राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - पौष्टिक तृणधान्य (ज्वारी,बाजरी,रागी)
राष्ट्रिय अन्नसूरक्षा अभियान- पौष्टिक तृणधान्य
हे अभियान ज्वारी, बाजरी, रागी या पिकांसाठी राज्यातील 26 जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
सदर अभियानासाठी अर्थ सहाय्य केंद्र हिस्सा 60 टक्के व राज्य हिस्सा 40 टक्के असा आहे.
वरिल पिकांचे क्षेत्र व उत्पादकता वाढावी या उद्देशाने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य अंतर्गत राबविण्यात येणारे घटक-
1.पिक प्रात्यक्षिके-
(पिक प्रात्यक्षिकां साठी विभागिय कृषी सह संचालक यांचे स्तरावर संलग्न कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार जिल्हा/तालुका/पिक निहाय निर्धारित तंत्रज्ञान पैकेज नुसार सर्व घटक अंमलबजावणी साठी, रासायनिक खतावरिल खर्च लाभार्थी शेतकरी यांनी स्वत: करावयाचा आहे यासाठी अनुदान देय नाही.)
अ. सुधारित तंत्रज्ञानावर आधारित पिक प्रात्यक्षिके-
रु. 6000 प्रती हेक्टर अनुदान.
2. राज्यासाठी अधिसूचित अधिक उत्पादन देणारे वाणाचे *प्रमाणित बियाणे वितरण*-
ब. मागिल 10 वर्षाच्या आतील अधिसूचित व राज्यासाठी शिफारस केलेल्या
i ) संकरित वाणाचे प्रमाणित बियाणे वितरण-
किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.10000 प्रती क्विंटल अनुदान.
ii) सुधारित वाणाचे प्रमाणीत बियाणे वितरण-
किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 3000 प्रती क्विंटल अनुदान.
ब. 10 वर्षाच्या वरील अधिसूचित व राज्यासाठी शिफारस केलेल्या सुधारित वाणाचे प्रमाणित बियाणे वितरण-
किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.1500 प्रती क्विंटल अनुदान.
क. प्रमाणीत बियाणे उत्पादन-
(10 वर्षाच्या आतील व राज्यासाठी शिफारस केलेले सुधारित राज्यात उत्पादित बियाणे)-
अनुदान रु. 3000 प्रती क्विंटल.
ड. 1) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन-
यामध्ये सूक्ष्म मुल द्रव्ये व जैविक खते या बाबींचा समावेश होतो.
1.सूक्ष्म मुल द्रव्ये-
सूक्ष्म मुल द्रव्याच्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के , कमाल रु.500 प्रती हे. अनुदान देय आहे.
त्यासाठी लाभार्थी शेतकरी गटाने शिफारशी प्रमाणे सूक्ष्म मुल द्रव्ये खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने खरेदी करावीत व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.
लाभार्थी शेतकरी यांनी कृषी निविष्ठांची खरेदी कैशलेस पद्धतीने अथवा रोखीने करावी.
लाभार्थी शेतकरी यांनी वस्तू व सेवा कर क्रमांक असलेली खरेदी पावती सादर करणे बंधनकारक राहिल.
तसेच एका लाभार्थी शेतकरी यांना एका वर्षात सर्व बाबी मिळून जास्तित जास्त 5 हेक्टर पर्यंत लाभ घेता येइल.
2. जैविक खते-
सदर बाब फक्त कड धान्य व पौष्टिक तृण धान्य कार्यक्रमासाठी लागू आहे.
कृषी विभागाच्या जैविक प्रयोगशाळे मार्फत पिक गटास आवश्यक द्रवरुप जैविक खते/जैविक खते संघ (liquid consortia) तयार करण्यात येत असुन सदर खतांची बीज प्रक्रिया केल्यास उत्पादन खर्चात बचत करुन पिकांच्या उत्पादकतेत वाढ होते.
द्रवरुप जीवाणू संघ (liquid consertia) यामध्ये नत्र स्थिरी करण करणारे, स्फूरद विरघळविणारे व जस्त विरघळविणारे जीवाणू उपलब्ध करुन देणारे यापैकी कमीत कमी दोन किंवा अधिक जिवाणुंचा समावेश असतो.
शेतकरी गटाने जीवाणू खतांची खरेदी प्रथम प्राधान्याने शासकीय प्रयोग शाळा, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र यांच्या कडून करावी.
शेतकरी यांना खुल्या बाजारातुन जीवाणू खते खरेदी करावयाची असल्यास किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.300 प्रती हेक्टर अनुदान देय आहे.
शेतकरी गटाने खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने खरेदी करावीत व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येते.
ड-2 एकात्मिक किड व्यवस्थापन (ipm)
1.पिक संरक्षण औषधे व जैविक घटक-
यासाठी 50 टक्के, कमाल रु.500 प्रती हेक्टर अनुदान देय आहे.
2.तण नाशके-
तण नाशकाच्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के , कमाल रु.500 प्रती हे. अनुदान देय आहे.
त्यासाठी लाभार्थी शेतकरी गटाने खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने लेबल क्लेम असलेल्या व कृषी विद्यापीथतण नाशकांची खरेदी करावी व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.
इ . फ्लेक्झी घटक व कृषी औजारे (कृषी यांत्रिकीकरण उपभियान प्रमाणे अनुदान मर्यादा) -
i) शेती औजारे व उपकरणे-
मनुष्य चलित फवारणी पंप-
अजा/अज/महिला/अल्प/अत्यल्प भुधारक- 50 टक्के, रु.750/- अनुदान.
इतर शेतकरी- 40 टक्के, रु.600/- अनुदान.
ii) पिक पद्धतीवर आधारीत प्रशिक्षण- रु.14000 प्रती प्रशिक्षण. 30 शेतकरी यांचे साठी. 4 सत्र ( 2 सत्र खरीप व 2 सत्र रबी मध्ये)
iii) प्राथमिक प्रक्रिया यूनिट -(smam प्रमाणे अनुदान मर्यादा)
अ.क्लीनर कम ग्रेडर
अजा/अज/महिला/अल्प/अत्यल्प भुधारक- 50 टक्के, रु.100000/- अनुदान.
इतर शेतकरी- 40 टक्के, रु.80000/- अनुदान.
ब. डीहस्कर-
अजा/अज/महिला/अल्प/अत्यल्प भुधारक- 60 टक्के, रु.75000/- अनुदान.
इतर शेतकरी- 50 टक्के, रु.60000/- अनुदान.
iv) प्रचार प्रसिद्धी जिल्हा स्तरीय मेळावे/ कार्यशाळा-
अ. रोड शो- रु.1 लाख (योजनेच्या प्रचार व प्रसिद्धी साठी)
ब.जिल्हा स्तरीय मेळावे/कार्यशाळा- रु.2.50 लाख प्रती जिल्हा.
अधिक माहितीसाठी -
---××---