Total Pageviews

राज्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण (आत्मा अंतर्गत)

राज्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण-

शेतकरी यांना राज्यात सुरु असणारे कृषी विषयक नव नविन तंत्रज्ञान, संशोधन याबाबतची माहिती मिळावी व शेतकरी यांनी आपल्या शेतात या संशोधनाचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,शेतकरी सक्षम बनावेत आणि तंत्रज्ञान प्रसारामध्ये त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने राज्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण हे प्रशिक्षण संस्था/ संशोधन संस्थांच्या ठिकाणी आयोजित करण्यात येते. 

प्रती शेतकरी प्रती दिन रु.१२५०/- इतके अर्थ सहाय्य शेतकरी यांना देण्यात येते. 

यामध्ये प्रवास खर्च (बस किंवा द्वितीय श्रेणी स्लीपर रेल्वे), जेवण, नाश्ता, राहण्याचा खर्च, संस्थेला लागणारा खर्च, प्रशिक्षण साहित्य, तज्ञ मानधन  इ .चा समावेश आहे.

आत्मा कार्यालयाची परवानगीने शेतकरी स्वत: किंवा शेतकरी गट या प्रशिक्षणा साठी जाऊ शकतात. 
हे प्रशिक्षण प्रवासाचा कालावधी वगळून  कमाल  ५ दिवसांचे असते. 

शेतकरी प्रशिक्षण आटोपून परत आल्यानंतर त्यांना प्रतीदिन कमाल रु.१२५० इतके अर्थ सहाय्य जिल्हा स्तरावरुन पी एफ एम एस प्रणा लीद्वारे त्यांचे थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.