Total Pageviews

कृषी व संलग्न क्षेत्राची प्रात्यक्षिके आयोजित करणे (आत्मा अंतर्गत)

प्रात्यक्षिके आयोजित करणे-

a. कृषी विषयक प्रात्यक्षिके-

कृषी विषयक नवनवीन तंत्रज्ञान शेतकरी यांचे पर्यंत पोहोचविणे व शेतकरी यांनी या सुधारीत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी सदरची प्रात्यक्षिके शेतकरी यांच्या शेतात घेण्यात येतात. प्रात्यक्षिका साठी शेतकरी यांचे कडील  0.40 हे वर सदरची प्रात्यक्षिके घेण्यात येतात. यामध्ये सुधारित बियाणे व इतर निविष्ठा व नविन संशोधित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे.  एका प्रात्यक्षिकासाठी रु.६०००/- इतके अर्थसहाय्य निविष्ठा व इतर खर्चा साठी देण्यात येते.

b. कृषी संलग्न क्षेत्राची प्रात्यक्षिके-

कृषी संलग्न विभाग पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, रेशिम, खादी ग्रामोद्योग इ . विभागांची ही प्रात्यक्षिके उदा. शेततळयामध्ये मत्स्य बीज सोडणे, मधुमक्षिका पालन इ . घेण्यात येतात. यासाठी ही रु.६०००/- इतके अर्थ साह्य शेतकरी यांना देण्यात येते.