कृषी विषयक पुरस्कार
कृषी विभागा मार्फत शेती क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे शेतकरी/व्यक्ती/संस्था यांना विविध पुरस्कार दिले जातात.
1)डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार
2) वसंतराव नाईक कृषी भुषण पुरस्कार
3) जिजामाता कृषी भुषण पुरस्कार
4) सेंद्रीय शेती कृषी भुषण पुरस्कार
5) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार
6) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार
7) युवा शेतकरी पुरस्कार
8) उद्यान पंडीत पुरस्कार
पुरस्कारासाठी शेतकरी निवड करणेसाठी विविध स्तरावर खालीलप्रमाणे समित्या आहेत.
1.जिल्हास्तरीय समिती-
1)मा. जिल्हाधिकारी-अध्यक्ष
2)जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी-सदस्य
3)विस्तार कृषी विद्यावेत्ता/संबंधीत विद्यापीठ प्रतिनिधी-सदस्य
4)जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी-सदस्य
5)प्रकल्प संचालक आत्मा-सदस्य
6)कृषी विकास अधिकारी जि.प.-सदस्य
7)उपविभागीय कृषी अधिकारी(मुख्यालय)-सदस्य
8)कृषी पुरस्कार प्राप्त/पिकस्पर्धा विजेता/प्रगतशील शेतकरी यापैकी एक- सदस्य
9)कृषी उपसंचालक,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय- सदस्य सचिव
2.विभागस्तर समिती-
विभागीय कृषी सहसंचालक- अध्यक्ष
3. कृषी आयुक्तालय स्तर समिती-
आयुक्त कृषी- अध्यक्ष
4. सचिव स्तर समिती-
सचिव कृषी- अध्यक्ष
5. मंत्री स्तरावरील समिती-
मंत्री कृषी- अध्यक्ष
1) डॉ.पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार-
हा पुरस्कार राज्याच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. राज्यातील कृषी क्षेत्रात अती उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती/गट/संस्थेस दिला जातो. हा पुरस्कार राज्याच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. रु.300000 रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह (ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच व्यक्ती/गट/संस्थेस देण्यात येतो.
निकष-
1)कृषी क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणारे व्यक्ती/गट/संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो. त्यांचे कार्य संपुर्ण राज्याला दिशादर्शक आणि अतिउल्लेखनीय असावे.
2)केंद्र किंवा राज्य शासनाचा कोणताही कृषी पुरस्कार प्राप्त झालेला असावा.
3) शेतकरी यांच्या स्वत:च्या नावावर शेती असावी आणि कुटुंबीयासह त्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असावा.
4)यशस्वी उत्पादन, रोपवाटीका, बिजोत्पादन, सेंद्रीय निविष्ठा उत्पादन व वापर,काढणीत्तोर व्यवस्थापन, प्रतवारी, पैकहाऊस,साठवणुक, मुल्यवर्धन,प्रक्रिया,विपणन ,निर्यात इ.कार्यात सहभागी होवुन उल्लेखनीय कार्य करणारा व अधिक नफा मिळविणारा असावा.
5) यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, गोबर गैस, दुग्धव्यवसाय,सेंद्रीय शेती, गांडुळ खत यूनिट, कृषी प्रक्रिया, आधुनिक पद्धतीच्या शेती पद्धती, काढणीत्तोर व्यवस्थापन, पणन, निर्यात इ.बाबत परिसरातील शेतकरी यांना मार्गदर्शन करणारा असावा. पिकस्पर्धा, प्रदर्शन,मेळावे,संशोधन संस्थांना भेटी इ.उपक्रमामध्ये सहभागी होणारा तसेच परिसरातील शेतकरी यांना अशा उपक्रमात उद्युक्त करणारा असावा. पिक स्पर्धा , प्रदर्शने इ.मधील सहभाग/पारितोषिक इ.चा तपशील प्रस्तावासोबत पुराव्यासह देण्यात यावा.
6) शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणार्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 5 वर्ष इतके असावे.
7) संबंधिताकडून ते केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय/किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसुन किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी नसुन, सेवानिवृत्तीवेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसलेबाबत स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.
8) यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला अस्ल्यास ते पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.
9)प्रस्तावासोबत मूळप्रतीतील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयंघोषणापत्र(प्रपत्र-ई ),7/12,8अ, सादर करणे आवश्यक आहे.
10) जिल्हास्तरीय समितीमार्फत शेतीस प्रत्यक्ष भेट देऊन गुणांकन व मुल्यांकन केले जाते.
2. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार-
विजेते शेतकरी यांना रु.200000 चा धनादेश,स्मृतीचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्यातून दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार संख्या-8 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)
निकष-
1) प्रस्तावित शेतकरी यांचे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असावे व केंद्र किंवा राज्य शासनाचा कोणताही कृषी पुरस्कार प्राप्त झालेला असावा.
2) शेतकरी यांच्या स्वत:च्या नावावर शेती असावी आणि कुटुंबीयासह त्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असावा.
3) यशस्वी उत्पादन, रोपवाटीका, बिजोत्पादन, सेंद्रीय निविष्ठा उत्पादन व वापर,काढणीत्तोर व्यवस्थापन, प्रतवारी, पैकहाऊस,साठवणुक, मुल्यवर्धन,प्रक्रिया,विपणन ,निर्यात इ.कार्यात सहभागी होवुन उल्लेखनीय कार्य करणारा व अधिक नफा मिळविणारा असावा.
4) यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, गोबर गैस, दुग्धव्यवसाय,सेंद्रीय शेती, गांडुळ खत यूनिट, कृषी प्रक्रिया, आधुनिक पद्धतीच्या शेती पद्धती, काढणीत्तोर व्यवस्थापन, पणन, निर्यात इ.बाबत परिसरातील शेतकरी यांना मार्गदर्शन करणारा असावा. पिकस्पर्धा, प्रदर्शन,मेळावे,संशोधन संस्थांना भेटी इ.उपक्रमामध्ये सहभागी होणारा तसेच परिसरातील शेतकरी यांना अशा उपक्रमात उद्युक्त करणारा असावा. पिक स्पर्धा , प्रदर्शने इ.मधील सहभाग/पारितोषिक इ.चा तपशील प्रस्तावासोबत पुराव्यासह देण्यात यावा.
5) शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणार्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 3 वर्ष इतके असावे.
6) संबंधिताकडून ते केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय/किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसुन किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी नसुन, सेवानिवृत्तीवेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसलेबाबत स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.
7) शेतकरी/संस्था यांना यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला अस्ल्यास ते पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.
8)प्रस्तावासोबत मूळप्रतीतील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयंघोषणापत्र(प्रपत्र-ई ),7/12,8अ, सादर करणे आवश्यक आहे.
9) जिल्हास्तरीय समितीमार्फत शेतीस प्रत्यक्ष भेट देऊन गुणांकन व मुल्यांकन केले जाते.
3. जिजामाता कृषीभुषण पुरस्कार-
कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे महिला शेतकरी यांना हा पुरस्कार देण्यात येतो. रु. 200000 चा धनादेश, स्मृतिचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व पती सह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्यातून दरवर्षी देण्यात पुरस्कार संख्या-8 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)
निकष-
1) राज्यातील सर्व महिला शेतकरी या पुरस्कारासाठी पात्र असतील तथापी केंद्र किंवा राज्य शासनाचा कोणताही कृषी पुरस्कार प्राप्त असल्यास प्राधान्य देण्यात येते.
2) महिला शेतकरी यांच्या स्वत:च्या नावावर किंवा पतीच्या नावावर शेती असावी आणि त्या कुटुंबीयासह शेती करणार्या असाव्यात.
