Total Pageviews

गटशेती

गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकरी यांच्या 
गटशेतीस चालना देणे

अ. संकल्पना -
                  एका समूहातील शेतकरी यांनी एकत्र येउन शिवारातिल संलग्न भौगोलिक क्षेत्रामध्ये सामुहिक रित्या नियोजन बद्ध शेती करणे, शेती उत्पादनावर प्रक्रिया व मुल्यवर्धन करणे, एकत्रित विपणन करणे यासाठी सामुहिक स्वरुपाची व्यवस्था निर्मान करणे.  

ब. पात्रता - 
               शेतकरी गटाची नोंदणी आत्मा संस्था/महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अथवा कंपनी अधिनियम 1956 अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून नोंदणी आवश्यक. 

                  गटामध्ये किमान खातेदार शेतकरी(कुटुंब) संख्या 20 व किमान समुहाचे क्षेत्र 100 एकर राहिल. 

                सामुदायिक घटकांच्या (उदा. सामुहिक शेततळे, प्रक्रिया केंद्र, सामुहिक विहिर, साठवणूक केंद्र इ.) उभारणी साठी लागणारे क्षेत्र हे गटाचे मालकीचे असावे किंवा किमान 25 वर्षे भाडेपट्याच्या नोंदणी कृत करारावर गटाचे नावावर असावे. 

क. देय अर्थसाह्य - 
                  प्रकल्प खर्चाच्या 60 टक्के किंवा जास्तीत जास्त रु.1 कोटी अर्थसाह्य.

अधिक माहितीसाठी मार्गदर्शक सूचना