जिल्हांतर्गत अभ्यास दौरे (आत्मा अंतर्गत)
जिल्हयांतर्गत अभ्यास दौरे-
शेतकरी यांना जिल्ह्यात सुरु असणारे कृषी विषयक नव नविन तंत्रज्ञान, संशोधन याबाबतची माहिती मिळावी व शेतकरी यांनी आपल्या शेतात या संशोधनाचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,शेतकरी सक्षम बनावेत आणि तंत्रज्ञान प्रसारामध्ये त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने जिल्ह्यात शेतकरी अभ्यास दौरे आयोजित करुन प्रशिक्षण संस्था/ संशोधन संस्था/प्रगतीशील शेतकरी यांची शेती, प्रक्रिया उद्योग इ . ठिकाणी भेटी आयोजित करण्यात येते.
प्रती शेतकरी प्रती दिन रु.५००/- इतके अर्थ सहाय्य शेतकरी यांना देण्यात येते.
यामध्ये प्रवास खर्च (बस किंवा द्वितीय श्रेणी स्लीपर रेल्वे), जेवण, नाश्ता, राहण्याचा खर्च इ .चा समावेश आहे.
आत्मा कार्यालयाची परवानगीने शेतकरी स्वत: किंवा शेतकरी गट या अभ्यास दौरा करु शकतात.
हा अभ्यास दौरा कालावधी कमाल १ दिवसांचा असतो (प्रवासाचा कालावधी वगळून).
शेतकरी अभ्यास दौरा आटोपून परत आल्यानंतर त्यांना प्रतीदिन कमाल रु. ५००/- इतके अर्थ सहाय्य जिल्हा स्तरावरुन पी एफ एम एस प्रणा लीद्वारे त्यांचे थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.