3) यशस्वी उत्पादन, रोपवाटीका, बिजोत्पादन, सेंद्रीय निविष्ठा उत्पादन व वापर,काढणीत्तोर व्यवस्थापन, प्रतवारी, पैकहाऊस,साठवणुक, मुल्यवर्धन,प्रक्रिया,विपणन ,निर्यात इ.कार्यात सहभागी होवुन उल्लेखनीय कार्य करणारी व अधिक नफा मिळविणारी महिला असावी.
4) यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, गोबर गैस, दुग्धव्यवसाय,सेंद्रीय शेती, गांडुळ खत यूनिट, कृषी प्रक्रिया, आधुनिक पद्धतीच्या शेती पद्धती, काढणीत्तोर व्यवस्थापन, पणन, निर्यात इ.बाबत परिसरातील शेतकरी यांना मार्गदर्शन करणारी असावी. पिकस्पर्धा, प्रदर्शन,मेळावे,संशोधन संस्थांना भेटी इ.उपक्रमामध्ये सहभागी होणारी आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रचार व प्रसार कार्यात सहभागी होणारी तसेच परिसरातील शेतकरी यांना अशा उपक्रमात सहभागासाठी उद्युक्त करणारी असावी. पिक स्पर्धा , प्रदर्शने इ.मधील सहभाग/पारितोषिक इ.चा तपशील प्रस्तावासोबत पुराव्यासह देण्यात यावा.
5) शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणार्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 3 वर्ष इतके असावे.
6) संबंधिताकडून ते केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय/किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसुन किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी नसुन, सेवानिवृत्तीवेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसलेबाबत स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.
7) शेतकरी/संस्था यांना यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला अस्ल्यास ते पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.
8) पतीला मिळालेल्या पुरस्काराकरीता पत्नीला पुन्हा नव्याने अर्ज करता येणार नाही.
9)प्रस्तावासोबत मूळप्रतीतील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयंघोषणापत्र(प्रपत्र-ई ),7/12,8अ, सादर करणे आवश्यक आहे.
10) जिल्हास्तरीय समितीमार्फत शेतीस प्रत्यक्ष भेट देऊन गुणांकन व मुल्यांकन केले जाते.
4. कृषी भुषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार-
सेंद्रीय शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणारे शेतकरी/संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो.
रु. 200000/- चा धनादेश, स्मृतिचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पती सह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
राज्यातून दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार संख्या-8 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)
निकष-
1) सेंद्रीय शेतीचे पिजीएस किंवा अन्य मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रमाणीकरण केलेले असावे.
2) सेंद्रीय शेती स्पर्धा,प्रदर्शने,चर्चासत्रे, सेंद्रीय शेती मेळाव्यातील मार्गदर्शन इ.मधील सहभाग/पारितोषिकाबाबतचा तपशील पुराव्यासह देण्यात यावा. त्याबाबतची छायाचित्रे,प्रमाणपत्र इ.सादर करणे आवश्यक राहील.
3) सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण घेतलेले असावे. सेंद्रीय शेती तंत्रज्ञान प्रसाराबाबत नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणे, त्याबाबतच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, स्वत: सेंद्रीय शेती गटाच्या माध्यमातून,कार्यशाळामधुन, प्रदर्शनातील सहभाग, सेंद्रीय शेती प्रचार व प्रसारासाठी केलेले कार्य इत्यादीतून कार्य केलेले असावे.
4)स्वत:चा शेतमाल सेंद्रीय म्हणुन विक्री केलेली असावी. तशा पद्धतीचा ब्रँड अस्ल्यास तपशील द्यावा.
5) गांडूळ कल्चर/ गांडूळ खत यूनिटच्या माध्यमातून सेंद्रीय खत तयार करुन त्याचा वापर स्वत: करणारा असावा तसेच इतर शेतकरी यांनाही प्रोत्साहन देणारा असावा.
