महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळ्झाडे , वृक्ष , फुलपिके, औषधी वनस्पती, मसाला पिके लागवड तसेच गांडूळ खत /नाडेप कंपोस्ट युनिट /रेशीम उद्योग विकास
महात्मा गांधी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत-
फळ्झाडे , वृक्ष , फुलपिके, औषधी वनस्पती, मसाला पिके लागवड तसेच गांडूळ खत /नाडेप कंपोस्ट युनिट/रेशीम उद्योग विकास
I) लागवड कोणत्या ठिकाणी करता येते-
1.वैयक्तीक लाभार्थ्याच्या सलग शेतावर-फळ्झाडे लागवड/वृक्ष लागवड व फुलपिके लागवड
2.वैयक्तीक लाभार्थ्याच्या शेताच्या बांधावर-फळ्झाडे लागवड /वृक्ष लागवड
3.वैयक्तीक लाभार्थ्याच्या पडीक शेत जमिनिवर-फळ्झाडे लागवड /वृक्ष लागवड
II) लाभार्थी पात्रता-
1) अनुसूचित जाती(SC)
2) अनुसूचित जमाती(ST)
3) भटक्या जमाती(Nomadic Tribes)
4) विमुक्त जमाती( De-notified Tribes)
5) दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे
6) स्त्री कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे
7) दिव्यांग व्यक्ती कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे
8) भुसुधारक योजनेचे लाभार्थी( beneficiaries of land reforms)
9) प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण योजनेखालील लाभार्थी
10) अनुसूचित जमातिचे व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती.
11) कृषी कर्ज माफी योजना 2008 नुसार-
i.लहान शेतकरी (1 हेक्टर पेक्षा जास्त परंतू 2 हेक्टर पर्यंत जमीन असलेले) (जमीन मालक व कूळ)
सिमांत शेतकरी
ii. सिमांत शेतकरी( 1 हेक्टर पर्यंत जमीन असलेले शेतकरी) (जमीन मालक व कूळ).
मग्रारोहयो साठी जॉब कार्ड धारक वरिल 1 ते 11 प्रवगातील कोणतीही व्यक्ती वैयक्तीक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
अनुसूचित जाती(SC), अनुसूचित जमाती(ST), भटक्या जमाती(Nomadic Tribes), विमुक्त जमाती( De-notified Tribes), दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे या प्रवर्गांना वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या पात्रतेसाठी जमिनीची कमाल मर्यादेची अट लागू नाही.
लाभार्थी स्वत: साठी जॉब कार्ड धारक असावा. सदर योजना राबविण्या करीता तो स्वत:/कुटुंबातील कार्यक्षम व्यक्ती प्रमाणीत मजुर म्हणुन घोषित करणे आवश्यक. लागवडी साठी खडड़े खोदणे, लागवड करणे, पाणी देणे, औषधे फवारणे लाभधारकाने स्वत: व जॉबकार्ड धारक मजुरांकडून करुन घेणे आवश्यक आहे.
क.क्षेत्र मर्यादा-
फळ्झाड फळ्पीक व वृक्ष लागवडीसाठी किमान 0.05 हेक्टर व कमाल 2 हेक्टर प्रती लाभार्थी क्षेत्र मर्यादा आहे.
इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. ही जमीन कूळ कायद्या खाली येत असल्यास व 7/12 वर कुळाचे नाव असेल तर योजना कुळाच्या संमतीने राबविण्यात येते.
ड) अर्ज कुठे करावा-
ग्रामपंचायत कार्यलयात. तसेच प्रत्येक महसूली गावात २४ तास अर्ज टाकता येईल अशा सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी (उदा. अंगणवाडी शाळा ग्रामपंचायत समाजमंदिर इ.) अर्ज पेटी ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन अर्जाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
इ.)अर्ज कोणत्या नमुन्यात करावा-
प्रपत्र-अ व प्रपत्र-ब मध्ये.
