Total Pageviews

मिनी राईस मिल

मिनी राइस मिल

राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान- भात या कर्यक्रमामध्ये राज्यातील 8 जिल्ह्यांचा समावेश आहे- नाशिक, पुणे, सातारा, नागपुर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर व गडचिरोली. या 8 जिल्ह्या मध्ये मिनी राइस मिल ही योजना राबविण्यात येत आहे.

दुर्गम भागामध्ये भात भरडाई केंद्राची(राइस मिल) पूरेशी उपलब्धता नसल्याने शेतकरी यांना भात भर डाई साठी अडचणी निर्माण होतात. सदर समस्येवर मात करण्यासाठी ग्रामीण  भागात विजेवर तसेच विजेशिवाय चालणारे मिनी राइस मिल चा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.


अनुदान-
मिनी राइस मिल साठी येणारा प्रत्यक्ष खर्चाच्या कृषि यांत्रिकीकरण उपअभियानच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 60 टक्के किंवा कमाल रु. 2 लाख इतके अनुदान या योजनेत देय आहे.


तसेच कृषि यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत सर्व जिल्हांसाठी मिनी राईस मिल साठी अनुदान आहे.

अनुदान-
अल्प/अत्यल्प/महिला/अजा/अज भूधारक - ६० टक्के किंवा कमाल रुपये २. ४० लाख
बहू भूधारक - ५० टक्के किंवा कमाल रुपये २. ०० लाख 

अर्ज कोण करू  शकतात-

शेतकरी/महिला गट

अर्ज कुठे करावा-

तालुका कृषी अधिकारी कार्यालय.

1 comment:

  1. Dhule distric che kay.... Dhule sathi aahe ka hi yojana.    ReplyDelete