Total Pageviews

रेशिम उद्योग

रेशीम उद्योग एक शेती पूरक उद्योग 


१. रेशीम उद्योग का ?

अ. रेशीम उद्योगापासून दरमहा शाश्वत उत्पन्न मिळू शकते. 

ब. एकदा लागवड केली कि १२-१५ वर्ष लागवडीचा खर्च नाही. तसेच एकदा संगोपन गृह तयार केले व साहित्य खरेदी केले कि पुन्हा पुन्हा खर्च नाही. 

क. इतर बागायती पिकांच्या तुलनेत तुतीला पाणी कमी लागते. 

ड. रेशीम अळ्यांच्या संगोपनासाठी पाला वापरला जात असल्याने तुती बागेस कीटकनाशके, बुरशीनाशके इ. फवारणीचा खर्च नाही. 

इ. अळ्यांनी खाऊन राहिलेला पाला जनावरांना दिल्यास त्यांच्या दुधाच्या प्रमाणात व फॅट्स च्या प्रमाणामध्ये वाढ होते. 

ई. संगोपनातील कचरा, काड्या, अळ्यांची विष्ठा, खाऊन राहिलेला पाला कुजवून चांगले खत तयार होते व या खतात गांडूळ सोडल्यास अतिशय चांगल्या प्रकारचे गांडूळ खत यापासून मिळते. 



२. खालीलपैकी कोणताही योजनेतून लाभार्थी लाभ घेऊ शकतात. 

अ. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना 

ब. केंद्र पुरस्कृत योजना - सिल्क समग्र (ISDSI) 


३. मिळणारे अनुदान - 

अ. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना - या योजने अंतर्गत १ एकरसाठी तुती लागवड जोपासना तसेच साहित्य खरेदी (रोपे,खते,औषधी) यासाठी एकूण रुपये २००१७६/- इतके अनुदान ३ वर्षात विभागून दिले जाते. तसेच किटक संगोपन गृह बांधकामासाठी एका वर्षात रुपये ९२२८९/- इतके अनुदान देण्यात येते. या योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थी यांचेकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. 

    

ब. केंद्र पुरस्कृत योजना - सिल्क समग्र (ISDSI) - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये न बसणाऱ्या लाभार्थीसाठी ही योजना आहे. 

बाब            प्रकल्पाची एकूण किंमत (१एकरासाठी)

१. तुती लागवड विकास योजना    ५००००/-

२. संगोपन गृह उभारणे         १६८६३९/-

३. चॉकी केंद्रासाठी         ६०००००/- व 
१२०००००/-

४. किसान रोपवाटिकेसाठी     १५००००/-

५. किटक संगोपन साहित्य पुरवठा ७५०००/-

६. मल्टी एन्ड रिलिंग मशीन     १७०९०००/-

७. ऑटोमॅटिक रिलिंग मशिन 

४०० एन्ड         १४१०२०००/-

२०० एन्ड         ७९८३०००/-

८. ठिबक सिंचन             ५००००/-    


सर्वसाधारण लाभार्थीसाठी वरील मापदंड्याच्या ७५ टक्के अनुदान ३ वर्षात मिळते. तसेच अनुसूचित जाती, जमाती लाभार्थीसाठी वरील मापदंड्याच्या ९० टक्के अनुदान ३ वर्षात मिळते.    


४. क्षेत्र मर्यादा - एक एकर (०.४० हेक्टर)


५. अर्ज कुठे करावा - सर्व प्रथम रेशीम संचालनालयाची  www.mahasilk.maharashtra.gov.in या वेबसाईट वर साईन अप मध्ये New user वर क्लिक करून I Agree  केल्यानंतर Stake Holder मध्ये - Farmer - Mulberry/Tasar  वर क्लीक करावे. त्यानंतर शेतकऱ्यांनी सर्व माहिती भरून शेवटी स्वतः चा पासपोर्ट साईजचा फोटो,आधार कार्ड व बँक पास बुक ची फोटो कॉपी Upload करावी. शेवटी Submit केल्यानंतर शेतकऱ्याचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाल्याचे कॉम्पुटर च्या screen वर sms येईल. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संबंधित जिल्हा रेशीम कार्यालयास जाऊन ७/१२, ८ अ, बँकेच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, जॉब कार्ड इ. नोंदणी शुल्कासह देऊन नोंदणीचे काम पूर्ण करावे. 







रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर 

प्रशासकीय इमारत क्र.२, ६ वा माळा, बी विंग,

सिव्हिल लाईन, नागपूर 


फोन नंबर ०७१२-२५७९९२०, २१, २४, २६, २७, २८

ईमेल - dos.maha@gmail.com 

Website - www.mahasilk.maharashtra.gov.in