योजनेचे काम ग्रामपंचायत विभाग ,कृषि विभाग व सामजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात येते. यापैकी कोणत्या विभागामार्फत काम करायचे आहे ही निवड करण्याचा अधिकार लाभार्थीस आहे.
ई.) अर्जांना मान्यता कोण देतात -
अर्जाना मान्यता ग्रामपंचायत/ ग्रामसभा देते.
ग्रामपंचायतीची मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर कामास ताांत्रिक व प्रशासकीय मान्यता शेतकऱ्यांनी दिलेल्या पसंतीनुसार ग्रामपंचायत विभाग /कृषि विभाग तसेच वृक्ष लागवडीस सामजिक वनीकरण मार्फ़त मान्यता देण्यात येऊन फळबाग/ वृक्ष व फूलपिक लागवड सुरू केले जाते.
अंदाजपत्रके तयार करणे-कृषी सहाय्यक/तांत्रिक सहाय्यक पं.स./ वनक्षेत्रपाल
अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरी देणे- मंडळ कृषी अधिकारी/कृषी अधिकारी पं.स./ सामाजीक वनीकरण विभागाचे सक्षम अधिकारी
अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणे- तालुका कृषी अधिकारी/गट विकास अधिकारी/ सामाजीक वनीकरण विभागाचे सक्षम अधिकारी.
फ) अर्ज करण्याचा कालावधी -
अर्ज वर्षभर करता येतो. मात्र १५ जुलै ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आलेले अर्ज मंजूर करून त्या वर्षाच्या लेबर बजेट मध्ये समाविष्ट केले जातील.
ज्या लाभार्थ्यांचे नाव वरील लेबर बजेट मध्ये समाविष्ट झाले नाही व सदर लाभार्थी योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत, अशा लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्याकरीता पूरक लेबर बजेट तयार करण्यात येते. त्याकरीता १ डिसेंबर ते पुढील वर्षाचे १४ जुलै पर्यंत प्राप्त अर्ज त्या त्या महिन्याच्या पंचायत सभेत मान्यता घेऊन पंचायत समितीस मान्यतेसाठी पाठवण्यात येतील. व त्यापुढील होणाऱ्या ग्रामसभेस सदर यादी अवलोकनार्थ ठेवण्यात येईल.
ग) आवश्यक कागदपत्रे-
7/12 उतारा
8अ उतारा
आधार कार्ड
राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
जॉब कार्ड
दारिद्र्य रेषेखाली असल्यास तो दाखला,
जातीचा दाखला किंवा जातीचा उल्लेख असलेली कोणतेही अधिकृत शासनाचे पुरावे.
ह) कलमे रोपे खरेदी कोठून करावीत-
कलमे रोपे निवड व खरेदी व वाहतूक लाभार्थी यांनी स्वत: करावी. कलमे/ रोपे दर्जाबाबतची जबाबदारी लाभार्थींची राहील. लाभार्थ्याने कलमे/ रोपे खरेदी करताना खालीलप्रमाणे रोपवाटीकांना प्राधान्य द्यावे.
1.कृषी विभागाच्या रोपवाटीका
2.कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिका-कृषी विभागाच्या रोपवाटीका खाजगी शासन मान्यता प्राप्त (पंजीकृत) रोपवाटिका, सामाजिक वनीकरण विभाग किंवा अन्य शासकीय विभाग रोपवाटिकांवर फळरोपे/फूलरोपे /औषधी वनस्पती तसेच मसाला पीके यांची रोपे उपलब्ध नसल्यास लाभार्थीने स्वतःच्या जबाबदारीवर खरेदी करुन मंडळ कृषि अधिकारी यांनी बिले प्रमाणित करावीत. त्यासाठी मंजूर दराप्रमाणे अनुदान देय राहील.
