खाजगी रोपवाटीकांना परवाने देणे
खाजगी रोपवाटीकांना परवाना-
आपणाला खाजगी रोपवाटिका सुरु करुन विविध फळ पिकांची कलमे रोपे विक्री करणे चा व्यवसाय सुरु करावयाचा असल्यास त्यासाठी आपणाला परवाना आवश्यक आहे.
आपणाला ज्या फळ पिकांची कलमे रोपे विक्री करावयाची आहेत त्या फळ पिकाचे मातृवृक्ष आपणाकडे असणे आवश्यक आहे.
सदरचे मातृवृक्ष आपण कोठून खरेदी केली आहेत त्याची पावती अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे.
मातृवृक्ष हे कृषी विद्यापीठ/शासकीय रोप वाटिका येथून खरेदी केलेले असावेत.
अर्ज कुठे करावा-
उपविभागीय कृषी अधिकारी यांचेकडे.