राज्यांतर्गत अभ्यास दौरे (आत्मा अंतर्गत)
राज्यांतर्गत अभ्यास दौरे-
शेतकरी यांना राज्यात सुरु असणारे कृषी विषयक नव नविन तंत्रज्ञान, संशोधन याबाबतची माहिती मिळावी व शेतकरी यांनी आपल्या शेतात या संशोधनाचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,शेतकरी सक्षम बनावेत आणि तंत्रज्ञान प्रसारामध्ये त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने राज्यात शेतकरी अभ्यास दौरे आयोजित करुन प्रशिक्षण संस्था/ संशोधन संस्था/प्रगतीशील शेतकरी यांची शेती, प्रक्रिया उद्योग इ . ठिकाणी भेटी आयोजित करण्यात येते.
प्रती शेतकरी प्रती दिन रु.500/- इतके अर्थ सहाय्य शेतकरी यांना देण्यात येते.
यामध्ये प्रवास खर्च (बस किंवा द्वितीय श्रेणी स्लीपर रेल्वे), जेवण, नाश्ता, राहण्याचा खर्च इ .चा समावेश आहे.
आत्मा कार्यालयाची परवानगीने शेतकरी स्वत: किंवा शेतकरी गट या अभ्यास दौरा करु शकतात.
हा अभ्यास दौरा कालावधी कमाल 5 दिवसांचा असतो (प्रवासाचा कालावधी वगळून).
शेतकरी अभ्यास दौरा आटोपून परत आल्यानंतर त्यांना प्रतीदिन कमाल रु. 500 इतके अर्थ सहाय्य जिल्हा स्तरावरुन पी एफ एम एस प्रणा लीद्वारे त्यांचे थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.