3.खाजगी शासन मान्य रोपवाटिका
4 .सामाजिक वनीकरण विभाग किंवा अन्य शासकीय रोपवाटिका
परवानाधारक खाजगी रोपवाटीकेवरुन कलमे/रोपे खरेदी करावयाची गरज पडल्यास मा. आयुक्त कृषि यांनी लागू केलेल्या दराने खरेदी करता येईल.
कलमे/रोपे उपलब्धतेबाबतच्या अद्यावत माहितीसाठी National Nursery Portal च्या nnp.nhb.gov.in या संकेतस्थळाचा वापर करण्यात यावा.
खते औषधे व इतर साहित्य शेतकरी यांनी स्वत: खरेदी करुन खरेदीच्या पावत्या सादर करणे आवश्यक आहे.
इ) योजनेत समाविष्ट फळपीके/वृक्ष/फुलपिके-
१)आंबा २ ) काजू ३) चिकू ४) पेरू ५ ) डाळिंब ६ ) संत्रा ७ ) मोसंबी ८ ) कागदी लिंबू ९ ) नारळ १०) बोर
११ ) सिताफळ १२ ) आवळा १३ ) चिंच (विकसित जाती) १४) कवठ १५ ) जांभूळ १६ ) कोकम १७ ) फणस
१८ ) अंजीर १९ ) सुपारी २० ) बांबू २१) साग २२) जट्रोफ़ा २३) गिरिपुष्प २४) कडीपत्ता २५) कडूलिंब
२६) सिंधी २७) शेवगा २८ )हादगा २९) पानपिंपरी ३०) केळी(3 वर्ष) ३१) ड्रैगन फ्रुट ३२)अव्हाकडो
३३) द्राक्ष ३४) चंदन ३५) खाया ३६) निम ३७) चारोळी ३८) महोगनी ३९) बाभुळ ४०) अंजन ४१) खैर
४२) ताड ४३) सुरु ४४)रबर ४५)महारुख ४६) मैंजियम ४७) मिलियाडुबीया ४८) तूती ४९) ऐन
५०)शिसव ५१) नीलगिरी ५२)सुबाभूळ ५३)शमी ५४)महुआ ५५)गुलमोहर ५६)बकान निब
५७)चिनार ५८) शिरीष ५९) करवंद
फुलझाडे -
१) गुलाब २) मोगरा ३) निशिगंध ४) सोनचाफा
औषधी वनस्पती -
१)अर्जुन, २) असन, ३)अशोक, ४) बेहडा, ५) हिरडा ,६) बेल, ७)टेटू,८) डीकेमाली, ९) रक्त चंदन, १०) रिठा, ११)लोध्रा, १२)आइन, १३)शिवन, १४) गुग्गुळ, १५) बिब्बा १६) करंज
मसाला पिके -
१) लवंग २) मिरी ३) दालचीनी ४) जायफळ
ज) लागवडीपूर्वी माती परिक्षण आवश्यक आहे आहे का-
शेतजमिनीच्या प्रतवारीनुसार सुयोग्य फळपिके/फुलपिके/वृक्ष यांची निवड करण्यात येते. लिंबू वर्गीय फळपिकांसाठी चुनखडी प्रमाण योग्य असणे आवश्यक असल्याने माती परिक्षण करणे आवश्यक आहे. बाकीच्या पिकांसाठी माती परिक्षण आवश्यक नाही.
क ) अनुदान किती व कसे मिळेल-
खालीलप्रमाणे अनुदान हे 3 वर्षात मिळेल.
दुसर्या व तीसरे वर्षी बागायती पिकांचे बाबतीत जे लाभार्थी कमीत कमी 90 टक्के व कोरडबाहू पिकांच्या बाबतीत किमान 75 टक्के झाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुसर्या व तीसरे वर्षाचे अनुदान देय आहे.
वैयक्तीक लाभार्थ्याच्या सलग शेतावर निशीगंध, मोगरा ,गुलाब , सोनचाफा या फुलपिकांची लागवड करण्यासाठी प्रती हेक्टर 2 लाख रु. पर्यंत अनुदान देण्यात येते.आणि हे सर्व अनुदान एकाच वर्षात 100 टक्के मिळते.
