Total Pageviews

जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण (आत्मा अंतर्गत)

जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण (निवासी)-

शेतकरी यांना जिल्ह्यात सुरु असणारे कृषी विषयक नव नविन तंत्रज्ञान, संशोधन याबाबतची माहिती मिळावी व शेतकरी यांनी आपल्या शेतात या संशोधनाचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,शेतकरी सक्षम बनावेत आणि तंत्रज्ञान प्रसारामध्ये त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण, प्रशिक्षण संस्था, संशोधन केन्द्रा च्या ठिकाणी आयोजित करण्यात येते. 
प्रती शेतकरी प्रती दिन रु.400/- इतके अर्थ सहाय्य शेतकरी यांना देण्यात येते. 
यामध्ये प्रवास खर्च, जेवण, नाश्ता, राहण्याचा खर्च, संस्थेला लागणारा खर्च इ .चा समावेश आहे.
आत्मा कार्यालयाची परवानगीने शेतकरी स्वत: किंवा शेतकरी गट या प्रशिक्षणा साठी जाऊ शकतात. 
हे प्रशिक्षण प्रवासाचा कालावधी धरुन कमाल 1 ते 2 दिवसांचे असते. 
शेतकरी प्रशिक्षण आटोपून परत आल्यानंतर त्यांना प्रतीदिन कमाल रु.400 इतके अर्थ सहाय्य जिल्हा स्तरावरुन पी एफ एम एस प्रणा लीद्वारे त्यांचे थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.

जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण(अनिवासी)-

शेतकरी यांना जिल्ह्यात सुरु असणारे कृषी विषयक नव नविन तंत्रज्ञान, संशोधन याबाबतची माहिती मिळावी व शेतकरी यांनी आपल्या शेतात या संशोधनाचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,शेतकरी सक्षम बनावेत आणि तंत्रज्ञान प्रसारामध्ये त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण, प्रशिक्षण संस्था, संशोधन केन्द्रा च्या ठिकाणी आयोजित करण्यात येते. 
प्रती शेतकरी प्रती दिन रु.250/- इतके अर्थ सहाय्य शेतकरी यांना देण्यात येते. 
यामध्ये प्रवास खर्च, जेवण, नाश्ता खर्च इ .चा समावेश आहे.
आत्मा कार्यालयाची परवानगीने शेतकरी स्वत: किंवा शेतकरी गट या प्रशिक्षणा साठी जाऊ शकतात. 
हे प्रशिक्षण प्रवासाचा कालावधी धरुन कमाल 1 ते 2 दिवसांचे असते. 
शेतकरी प्रशिक्षण आटोपून परत आल्यानंतर त्यांना प्रतीदिन कमाल रु.250 इतके अर्थ सहाय्य जिल्हा स्तरावरुन पी एफ एम एस प्रणा लीद्वारे त्यांचे थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.