Total Pageviews

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी- 

अ. पिकांचे उत्पादन वाढावे यासाठी शेतकरी यांना बियाणे खते किटक नाशके तसेच इतर निविष्ठा खरेदी कराव्या लागतात. शेतकरी यांच्या या आर्थिक गरजांना पुरक म्हणून केंद्र शासनामार्फत शेतकरी कुटुंबाला  प्रती वर्ष 6000 रु थेट शेतकरी कुटुंब यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. (शेतकरी कुटुंब म्हणजे पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील मुले).            

ब. शेतकरी कुटुंबात खालील प्रमाणे एक किंवा अधिक सदस्य असल्यास त्या कुटुंबास या योजनेचा लाभ मिळनार नाही- 

1) आजी/माजी संवैधानीक पद धारण करणारे  

2) आजी व माजी मंत्री/राज्य मंत्री .आजी/माजी लोकसभा/राज्य सभा/विधान सभा/ विधान परिषद सदस्य. आजी/माजी महानगर पालिकेचे महापौर. आजी/माजी जिल्हा परिषद अध्यक्ष.  

3)सेवेत असणारे/निवृत्त झालेले सर्व अधिकारी/कर्मचारी. (वर्ग-4 कर्मचारी  वगळून).  

4) सर्व निवृत्ती वेतन धारक ज्यांचे उत्पन्न रु.10000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे. (वर्ग-4 कर्मचारी वगळून). 

5. सर्व व्यक्ती ज्यांनी मागिल कर निर्धारण वर्षी इन्कम टैक्स भरलेला आहे. 

6) नोंदणी कृत व्यावसायिक उदा. डॉक्टर्स, इंजिनीअर, वकील, लेखापाल, आर्किटेक्ट.        

या योजनेसाठी लाभार्थ्याची  पात्रता ठरवण्यासाठी अंतीम दिनांक- 1 फेब्रुवारी 2019. या तारखे नंतर पुढिल 5 वर्षे या पात्रता यादीत बदल केला जाणार नाही. मात्र खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर वारस पात्र राहिल.         


                                              
* PM KISAN योजना *

या योजनेअंतर्गत लाभार्थी  

https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx



यादी पाहण्यासाठी-