या योजने साठी हजेरी पत्रक (इ-मस्टर) निर्गमीत करणे, भरणे,पारित करणे, आणि कुशल व अकुशल बाबीची देयके प्रदान करण्याचे अधिकार तालुका कृषी अधिकारी यांना आहेत.
तसेच मजुरीच्या बाबतीत ग्रामरोजगार सेवक हजेरी पत्रक भरुन कृषी सहाय्यकाच्या प्रती स्वाक्षरी सह तालुका कृषी अधिकारी यांना सादर करतात. तांत्रिक अधिकारी कामाचे मोजमाप घेउन मजुरीची परीगणना करतात व तालुका कृषी अधिकारी यांना सादर करतात. कृषी सहाय्यक लागवडीच्या नोंदी मापनपुस्तिकेत घेतात.
तालुका कृषी अधिकारी यांना हजेरी पत्रकाचे देयक प्रदान करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरीदार म्हणुन घोषित करण्यात आलेले आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सहाय्यक अधिक्षक/कृषी अधिकारी हे प्रथम स्वाक्षरीदार तर तालुका कृषी अधिकारी हे द्वितीय स्वाक्षरीदार असतात.
तालुका कृषी अधिकारी यांचे कडुन हजेरी पत्रका संबंधीत देयके मंजूर झाल्यानंतर तहसिल कार्यालयातील क्लर्क कम डाटा एंट्री ऑपरेटर मार्फत वेज लिस्ट/मटेरियल लिस्ट तयार करुन तालुका कृषी अधिकारी यांचे कडे पाठविण्यात येते.
वेजलिस्ट/ मटेरियल लिस्टची प्रिंट काढुन तालुका कृषी अधिकारी स्वाक्षरी करतात.
तालुका कृषी अधिकारी यांनी साक्षांकित केलेल्या वेजलिस्ट/ मटेरियल लिस्ट प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसात F T O तयार करुन प्रदानासाठी बँक/पोस्ट ऑफिसला पाठवण्यात येते. दर 15 दिवसांनी हजेरीपत्रका प्रमाणे मजुरी दिली जाते. मजुरीची रक्कम फक्त बँक/पोस्ट मार्फत दिली जाते.
फळपीक निहाय प्रती हेक्टर मापदंड लाभार्थींच्या वैयक्तिक शेतावर सलग लागवड (रु.)-
1) सन्त्रा, मोसंबी, लिंबू कलमे(6x6मी)- 148873.
2) डाळिंब कलमे(5x5)- 158144
3) आंबा कलमे(10 x10)- 164324
4) काजू कलमे (7x 7)- 116430
5) चिकू कलमे (10x 10)- 158890
6) पेरू कलमे(6x6)- 132288
7) सिताफळ कलमे (5x 5)- 138542
8) आवळा रोपे (7x7)- 90602
9) सिताफळ रोपे- 116747
10) फणस रोपे(10x10)- 78495
11) जांभूळ रोपे(10x10)- 80304
12) चिंच रोपे(10x10)- 80304
13) बांबू रोपे (5x5)- 50965
14) ड्रैगन फ्रुट (3.5x 3)- 228731 15) अव्होकडो (8 x 8)- 152780 16) केळी ( 1.8 x 1.5)- 253032 17) द्राक्षे ( 3 x 1.5) - 269664 18) सोन चाफा ( 3 x 3) - 223720 19) मिरी रोपे (नारळ बागेत आंतरपिक)(0.30x 0.30)- 48493 20) लवंग (नारळ बागेत आंतरपिक) (0.60×0.60)- 62984 21) जायफळ कलमे(नारळ बागेत आंतरपिक)(0.90×0.90)- 96466 22) जायफळ रोपे (नारळ बागेत आंतरपिक)(0.90×0.90)- 85716 23) दालचीनी (नारळ बागेत आंतरपिक)(0.60×0.60)- 111516
बांधावरील फळबाग लागवडीस 1 हेक्टर क्षेत्रावरील एकुण 20 झाडांसाठी खालील प्रमाणे अनुदान मिळेल.
