारे घटक-

B10 a. शेतकरी- शास्त्रज्ञ सुसंवाद- (Farmer-Scientist Interaction)

शेतकरी व शास्त्रज्ञ यांचे मध्ये पिकांचे तंत्रज्ञान तसेच शेतकरी यांना येणारे अडचणी याबाबत सुसंवाद घडावा 
यासाठी जिल्ह्यातील  25 शेतकरी यांचे साठी 2 दिवसांचे हे चर्चा सत्र जिल्हस्तरा वर घेण्यात येते. यासाठी रु. ३००००/-
इतकी तरतूद आहे. प्रती जिल्हा दोन सुसंवाद कार्यक्रम घेण्यात येतात.

B10 b. जिल्हा स्तरावर तज्ञ नेमणूक-

कृषी विद्यापीठ/ कृषी विज्ञान केंद्र/कृषी संशोधन केंद्र येथील एका तज्ञ शास्त्रज्ञाची नेमणूक आत्मा अंतर्गत अधिकारी

कर्मचारी यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे/ सल्ला देणे यासाठी केली जाते. त्यांना दरमहा ३००० रु. इतके मानधन 
देण्यात येते. त्यांची नियमित कामे सांभाळून हे काम त्यांनी करणे अपेक्षीत आहे.

B10.c. शास्त्रज्ञ व विस्तार अधिकारी/कर्मचारी यांच्या जिल्ह्यातील संयुक्त भेटी-

जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती पाहणे तसेच कृषी विषयक उपक्रमांना भेटी देणे यासाठी शास्त्रज्ञ व विस्तार

अधिकारी/कर्मचारी यांच्या जिल्ह्यात संयुक्त भेटी आयोजित करण्यात येतात. यासाठी वाहन भाड्याने घेणे किंवा
इंधन खर्चा साठी प्रती प्रक्षेत्र भेट रु.२००० इतकी तरतूद आहे. जिल्ह्यात एका वर्षात 26 भेटी आयोजित करण्यासाठी 
रु. 36400 इतकी तरतूद असते. एका आठवड्यात किमान एक क्षेत्रीय भेट होणे अपेक्षीत आहे.

B11. किसान गोष्टी चे आयोजन करणे-
संशोधन- विस्तार- शेतकरी ही साखळी बळकट करणेसाठी, शेतकरी व शास्त्रज्ञ यांचे मध्ये चर्चा घडवुन आणणे, येत

असलेल्या अडीअडचणी सोडवणे यासाठी किसान गोष्टीचे आयोजन तालुका स्तरावर खरिप हंगामात एक व रबी 
हंगामात एक अशा दोन किसान गोष्टी आयोजित करण्यात येतात. प्रती किसान गोष्टी साठी रु.२५०००/- इतकी 
तरतूद आहे.

B12. कृषी विज्ञान केंद्र/स्थानिक संशोधन केंद्र यांचे मार्फत पथदर्शी तंत्रज्ञानाचे आकलन, सुधारणा, प्रमाणीकरण, 

स्विकार तसेच यथार्थदर्शी संशोधन व विस्तार आराखडा यामधुन निदर्शनास आलेल्या  इतर कमी कालावधीचे 
सन्शोधनात्मक बाबी-
यासाठी प्रती जिल्हा रु. ७ लाख इतकी तरतूद असते.

IV. जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशासकीय/भांडवली खर्च-

B13. आवर्ती खर्च-

a. जिल्हा स्तरावरील प्रवास भत्ता/दैनिक भत्ता  व दैनंदिन खर्च- यासाठी प्रती जिल्हा १० लाख तरतूद.

b. वाहने भाड्याने घेणे व इंधन खर्च (यामध्ये प्रवास भत्ता/दैनिक भत्ता समावेश आहे.)-  यासाठी प्रती जिल्हा रु.२

लाख इतकी तरतूद असते.

c. फक्त तालुका स्तरावरील दैनंदिन खर्च (यामध्ये वाहने भाड्याने घेणे व इंधन खर्चाचा समावेश आहे)-  यासाठी 

प्रती तालुका रु. १०००००/- इतकी तरतूद असते.

d. जिल्हा शेतकरी सल्लागार समिती सभेसाठी दैनंदिन खर्च- जिल्हास्तरीय शेतकरी सल्लागार समितीच्या 

वर्षातून 4 बैठका घेणे अपेक्षीत आहे. प्रती शेतकरी रु.४०० इतक्या खर्चाची तरतूद आहे. एका बैठकीत कमाल 
25 शेतकरी असतात. एका बैठकी साठी रु.१०००० खर्च या प्रमाणे ४ बैठकांसाठी रु.४०००० इतकी तरतूद प्रती 
जिल्हा असते.

e. तालुका शेतकरी सल्लागार समिती बैठकी साठी दैनंदिन खर्च- तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीच्या 

वर्षातून 6 बैठका घेणे अपेक्षीत आहे. प्रती शेतकरी रु. २०० इतक्या खर्चाची तरतूद आहे. एका बैठकीत कमाल २५शेतकरी
असतात. एका बैठकी साठी रु. ५००० खर्च या प्रमाणे ६ बैठकांसाठी रु. ३००००/- इतकी तरतूद प्रती तालुका असते.

