एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन-
यामध्ये सूक्ष्म मुल द्रव्ये, जिप्सम/गंधक, व जैविक खते या बाबींचा समावेश होतो.
1.सूक्ष्म मुल द्रव्ये-
सूक्ष्म मुल द्रव्याच्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के , कमाल रु.500 प्रती हे. अनुदान देय आहे.
त्यासाठी लाभार्थी शेतकरी गटाने शिफारशी प्रमाणे सूक्ष्म मुल द्रव्ये खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने खरेदी करावीत व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.
लाभार्थी शेतकरी यांनी कृषी निविष्ठांची खरेदी कैशलेस पद्धतीने अथवा रोखीने करावी.
लाभार्थी शेतकरी यांनी वस्तू व सेवा कर क्रमांक असलेली खरेदी पावती सादर करणे बंधनकारक राहिल.
तसेच एका लाभार्थी शेतकरी यांना एका वर्षात सर्व बाबी मिळून जास्तित जास्त 5 हेक्टर पर्यंत लाभ घेता येइल.
2. फॉस्फोजिप्सम/गन्धक(80 wg ) वापर-
कड धान्य पिकांकरीता फॉस्फोजिप्सम/गंधकाचा वापर जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशी नुसार करावा.
फॉस्फोजिप्सम/गंधकाच्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के , कमाल रु. 750 प्रती हे. अनुदान देय आहे.
3. जीवाणू खते-
सदर बाब फक्त कड धान्य व पौष्टिक तृण धान्य कार्यक्रमासाठी लागू आहे.
कृषी विभागाच्या जैविक प्रयोगशाळे मार्फत पिक गटास आवश्यक द्रवरुप जैविक खते/जैविक खते संघ (liquid consortia) तयार करण्यात येत असुन सदर खतांची बीज प्रक्रिया केल्यास उत्पादन खर्चात बचत करुन पिकांच्या उत्पादकतेत वाढ होते.
द्रवरुप जीवाणू संघ (liquid consertia) यामध्ये नत्र स्थिरी करण करणारे, स्फूरद विरघळविणारे व जस्त विरघळविणारे जीवाणू उपलब्ध करुन देणारे यापैकी कमीत कमी दोन किंवा अधिक जिवाणुंचा समावेश असतो.
शेतकरी गटाने जीवाणू खतांची खरेदी प्रथम प्राधान्याने शासकीय प्रयोग शाळा, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र यांच्या कडून करावी.
शेतकरी यांना खुल्या बाजारातुन जीवाणू खते खरेदी करावयाची असल्यास किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.300 प्रती हेक्टर अनुदान देय आहे.
शेतकरी गटाने खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने खरेदी करावीत व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.
अर्ज कुठे करावा-
तालुका कृषी अधिकारी कार्यालय