Total Pageviews

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

भाउसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना


अ .लाभार्थी पात्रता-
1) शेतकरी यांचे स्वत:चे नावे 7/12 असणे आवश्यक.
2) जर 7/12 उतारावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडी साठी संमती पत्र आवश्यक.
3) 7/12 उतारा वर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमतीपत्र आवश्यक.
4) संस्थात्मक लाभार्थी यांना लाभ देय नाही.
5) महात्मा गांधी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवडी साठी पात्र ठरू शकत नाहीत असे शेतकरी या योजनेत लाभ घेण्यास पात्र.


ब. क्षेत्र मर्यादा-
कोंकण विभागासाठी- किमान 0.10 हेक्टर व कमाल- 10 हेक्टर पर्यंत.
उर्वरीत विभागकिसाठी -किमान 0.20 हे. व कमाल 6.00 हे. पर्यंत लाभ घेता येइल.


क. अनुदान मर्यादा -

100 टक्के.

अनुदान हे 3 वर्षाच्या कालावधीत मिळ

अनुदान पात्रते साठी दुसरे वर्षी किमान 80 टक्के तर तीसरे वर्षी किमान 90 टक्के झाडे जिवंत असणे आवश्यक आहे.



ड. अर्ज कुठे करावा-
https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा.

आवश्यक कागदपत्र-
1. ७/१२ उतारा
2. ८अ
3. सामायिक क्षेत्र अस्ल्यास इतर खातेदारांचे सहमती पत्र
4. आधार कार्ड
5. आधार लिंक बँक खाते क्रमांक.
6. कागदी लिंबू, संत्रा व मोसंबी या लागवडीकरिता माती परिक्षण अहवाल आवश्यक.



इ. लागवड कालावधी-
जून ते मार्च.

शेतकरी यांना आवश्यकतेनुसार कृषी विद्यापीठाने कृषी हवामान क्षेत्रासाठी शिफारस केलेल्या फळपिकांच्या कलमा रोपांची लागवड करता येइल.

या योजनेत एकुण 16 प्रकारची फळ्पीकांची कलमे/रोपे समाविष्ट आहेत.

शेतकरी यांना फळबाग लागवडी साठी कृषी विभाग,कृषी विद्यापीठ रोपवाटिका, राष्ट्रिय बागवानी मंडळ मार्फत मानांकित खाजगी रोपवाटिका तसेच कृषी विभागाच्या परवाना धारक खाजगी रोपवाटीकेतून कलमे रोपे खरेदी करता येतिल.
कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्या रोप वाटीके तून खरेदी साठी परवाना देण्यात येईल.

तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर लाभार्थी यांनी फळबाग लागवड करावी.

ई ) लागवड अंतर व मिळणारे अनुदान प्रती हेक्टर-

अ. क्र.


फळपीक 

तीन वर्षात मिळणारे अनुदान (रु.)

कलमे 

१.

आंबा कलमे  (10x10 मी)

७४३६७ 

२.

आंबा कलमे(5x5 मी)

१४३७०० 

३.

पेरु कलमे (6x6 मी)- 

७९४६२ 

४.

पेरु कलमे (३x२ मी)- 

237702

५.

संत्रा  मोसंबी  कलमे (6x 6मी) 

९११९५ 

६.

संत्रा कलमे ( ६x ३). 

१३५३५५ 

७.

कागदी लिंबू (६ x ६ मी.)

७७८९९ 

८.

सिताफळ (5x 5 मी)- 

९३१११ 

९.

चिकू कलमे (१० x १० मी.).

७१२३२ 

१०.

डाळिंब कलमे(4.5x3 मी)

१२९७८६ 

११.

काजू (७x ७) 

७३३२७ 

१२.

आवळा (७x ७) 

६५१२५ 

१३.

चिंच  / जांभूळ  ( १०x १०)

६३०७२ 

१४.

कोकम  (७x ७)

६३८५० 

१५.

फणस  ( १०x १०). 

६०५४७ 

१६.

अंजीर कलमे (४.५x ३)

१२९४०७ 

१७ 

नारळ रोपे (बाणावली/ टीडी ) पिशवीसहीत  ( ८ x  ८)

१०७४९७ 

१८ 

नारळ रोपे (बाणावली) पिशवी विरहीत  ( ८ x  ८)

८४०९७ 

१९ 

नारळ रोपे (टीडी ) पिशवी विरहीत  ( ८ x  ८)

८९४९७ 



                                             
) अधिक माहिती साठी-

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना मार्गदर्शक सूचना दि. 17.10.2022