Total Pageviews

राष्ट्रीय कृषी विकास योजना - महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य (श्री अन्न ) अभियान

राष्ट्रीय कृषी विकास योजना - महाराष्ट्र  पौष्टीक तृणधान्य (श्री अन्न ) अभियान 

हे अभियान ज्वारी, बाजरी, नाचणी , वरई  या पिकांसाठी  राज्यातील ३४  जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. 
या पिकांचे क्षेत्र व उत्पादकता वाढावी या उद्देशाने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या अभियानात कोणत्या बाबी किंवा घटक शेतकऱ्यांसाठी  राबविण्यात येतात-


पीक प्रात्यक्षिके
शेतकरी प्रशिक्षण/शेतीशाळा
अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण
जिल्हास्तरीय शेतकरी शास्त्रज्ञ भेट व संवाद


१.पिक प्रात्यक्षिके-
रु. ६००० प्रती हेक्टर अनुदान  

लाभार्थी निवड निकष-

या बाबीचा लाभ शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी/कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांना मिळतो.  ३१ मार्च २०२४ पूर्वीची नोंदणी असावी.

एका कुटुंबातील (पती,पत्नी व १८ वर्षांखालील अपत्य) एकाच व्यक्तीस लाभ. 

एका गटात २५ शेतकऱ्यांना लाभ 

शेतकरी यांची AgriStack वर नोंदणी असणे बंधनकारक.  

अजा १२%,अज ९% व सर्वसाधारण लाभार्थी ७९ % निवडण्यात येणार. यामध्ये वनपट्टाधारक शेतकरी व दिव्यांग शेतकरी यांची प्रथम प्राधान्याने निवड. एकूण लाभार्थींपैकी ३०% महिला लाभार्थी असणे आवश्यक. 

प्रति शेतकरी ०. ४० हेक्टर चा लाभ. 

मागील १० वर्षाच्या आतील अधिसूचित व विद्यापीठाने शिफारस केलेल्या वाणाचे प्रमाणित बियाणे प्रात्यक्षिकासाठी वापरणे आवश्यक. 

लाभार्थी यांनी मृदा चाचणी केलेली असावी. 

पिक प्रात्यक्षिकां साठी विभागिय स्तरावर  कृषी  विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार जिल्हा/तालुका/पिक निहाय निर्धारित तंत्रज्ञान पैकेज नुसार सर्व घटक अंमलबजावणी साठी हे अनुदान आहे.  रासायनिक खतावरिल खर्च लाभार्थी शेतकरी यांनी स्वत: करावयाचा आहे त्यासाठी  अनुदान देय नाही.

 

२. शेतकरी प्रशिक्षण/शेतीशाळा-


ज्या शेतकऱ्यांची पीक प्रात्यक्षिकासाठी निवड झाली आहे त्यांची प्राधान्याने निवड .

३० शेतकरी यांचेसाठी ४ सत्र. रु. ३५००/- प्रति सत्र. याप्रमाणे ४ सत्रासाठी एकूण रु. १४०००/- तरतूद


३. अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण-


२० अधिकारी कर्मचारी यांचे साठी २ दिवसीय प्रशिक्षण. प्रति प्रशिक्षणार्थी प्रति दिन रु. ९०० तरतूद. दोन दिवसासाठी एकूण रु. ३६०००/- तरतूद.


४. जिल्हास्तरावर शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवाद कार्यशाळा-


२५ शेतकरी यांचेसाठी दोन दिवसीय कार्यशाळा. प्रति कार्यशाळा रु. २०००० तरतूद. जिल्ह्यासाठी एकूण दोन कार्यशाळा.


अर्ज कुठे करावा-


अर्ज mahadbt.maharashtra.gov.in  पोर्टल वर करावा . 





                             ---××---