*आंबा कलमे - अनुदान 32252/-*
*नारळ रोपे - अनुदान 21442/-*
*पेरू कलमे - अनुदान 10182/-*
*सिताफळ कलमे - अनुदान 6888/-*
*जांभूळ कलमे - अनुदान 19220/-*
खाजगी जमिनीवर वृक्ष लागवड- साग, चंदन ,खाया,बांबू, नीम, चारोळी, मोहगनी,आवळा,हिरडा, बेहडा,अर्जुन,सीताफळ,चिंच, जांभूळ,बाभूळ,अंजन, बिबा,खैर,आंबा,काजू, फणस, ताड, सिंदी, सुरु, शिवण, शेवगा,हादगा,कडीपत्ता, महारुख, मँजियम, मेलिया डुबिया या प्रजातींची रोपे लागवड करिता अनुदान - रु. ५०९६५/- (प्रति हेक्टर ३ वर्षात)
खाजगी जमिनीवर निलगिरी,सुबाभूळ इ. प्रजाती लागवड- अनुदान- रु. १३१४०६ प्रति हेक्टर
तसेच
*नाडेप खत उत्पादन युनिट साठी एकूण अनुदान 15500/-*
*गांडूळ खत उत्पादन युनिट साठी एकूण अनुदान 11520/-*
वेळोवेळी मजुरी,कलमे/रोपे व सामुग्री दरामध्ये वाढ व बदल झाल्यास त्यानुसार सुधारित मापदंड शासनामार्फत मान्य करण्यात येतो. सुधारित मापदंड मान्य होईपर्यंत पुर्वीच्या मंजूर मापदंडा प्रमाणे योजनेची अंमलबजावणी करण्यात येते.
ल ) लागवड कधी करावी तसेच लागवड कालावधी -
तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर लागवड करावी. पावसाळ्याचा विचार केल्यास फळबाग /वृक्ष लागवड/फुलपिके लागवडीचा कालावधी 1 जुन ते ३१ डिसेंबर पर्यंत योग्य असतो. जमिनीतील आर्द्रता योग्य असल्यास या कालावधीत वाढ करण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितिस आहेत. तथापि सिंचनाची व्यवस्था असल्यास वर्षभरात केव्हाही लागवड करता येईल. त्यासाठी इतर प्राधिकाऱ्याच्या मंजुरीची आवश्यकता असणार नाही.
जिल्हास्तरीय समिती-
जिल्हाधिकारी- अध्यक्ष
मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.- सहअध्यक्ष
विभागीय वन अधिकारी सामाजीक वनीकरण- सहअध्यक्ष
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी- सदस्य
प्रकल्प संचालक आत्मा- सदस्य
कृषी विकास अधिकारी जि.प.- सदस्य
प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा- सदस्य सचिव
अधिक माहितीसाठी-
शासन निर्णय २९-०६-२०११ अन्वये विविध पिकांचे मापदंड
शासन निर्णय ९ ऑकटोबर २०१२ नुसार मग्रारोहयो अंतर्गत अनुज्ञेय कामे
विविध पिकांचे आर्थिक मापदंड शासन निर्णय १०-०८-२०२२ -सदर जीआर रद्द
शासन निर्णय २०-९-२०२२ अन्वये १०-८-२०२२ चा जी आर रद्द
नवीन पिकांचे मापदंड शासन निर्णय १५-१२-२०२२
बांबू व इतर वृक्ष प्रजातींचे मापदंड शासन निर्णय २६-५-२०२३
रेशीम उद्योग विकास योजना शासन निर्णय ६ सप्टेंबर २०२३
मजुरीचे दर २९७ रु.- १ एप्रिल २०२४ पासून
बांबू लागवड शासन निर्णय २७ जून २०२४