Total Pageviews

प्रधानमंत्री फ़सल बिमा योजने अंतर्गत- पुनर्रचीत हवामान आधारीत फळपीक विमा योजना (2021-22, 2022-23 व 2023-24 या 3 वर्षा करिता)

प्रधानमंत्री फ़सल बिमा योजने अंतर्गत- 
पुनर्रचीत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना- (2021-22,  2022-23 व 2023-24 या तीन वर्षाकरिता)

कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळपीकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होवुन उत्पादनात घट येते. त्यामुळे शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचीत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते.

1. या योजनेत कोणती फळपीके समाविष्ट आहेत-
मृग बहार- संत्रा,मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू व लिंबू, सिताफळ व द्राक्ष(क)  ही ८ फळपीके.
अंबिया बहार- सन्त्रा, मोसंबी, डाळिंब, काजू, आंबा, केळी, द्राक्षे (अ व ब)  व प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई ही ९ फळपीके.

ही योजना महसूल मंडळ हा घटक धरुन राबविण्यात येते. प्रत्येक महसूल मंडळाच्या ठिकाणी महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आलेली आहेत. या हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वारा वेग,आर्द्रता इ . माहिती स्वयंचलित रित्या नोंदवली जाते. या माहिती च्या आधारे अवेळी पाउस, कमी जास्त तापमान, वारा वेग त्याच प्रमाणे गारपीट या हवामान धोक्यां पासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकरी यांना फळपिकांसाठी विमा संरक्षण मिळते. सदर हवामान धोके (Trigger) लागू झाल्यानंतर विमा धारक  शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळते.

नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी यांना विमा संरक्षण देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

2. योजनेची वैशिष्टे- 
i) ही योजना अधिसूचीत केलेल्या क्षेत्रातील अधिसूचीत फळपिकां साठी आहे.
ii) योजना कर्जदार शेतकरी तसेच बिगर कर्जदार शेतकरी यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे.
iii) खातेदारांचे व्यतिरीक्त कुळा ने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात.

3. किती क्षेत्रापर्यन्त विमा काढता येईल-
i) जास्तीत जास्त 4 हेक्टर पर्यन्त विमा नोंदणी करता येईल.
ii) एका फळपिका साठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारा पैकी कोणत्याही एकाच हंगामा करीता विमा अर्ज करता येईल.
iii) केवळ पुढिल प्रमाणे वय असलेल्या उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण मिळेल. यापेक्षा कमी वयाच्या बागांसाठी अर्ज करता येणार नाही. 
द्राक्षे डाळिंब- 2 वर्ष
सन्त्रा मोसंबी पेरू, सिताफळ - 3 वर्ष. 
लिंबू- 4 वर्ष
आंबा काजू चिकू- 5 वर्ष


3. विमा संरक्षित रक्कम (प्रती हेक्टर)-
संत्रा, मोसंबी- रु.80000/-
डाळिंब- रु.130000/-
पेरू, चिकू- रु. 60000/-
लिंबू- रु. 70000/-
काजू- 100000/-
आंबा,केळी- रु. 140000/-
द्राक्षे- रु. 320000/-
स्ट्रॉबेरी- रु. 200000/-
पपई- रु.35000




4. विमा हप्ता भरण्याचा अंतीम दिनांक-
मृग बहार-
संत्रा, पेरू, लिंबू द्राक्ष(क)- १४ जुन 2023
मोसंबी, चिकू- 30 जुन 2023
डाळिंब- 14 जुलै 2023
सिताफळ- 31 जुलै 2023

अंबिया बहार-
स्ट्रॉबेरी- 14 ऑकटोबर 2023
द्राक्षे- 15 ऑक्टोबर 2023
मोसंबी केळी पपई- 31 ऑकटोबर 2023
सन्त्रा काजू आंबा(कोकण)- 30 नोव्हेंबर 2023
आंबा (इतर जिल्हे)- 31 डिसेंबर 2023
डाळिंब-14 जानेवारी 2024

5. योजनेचा हप्ता कुठे भरावा- 

आपले सरकार सेवा केंद्र (csc), बँक, प्राथमिक कृषी पत पूरवठा सहकारी संस्था, तसेच www.pmfby.gov.in या वेब साईट वर ऑनलाईन पद्धतीने.          


6. संत्रा (मृग बहार) हवामान धोके, प्रमाणके(Triggers), कालावधी व मिळणारी नुकसान भरपाई- 

i) कमी पाउस (15 जुन ते 15 जुलै)-

सदर कालावधीत एकुण 124 मि.मि. पेक्षा कमी पाउस झाल्यास रु.40000/- देय होइल.

सदर कालावधीत एकुण 124 मि.मि. ते 150 मि.मि. पाउस झाल्यास रु.12000/- देय होइल.

ii) पावसाचा खंड (16 जुलै ते 15 ऑगस्ट)

सदर कालावधीत सलग 15 ते 21 दिवसांचा पावसात खंड पडून दिवसाचे जास्तीत जास्त तापमान  सलग 3 दिवस 35 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रु.18000/- देय होइल.

सदर कालावधीत सलग 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यास तसेच दिवसाचे जास्तीत जास्त तापमान  सलग 3 दिवस 35 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रु.40000/- देय होइल.

(2.5 मि.मि. पर्यन्त किंवा त्यापेक्षा कमी पाउस पडला तरी तो खंड समजण्यात येईल.)

एकुण विमा संरक्षित रक्कम- रु. 80000/-



8. मोसंबी (मृग बहार) हवामान धोके, प्रमाणके(Triggers), कालावधी व मिळणारी नुकसान भरपाई- 

i) कमी पाउस (1 जुलै  ते 31 जुलै)-

सदर कालावधीत एकुण 75 मि.मि. पेक्षा कमी पाउस झाल्यास रु.40000/- देय होइल.

