Total Pageviews

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानूग्रह अनुदान योजना

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना-


शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तिमूळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बरेच शेतकरी यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवुन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी/ त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.  


1. पात्रता-  राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहीतीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेले शेतकर्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य. (आई-वडिल, शेतकर्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती)असे एकुण 2 जणांकरिता ही योजना आहे.


2. वयोमर्यादा-10 ते 75 वर्षे.    

                                             

3. नुकसान भर्पाइची रक्कम-                 

अ.-अपघाती मृत्यू- रु.2 लाख,                          

ब.- अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे- रु.2 लाख                                  

क.-  अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे- रु. 2 लाख,                                

 ड.- अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.1 लाख.       

                                       

4.  शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वीत असलेल्या योजनेचा लाभ घेतला अस्ल्यास या योजनेत लाभ मिळणार नाही.


 5. अर्ज कुठे करावा- 

तालुका कृषी अधिकारी कार्या लयात.      


  6. आवश्यक कागदपत्र-

  1. 7/12

  2. मृत्युचा दाखला

  3. शेतकर्यांचे वारस म्हणुन तलाठ्याकडील गाव नमुना नं. 6क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद.

  4. शेतकर्याच्या वयाच्या पडताळणीकरीता शाळा सोडल्याचा दाखला/ आधारकार्ड/निवडणूक ओळखपत्र. ज्या कागदपत्रा आधारे ओळख/वयाची खात्री होइल असे कोणतेही कागदपत्र.

  5. प्रथम माहिती अहवाल/स्थळ पंचनामा/पोलिसपाटील माहिती अहवाल

  6. अपघाताच्या स्वरुपानुसार सादर करावयाची कागदपत्रे



7. सदर योजने अंतर्गत पात्रतेसाठी कोणत्या अपघातांचा समावेश आहे व त्यासाठी लागणारी अतिरिक्त कागदपत्रे-


1)रस्ता/रेल्वे अपघात- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना.

2) पाण्यात बुडून मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व शतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.

3) जंतूनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल(व्हिसेरा)

4) विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल

5) वीज पडून मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल

6) खून- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल(व्हिसेरा), दोषारोप पत्र.

7) उंचावरून पडून झालेला अपघात-इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, पोलिस अंतीम अहवाल.

8) सर्पदंश व विंचूदंश-इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल,वैद्यकीय उपचारापुर्वीच निधन झाल्याने पोस्ट मोर्टेम झाले नसल्यास या अहवालातून सुट मात्र वैद्यकीय अधिकार्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकार्याकडून प्रतीस्वाक्षरीत असणे आवश्यक.

9) नक्षलवाद्या  कडून झालेल्या हत्या- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, नक्षलवादी हत्येसंदर्भातील कार्यालयीन कागदपत्र.

10) जनावरांच्या खाल्ल्यामूळे/चावल्यामुळे जखमी /मृत्यू-

अ) जनावरांच्या चावण्यामुळे रेबीज होवुन मृत्यू- औषधोपचाराची कागदपत्रे.

ब) जखमी होवुन मृत्यू-इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल

क) जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होवुन शव न मिळणे- क्षतीपुर्ती बंधपत्र आवश्यक.

11) बाळंतपणातील मृत्यू- बाळंतपणात मृत्यू झाला असलेबाबत वैद्यकीय अधिकार्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकार्याकडून प्रतीस्वाक्षरीत केलेले.

12) दंगल- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, दंगलीबाबतची कार्यालयीन कागदपत्रे.

13) अन्य कोणतेही अपघात-इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, पोलीस अंतीम अहवाल.

14) अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे- अ) अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतीम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या नोंदी. ब) प्राथमीक आरोग्य केंद्र/उपकेंद्र/जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतीस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र.


टीप- वरील कागदपत्रे मूळ किंवा राजपत्रीत अधिकारी यांनी स्वाक्षांकीत केलेले अथवा स्वयंसाक्षांकीत असल्यास ग्राह्य धरण्यात येईल.

मृत्यू कारणाची नोंद सक्षम प्राधिकार्याने स्पष्ट केली असल्यास रासायनीक विश्लेषन अहवाल(व्हिसेरा) या कागदपत्रांची आवश्यकता राहणार नाही.


8. आधिक माहिती साठी-


शासन निर्णय दि. १९-४-२०२३