6)बायोडायनामिक कंपोस्ट/नाडेप यासारख्या सुधारित पद्धतीने सेंद्रीय खत तयार करुन स्वत:च्या शेतामध्ये वापरणारा असावा. रासायनीक पदार्थांचा वापर न करता आणि बाजारातून सेंद्रीय निविष्ठा खरेदी न करता स्वत:च्या शेतावर दशपर्णी अर्क, जिवामृत, बीजामृत, निंबोळी अर्क, निंबोळी पावडर यासारख्या सेंद्रीय निविष्ठा वापरणारा असावा.
7) पिक संरक्षणासाठी एकत्मिक किड व्यवस्थापन, जैविक किटकनाशके,विविध पिक पद्धती, वनस्पतीजन्य किटकनाशके वापरणारा असावा.
8) सेंद्रीय शेती पद्धतीचा किमान पाच वर्ष अवलंब केलेला असावा. सेंद्रीय शेती/शेती उत्पादनाचे प्रमाणीकरण केले असल्यास प्राधान्य देण्यात यावे. परिसरातील शेतकरी यांचे समवेत समूह पद्धतीने सेंद्रीय शेती करुन सेंद्रीय शेतीमालास बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी नेतृत्व करणारा असावा.
9)शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणार्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 3 वर्ष इतके असावे.
10) संबंधिताकडून ते केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय/किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसुन किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी नसुन, सेवानिवृत्तीवेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसलेबाबत स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.
11) यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला अस्ल्यास ते पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.
12)प्रस्तावासोबत मूळप्रतीतील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयंघोषणापत्र(प्रपत्र-ई ),7/12,8अ, सादर करणे आवश्यक आहे.
कृषी भुषण सेंद्रीय शेती पुरस्कारासाठी संस्थेचे निकष-
1) संस्था नोंदणीकृत असावी( स्थापना झाल्याचा रजिस्ट्रेशन नंबर व दिनांक असणे आवश्यक आहे).
2) संस्थेकडे असलेले तांत्रिक मनुष्यबळ तपशिलासह( शैक्षणिक पात्रता,अनुभव,अवगत केलेले तंत्रज्ञान, तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी घेतलेले प्रशिक्षण इ.) माहिती असावी.
3) संस्थेने सेंद्रीय शेतीमाल विक्री व्यवस्थेमध्ये भरीव कामगीरी केलेली असावी.
4) संस्थेचे कार्यक्षेत्र दर्शविणारी माहिती असावी.
5) संस्थेचे एकुण सभासदांची संख्या नमुद करण्यात यावी.
6)संस्थेचे ऊद्देश,संस्थेची घटना/नियमावली इ.माहिती असावी.
7)संस्थेशी संलग्न इतर संस्थांची माहिती असावी.
5. वसंतराव नाईक शेतिमीत्र पुरस्कार-
शेती क्षेत्रात प्रभावीरित्या विस्तार कार्य करणारे व्यक्ती/संस्था/वृत्तपत्र/साप्ताहिके/मासिके/दुरचित्रवाहिन्या यांना हा पुरस्कार दिला जातो. संबंधीत व्यक्ती शेतकरी असावा किंवा त्याच्या नावावर 7/12 असावा असे बंधन नाही. मात्र शेतकरी अस्ल्यास त्यास प्राधान्य देण्यात येईल. रु.120000 चा धनादेश, स्मृतीचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र, सपत्निक/पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
राज्यातून दरवर्षी देण्यात पुरस्कार संख्या-8 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)
निकष-
1) कृषीविषयक दैनिक/साप्ताहिक/मासिका मधुन अभ्यासपुर्ण लेख, कृषी विषयक योजनांची प्रचार प्रसिद्धी, शेतकरी यांच्या यशोगाथा इ.बाबतची माहिती देनार्या तसेच प्रिंट/इलेक्ट्रॉनिक यासारख्या समाजमाध्यमांचा वापर करुन जास्तीत जास्त शेतकरी यांना मार्गदर्शन करुन कृषी विकासात योगदान देनार्या व्यक्ती/संस्था/वृत्तपत्र/साप्ताहिके/मासिके/दुरचित्रवाहिन्या यांना हा पुरस्कार दिला जातो.
