आत्मा यंत्रणे कडे गट नोंदणी करणे
आत्मा यंत्रणेकडे गट नोंदणी करणे-
वेगवेगळ्या पिक निहाय किंवा कृषी उत्पादन निहाय शेतकरी यांचे गट तयार करणे यामध्ये अपेक्षीत आहे.
एका गटा मध्ये 20-25 शेतकरी असावेत.
गटाच्या सदस्यांची बैठक महिन्यातून किमान एक वेळा होणे अपेक्षीत आहे.
तालुक्यातील त्या त्या पिकांचे गट एकत्र येउन गटांचा तालुका स्तरावर संघ करता येइल.
तसेच सर्व तालुक्यातील त्या विशिष्ट पिकाचे गट मिळून शेतकरी उत्पादक कंपनी तयार करता येइल.
गटांनी सर्व अभिलेखे, वेगवेगळ्या नोंद वह्या व रजिस्टर तसेच रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे. उदा. बैठकांचे इतिवृत्त, बँक पासबूक रकमांचा हिशेब इ .
1.या गटांना क्षमता वृद्धी, कौशल्य विकास यासाठी रु.5000 प्रती गट या प्रमाणे सहाय्य करण्यात येते.
2.तसेच सक्षम गटास बीज भांडवल/फिरता निधी यासाठी रु.10000 प्रती गट याप्रमाणे सहाय्य करण्यात येते.
3.याव्यतिरिक्त महिलांचे अन्न सुरक्षा गट तयार करण्यात येतात. या गटांना परसबाग, कुक्कुट पालन, शेळी पालन, अळिंबी ऊत्पादन, पशू संवर्धन इ . व्यवसाय सुरु करणेसाठी प्रशिक्षण, प्रकाशने व निविष्ठा खरेदी यासाठी रु.10000 इतके बीज भांडवल देण्यात येते.
4. उत्कृष्ट रित्या संघटीत असणारा व कार्य करणारे शेतकरी गटास रु.20000 इतके पारितोषीक देण्यात येते.
5. आवश्यक कागदपत्र-
गटाच्या प्रथम सभेचे इतिवृत्त
सदसयांचे वैयक्तिक अर्ज
सदस्यांचा ७/१२ व ८ अ
ओळख पत्र - आधार कार्ड / मतदान कार्ड
गटाचा करारनामा
गट नोंदणी फी रु. १००
बचत गट नोंदणी अर्जाचा नमुना
5. आवश्यक कागदपत्र-
गटाच्या प्रथम सभेचे इतिवृत्त
सदसयांचे वैयक्तिक अर्ज
सदस्यांचा ७/१२ व ८ अ
ओळख पत्र - आधार कार्ड / मतदान कार्ड
गटाचा करारनामा
गट नोंदणी फी रु. १००
बचत गट नोंदणी अर्जाचा नमुना