सदर कालावधीत एकुण 75 मि.मि. ते 125 मि.मि. पाउस झाल्यास रु.12000/- देय होइल.

ii) पावसाचा खंड (1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट)

सदर कालावधीत सलग 15 ते 21 दिवसांचा पावसात खंड पडून दिवसाचे जास्तीत जास्त तापमान  कोणत्याही दिवशी 33 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रु.18000/- देय होइल.

सदर कालावधीत सलग 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यास तसेच दिवसाचे जास्तीत जास्त तापमान  सलग 3 दिवस 33 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रु.40000/- देय होइल.

(2.5 मि.मि. पर्यन्त किंवा त्यापेक्षा कमी पाउस पडला तरी तो खंड समजण्यात येईल.)

एकुण विमा संरक्षित रक्कम- रु. 80000/-



9. संत्रा (अंबिया बहार) हवामान धोके प्रमाणके(Triggers), कालावधी व मिळणारी नुकसान भरपाई- 

i) अवेळी पाउस (1 डिसेंबर  ते 31 डिसेंबर)- सलग 7 दिवसात एकुण 30 मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाउस झाल्यास रु.20000/- देय होइल.
ii) कमी तापमान ( दि.16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी)-
सलग 5 दिवस 10 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रु.8000/- देय होइल.

सलग 7 दिवस 10 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रु.12000/- देय होइल.

सलग 8 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 10 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रु.20000/- देय होइल.

iii) जास्त तापमान (1 मार्च  ते 31 मार्च ) - 

सलग 5  दिवस 40.5 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु.8000/- देय होइल.

सलग 7 दिवस 40.5 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु.12000/- देय होइल.

सलग 8 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 40.5 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु.20000/- देय होइल.

iv) जास्त तापमान (1 एप्रिल  ते 31 मे ) - 

सलग 5 दिवस 45.5 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु.8000/- देय होइल.

सलग 7 दिवस 45.5 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु.12000/- देय होइल.

सलग 8 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 45.5 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु.20000/- देय होइल.

संत्रा पिकासाठी एकुण विमा संरक्षण - रु. 80000/-.

गारपीट साठी- (1 जानेवारी ते 30 एप्रिल  )- विमा संरक्षित रक्कम- रु. 26667/-
 विमाधारक शेतकरी यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपीकाची माहिती विमा कंपनीस/संबंधीत मंडळ कृषी अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी, महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या मदतींने वैयक्तीक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चीत करेल.

संत्रा पिकासाठी एकुण विमा संरक्षित रक्कम (नियमित- रु.80000+ गारपीट- रु.26667)-  एकुण रु.106667/- प्रती हेक्टर.

10.केळी पिकासाठी हवामान धोके
 प्रमाणके(Triggers), कालावधी व मिळणारी नुकसान भरपाई-

i) कमी तापमान-( 1 नोव्हेंबर  ते 28 फेब्रुवारी )- 

सलग 5 ते 7  दिवस किमान तापमान 8 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा कमी  राहिल्यास नुकसान भरपाई रु.9000/- देय होइल.

सलग 8 ते 11  दिवस किमान तापमान 8 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा कमी  राहिल्यास नुकसान भरपाई रु.13500/- देय होइल.


सलग 12 ते 15  दिवस किमान तापमान 8 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा कमी  राहिल्यास नुकसान भरपाई रु.22500/- देय होइल.

सलग 16 किंवा त्यापेक्षा जास्त  दिवस किमान तापमान 8 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा कमी  राहिल्यास नुकसान भरपाई रु.45000/- देय होइल.
(कमाल नुकसान भरपाई रु.45000/-)

ii) वेगाचा वारा (1 फेब्रुवारी  ते 30 जुन) -

या कालावधी मध्ये 40 किमी प्रती तास अथवा त्यापेक्षा जास्त वेगाने वारा वाहुन नुकसान झाल्यास विमाधारक शेतकरी यांनी नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त केळी पीकाची माहिती विमा कंपनीस/कृषी विभाग यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी, महसूल, विकास व कृषी विभागाच्या मदतींने वैयक्तीक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चीत करेल. फक्त संदर्भ हवामान केंद्रावरील वेगाच्या वारे नोंद ही नुकसान भरपाईस पात्र होणार नाही.
(कमाल नुकसान भरपाई रु.50000/-)

iii) जास्त तापमान (1 मार्च ते 31 मार्च) - 

या कालावधी मध्ये  सलग 5 ते 7 दिवस 42 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु.9000/- देय होइल.

 या कालावधी मध्ये  सलग 8 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 42 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु.22500/- देय होइल.

iv) जास्त तापमान (1 एप्रिल ते 31 मे ) -

या कालावधी मध्ये सलग 8 ते 14 दिवस 45 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 13500/- देय होइल.

या कालावधी मध्ये सलग 15 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 45 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 45000/- देय होइल.

एकुण विमा संरक्षण- रु.140000/-

गारपीट साठी- (1 जानेवारी 2021 ते 30 एप्रिल 2021)- विमा संरक्षित रक्कम- रु. 46667/-
 विमाधारक शेतकरी यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपीकाची माहिती विमा कंपनीस/संबंधीत मंडळ कृषी अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी, महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या मदतींने वैयक्तीक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चीत करेल.

केळी पिकासाठी एकुण विमा संरक्षित रक्कम (नियमित- 140000/- + गारपीट 46667)-  रु.186667/- प्रती हेक्टर.

अधिक माहितीसाठी