2) शासनाच्या कृषी विषयक धोरणांचा, प्रचार व प्रसिद्धी मध्ये सक्रिय सहभाग असावा.
3) शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणार्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 3 वर्ष इतके असावे.
4) संबंधिताकडून ते केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय/किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसुन किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी नसुन, सेवानिवृत्तीवेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसलेबाबत स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.
5) व्यक्ती/संस्था यांना यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला अस्ल्यास ते पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.
6)प्रस्तावासोबत मूळप्रतीतील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयंघोषणापत्र(प्रपत्र-ई) सादर करणे आवश्यक आहे.
7) जिल्हास्तरीय समितीमार्फत शेतीस प्रत्यक्ष भेट देऊन गुणांकन व मुल्यांकन केले जाते.
6. वसंतराव नाईक शेतिनीष्ठ शेतकरी पुरस्कार-
रु.44000 चा धनादेश, स्मृतीचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
राज्यातून दरवर्षी देण्यात पुरस्कार संख्या-40 (सर्वसाधारण गटासाठी प्रती जिल्हा 1 याप्रमाणे 34 आणि आदिवासी गटासाठी प्रती विभाग 1 याप्रमाणे 6)
1) शेतकरी यांच्या स्वत:च्या नावावर शेती असावी आणि तो कुटुंबीयासह त्यांचा शेती करणारा असावा.
2) शेतकरी यांचे उदरनिर्वाहाचे/चरितार्थाचे मुख्य साधन शेती व्यवसाय आहे हे संबंधीत शेतकरी यांनी स्वप्रमाणीत करावे.
3)प्रस्तावीत शेतकरी हा एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणारा असावा.
4) यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन,गोबर गैस, दुग्धव्यवसाय, गांडूळ खत यूनिट इ.आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा असावा.
5) शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणार्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 3 वर्ष इतके असावे.
6) संबंधिताकडून ते केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय/किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसुन किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी नसुन, सेवानिवृत्तीवेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसलेबाबत स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.
7) शेतकरी/संस्था यांना यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला अस्ल्यास ते पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.
8)प्रस्तावासोबत मूळप्रतीतील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयंघोषणापत्र(प्रपत्र-ई ),7/12,8अ, सादर करणे आवश्यक आहे.
9) जिल्हास्तरीय समितीमार्फत शेतीस प्रत्यक्ष भेट देऊन गुणांकन व मुल्यांकन केले जाते.
7. उद्यानपंडीत पुरस्कार-
फलोत्पादन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे शेतकरी यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
रु. 100000/-चा धनादेश, स्मृतीचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
राज्यातून दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार संख्या-8 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)
निकष-
1) शेतकरी स्वत: आधुनिक पद्धतीने फलोत्पादन पिके(फळे,भाजीपाला, फुले, मसाला पिके,सुगंधी औषधी वनस्पती इ.)घेणारा असावा. शेतकरी यांचे नावे शेती असावी.चालू वर्षातील 7/12 व 8अ वर फलोत्पादन पिकांच्या नोंदी असणे आवश्यक आहे. फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असावे.
2) फलोत्पादनांतर्गत यशस्वी उत्पादन, रोपवाटिका,बिजोत्पादन,सेंद्रीय निविष्ठा उत्पादन व वापर, काढणीत्तोर व्यवस्थापन,प्रतवारी, पैक हाऊस, साठवणूक, मुल्यवर्धन,प्रक्रिया, विपणन, निर्यात इ. कार्यात सहभागी होवुन उल्लेखनीय कार्य करणारा व अधिक नफा मिळवणारा असावा.
