सूक्ष्म सिंचन संच वितरक नोंदणी
सूक्ष्म सिंचन संच वितरक नोंदणी-
सूक्ष्म सिंचन संच बसवीणे साठी शेतकरी यांना शासना मार्फत 80 टक्के पर्यंत अनुदान मिळते. परंतू हे सूक्ष्म सिंचन संच शेतकरी यांना अधिकृत वितरक यांचे कडूनच खरेदी करावे लागतात. तरच शेतकरी यांना अनुदान मिळते
त्यामुळे तालुका कृषी अधिकारी यांचे कडून पुर्व संमती मिळाल्यानंतर शेतकरी यांनी अधिकृत वितरकांकडूनच सूक्ष्म सिंचन संच खरेदी करुन बसविणे आवश्यक आहे.
सूक्ष्म सिंचन संच वितरक नोंदणीसाठी खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.
१. विहित प्रपत्रातील पुर्ण भरलेला अर्ज (फोटोसह)
२. १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर विहित प्रपत्रातील करारनामा (नोटरी केलेला)
३. दुकान सुरु असल्याबाबतचे ग्रामपंचायत / नगर पालिकेचा दाखला किंवा शॉप अक्ट प्रमाणपत्र
४. सन २०१९-२० करीत मान्यताप्राप्त ठिबक / तुषार कंपंनीचे वितरक प्रमाणपत्र
५. दुकान भाड्यावर घेतलेले असल्यास जागा मालकाचे नाव असलेला जागेचा उतारा किंवा ग्रामपंचायत / नगरपालिका कर भरणा पावतीची झेरॉक्स प्रत
६. जी एस टी प्रमाणपत्र
७. रुपये २७५० GRAS प्रणालीद्वारे काढलेले, पारित करून घेतलेले व भारतीय स्टेट बँकेत भरणा केलेले मूळ व झेरॉक्स प्रत
८. वितरक (दुकान) स्थळ जागेचा उतारा
९. रुपये १००००/- रकमेची स्टॅम्प पेपरवरील मूळ बँक गॅरंटी व झेरॉक्स प्रत
१०. पॅन कार्ड झेरॉक्स प्रत
११. बँक पास बुक झेरॉक्स प्रत
१२. आधार कार्ड झेरॉक्स प्रत
१३. वितरकाचे परिशिष्ठ ८ क - कंपनीकडून प्राप्त सूक्ष्म सिंचन घटकाचा तपशील, ८ ड - शेतकऱ्यांना वाटप केलेले सूक्ष्म सिंचन घटक तसेच ८ इ - सूक्ष्म सिंचन घटक पोटी शासनास भरणा केलेल्या GST ची रक्कम
सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत विक्रेता/ वितरकास कमाल दोन कंपनीसाठी नोंदणी करता येईल.
सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत विक्रेता/ वितरकास लगतचे दोन जिल्हात नोंदणी करता येईल.यासाठी कोणताही एका जिल्ह्यामध्ये नोंदणी शुल्क व आवश्यक रकमेची बँक गॅरंटी सादर करून नोंदणी करावी व त्याआधारे लगतच्या जिल्ह्यामध्ये नोंदणी करावी.यासाठी वेगळे शुल्क व बँक गॅरंटी देण्याची आवश्यकता नाही.
सदर नोंदणीकरिता प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी कार्यालयास सादर करावा.