अनावर्ती खर्च- साधने उदा.संगणक इ .साठी प्रती जिल्हा रु.५ लाख इतकी तरतूद असते. मात्र ही साधने निरुपयोगी
झाल्यानंतरच दुसरी खरेदी करावीत.

B14. शेतिशाळा-
शेतकरी जे पिक घेतात त्या पिकामध्ये तज्ञ बनवण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणजे शेतिशाळा आहे. शेती शाळा ही 

प्रत्यक्ष शेतावर घेतली जाते. यासाठी प्रगतीशील शेतकरी यांचे जास्तीत जास्त 2.5 एकर चे क्षेत्र निवडले जाते. या 
क्षेत्रावरच  गावातील जवळपासचे त्या पिकाचे किमान 25 शेतकरी त्या हंगामात त्या पिकाच्या पेरणी पासून ते 
मळणी पर्यंत किमान 6 वेळा एकत्र येतात. या प्रकारे 6 वर्ग शेतावरच आयोजित होतात. या शेती शाळेत कमीत
कमी व्याख्याने आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून अनुभवातून शिक्षण अभिप्रेत आहे. या निवडलेल्या क्षेत्रावर सुधारीत 
तंत्रज्ञानाचे पथदर्शी प्रात्यक्षिक आयोजित केले जाते. यामध्ये एकात्मिक पिक व्यवस्थापन, एकात्मिक किड 
व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन इ .बाबींचा अवलंब केला जातो. शेतकरी या क्षेत्रावर एकत्र येउन 
आपापले या सुधारित तंत्रज्ञानाबाबातचे तसेच पिकाबाबतचे अनुभव, चांगले/वाईट दृश्य परिणाम एकमेकांना सांगतात. 
आपापसात चर्चा करतात व प्रात्यक्षिक प्लॉट ची निरीक्षणे घेतात. किडीची चित्रे काढतात. थोडक्यात हा प्रात्यक्षिक प्लॉट 
म्हणजेच पाटी, पुस्तक, पेन, इमारत सर्व काही असते.
या शेतिशाळे साठी प्रशिक्षक म्हणून विस्तार कार्यकर्ता, प्रगतीशील शेतकरी किंवा शासकीय/अशासकिय तज्ञ ही 

असू शकतो. आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हा समन्वयक म्हणून काम पाहतो. ज्या शेतकरी यांचे शेतात 
ही शेतीशाळा घेतली जाते तो शेतकरी म्हणजे होस्ट फार्मर.
या शेतिशाळे साठी एकुण खर्च मापदंड ३२४००/- इतका आहे. तसेच या व्यतिरीक्त होस्ट फार्मर ला या खर्चाच्या 

10 टक्के रक्कम ही शेती शाळा चालवण्यासाठी सेवा अधिभार म्हणून दीली जाते. शेती शाळा या कृषी संलग्न 
विभागाच्या ही घेण्यात येतात. दृष्य परिणाम दिसण्यासाठी शेतिशाळा या तालुक्यात समूह स्वरुपात घेणे अपेक्षीत आहे.
शेतिशाळे साठी बाब निहाय खर्चाचे मापदंड-
1) पथदर्शी प्रात्यक्षिक शेतिशाळा प्लॉट (जास्तीत जास्त 2.5 एकर) साठी खर्च- रु.५०००/-
2) शेतिशाळा प्लॉट पर्यंत वाहतुकीचा खर्च- रु.१५००/-
3) आकस्मिक खर्च- रु.१५००/-
4) 25 प्रशिक्षणार्थीं साठी आयपीएम कीट(रु.200 प्रती कीट)- रु.५०००/-
5) बाहेरुन बोलावलेले २ प्रशिक्षक यांच्या ४ भेटीं साठी मानधन (प्रती भेट रु.५००- रु.४०००/-
6) बाहेरुन बोलावलेले २ प्रशिक्षक यांच्या ४ भेटीं साठी प्रवास खर्च  (प्रती भेट रु.३००)- रु.२४००/-
7) एकुण २८ व्यक्तिंसाठी चहा नाश्ता खर्च- रु.६० प्रती व्यक्ती याप्रमाणे ४ भेटी साठी-  रु. ७२००/-
8) एकुण 28 व्यक्तिंसाठी छापील साहित्य- रु.१०० प्रती व्यक्ती याप्रमाणे एकुण रु.२८००/-
9) होस्ट फार्मर ला मानधन- वरिल एकुण खर्चाच्या 10 टक्के - रु.३०००/-
असा एकुण शेती शाळेचा खर्च मापदंड- रु. ३२४००/-.


B15. शेतकरी मित्र-
दोन गावां साठी एक कृषी मित्र या प्रमाणे नेमणूक केली जाते. कृषी मित्राला प्रती महिना १५०० रु याप्रमाणे मानधन 

देण्यात येते. या खर्चा साठी केंद्र हिसा 50 टक्के व राज्य हिस्सा 50 टक्के या प्रमाणे तरतूद उपलब्ध होत असते.


अधिक माहितीसाठी-