3)आधुनिक पद्धतीच्या फलोत्पादन शेती पद्धती, काढणीत्तोर व्यवस्थापन,पणन,निर्यात इ.बाबत परिसरातील शेतकरी यांना मार्गदर्शन करणारा असावा. याबरोबरच, फलोत्पादनासंबंधी विविध स्पर्धा, प्रदर्शन, मेळावे,संशोधन संस्थांना भेटी इ.उपक्रमामध्ये सहभागी होणारा आणि फलोत्पादन तंत्र प्रचार व प्रसार कार्यात सहभागी होणारा तसेच परिसरातील शेतकरी यांना अशा उपक्रमात सहभागासाठी उद्युक्त करणारा असावा.फळपीक स्पर्धा,प्रदर्शने इ.मधील सहभाग/पारितोषिक इ.चा तपशील प्रस्तावासोबत पुराव्यासह देण्यात यावा.
4) शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणार्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 3 वर्ष इतके असावे.
5) संबंधिताकडून ते केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय/किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसुन किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी नसुन, सेवानिवृत्तीवेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसलेबाबत स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.
6) यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला अस्ल्यास ते पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.
7)प्रस्तावासोबत मूळप्रतीतील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयंघोषणापत्र(प्रपत्र-ई ),7/12,8अ, सादर करणे आवश्यक आहे.
8) जिल्हास्तरीय समितीमार्फत शेतीस प्रत्यक्ष भेट देऊन गुणांकन व मुल्यांकन केले जाते.
8. युवा शेतकरी पुरस्कार-
रु. 120000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
राज्यातून दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार संख्या-8 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)
निकष-
1)प्रस्ताव सादर करतेवेळी शेतकरी यांचे वय 18 ते 40 वर्षे असावे.
2) शेतकरी यांच्या स्वत:च्या नावावर किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावे शेती असावी आणि तो स्वत: कुटुंबीयासह शेती करणारा असावा(आई वडिल पती पत्नी यापैकी एका कुटुंबीयाच्या नावावर शेती असावी)
3) शेतकरी यांचे उदरनिर्वाहाचे/चरितार्थाचे मुख्य साधन शेती व्यवसाय आहे हे संबंधीत शेतकरी यांनी स्वप्रमाणीत करावे.
4)प्रस्तावीत शेतकरी हा एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणारा असावा.
5) यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन,गोबर गैस, दुग्धव्यवसाय, गांडूळ खत, सेंद्रीय शेती इ.आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा असावा.
6) प्रक्रिया, विक्री व गट संघटन कार्य यामध्ये सक्रिय सहभाग असावा.
7) प्रसार/समाज माध्यमांचा कृषी विषयक माहिती प्रचार व प्रसिद्धीसाठी उपयोग करणारा असावा.
8)शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणार्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 3 वर्ष इतके असावे.
9) संबंधिताकडून ते केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय/किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसुन किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी नसुन, सेवानिवृत्तीवेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसलेबाबत स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.
10) यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला अस्ल्यास ते पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.
11)प्रस्तावासोबत मूळप्रतीतील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयंघोषणापत्र(प्रपत्र-ई ),7/12,8अ, सादर करणे आवश्यक आहे.
12) जिल्हास्तरीय समितीमार्फत शेतीस प्रत्यक्ष भेट देऊन गुणांकन व मुल्यांकन केले जाते.
9. डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार-
हा पुरस्कार कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे साठी आहे.
राज्यातून दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार संख्या-9
( 8 कृषी विभागातून प्रत्येक एक अधिकारी/कर्मचारी आणि कृषी आयुक्तालय /मंत्रालय स्तरावरुन एक अधिकारी/कर्मचारी)
शासन निर्णय दि ६ सप्टेंबर!२०१४
10.उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्कार-
राज्यातून दरवर्षी देण्यात पुरस्कार संख्या-1