Total Pageviews

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना-

ऊद्देश
अनुसूचीत जमाती प्रवर्गातील शेतकरी यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवन मान उंचावणे.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी यांना देण्यात येणारे अनुदान-
१. नविन विहिर- रु.४०००००/-
२. जुनी विहिर दुरुस्ती- रु. १०००००/-
३.शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरिकरण- रु.२०००००/-
४. इनवेल बोअरिंग- रु.४००००/-
५. विज जोडणी आकार- रु.२००००/-
६.पंप संच (डीझेल/विद्युत)- रु.४००००/- (10 एचपी क्षमते पर्यंतच्या पंप करिता)
७.सोलर पंप(वीज जोडणी आकार व पंप संच ऐवजी) रु.५००००
८.पिव्हिसी/एचडीपीई पाइप- रु.५००००/-
९.सूक्ष्म सिंचन संच- ठिबक सिंचन- रु.९७०००/-, तुषार सिंचन- रु. ४७०००/-
१०. यंत्रसामुग्री रु. ५००००
११. परसबाग- रु. ५०००/-
१२. विंधन विहीर रु. ५००००



सदर योजने अंतर्गत वरिल १२ बाबींचा समावेश असुन लाभ पैकेज स्वरुपात देण्यात येइल. खालील ३ पैकी
कोणत्याही एकाच पैकेज चा लाभ लाभार्थिस देय आहे.

१. नविन विहिर पैकेज-
नविन विहिर, विज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हिसी/एच डी पी ई पाईप, यंत्रसामुग्री,परसबाग, इनवेल बोअरींग. एकूण कमाल देय _ रु. ६९२०००

२. जुनी विहिर दुरुस्ती पैकेज-
जुनी विहिर दुरुस्ती, विज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हिसी/एच डी पी ई पाईप, यंत्रसामुग्री,परसबाग, बोअरींग.एकूण कमाल देय _ रु. ३९२०००


३. शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरी करण-
शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरी करण,विज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हिसी/एच डी पी ई पाईप, यंत्रसामुग्री,परसबाग. एकूण कमाल देय_ रु.४५२०००

४. ज्या शेतकरी यांनी यापूर्वीच योजनेतून/स्वखर्चाने विहिर घेतली असेल त्यांना विज जोडणी आकार, इनवेल बोअरिंग, सूक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हिसी/एच डी पी ई पाईप, यंत्रसामुग्री ,परसबाग यासाठी अनुदान अनुज्ञेय आहे.

५. वरिल घटकां पैकी काही घटक शेतकरी यांचे कडे  असतील तर उर्वरित आवश्यक घटकां चा लाभ घेता येईल.

पुर्वसम्मती-
पुर्वसम्मती मिळाल्या नंतरच शेतकरी यांनी वरिल बाबींची अंमल बजावणी करावयाची आहे.

लाभार्थी पात्रता-

१. लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
२. नविन विहिरिचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकरी यांचे कडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी अन्य कोणत्याही योजनेतून नविन विहिर चा लाभ घेतलेला नसावा.
३. लाभर्थ्याच्या ७/१२ वर तसेच शेतात प्रत्यक्ष विहिर अस्ल्यास नविन विहिर लाभ घेता येणार नाही.
४.०.४० हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास व त्यांची जमीन ०.४० हे.इतकी होत अस्ल्यास त्यांनी करार लिहुन दिल्यास त्यांना योजनेचा लाभ देय आहे.
५. ६ हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत. मात्र दारिद्र्य  रेशेखालील लाभार्थिना ही अट लागू नाही.
६. परंपरागत वां निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार वन पट्टे धारक शेतकरी यांना प्राधान्य.

आवश्यक कागदपत्रे- 

1) 7/12
2) 8अ 
3) आधार कार्ड
4) नविन विहिरीचे बाबतीत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील  पाणी उप्लब्ध्तेचा दाखला आवश्यक आहे.

अर्ज कुठे करावा-
अर्ज www.mahadbt.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन करावा.

नविन विहिर-

पुर्वसम्मती व कार्यारम्भ आदेश-
नविन विहिरी साठी लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर कृषी अधिकारी पं.स.हे कर्यारम्भ आदेश देतील. त्यानंतर 30 दिवसाच्या आत काम सुरु करावे.

शेततळे अस्तरिकरण- 

शेततळे अस्तरिकरण साठी 500 मायक्रॉन जाडी ची प्लास्टीक फिल्म रीइनफोर्सड एचडीपीई जिओ मेंबरेन फिल्म (IS:15351:2015 Type II) वापरावी.

पंप संच- 

पुर्व संमती मिळाल्यानंतर लाभार्थी यांनी एक महिन्याच्या आत पंप संच बाजारातील अधिकृत विक्रेत्याकाडून खरेदी करावी.

पाईप- 

पुर्व संमती मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत लाभार्थी यांनी त्यांच्या पसंती नुसार  आयएसआय मार्क पाईप खरेदी करावी. प्रचलीत आर्थिक मापदंडाच्या किंवा किमतीच्या १०० टक्के, कमाल रु.५०००० अनुदान देय आहे. पिव्हिसी पाईप च्या बाबतीत उच्चतम अनुदान रु.७० प्रती मिटर आहे. 
एच डी पी ई पाईप च्या बाबतीत उच्चतम अनुदान रु.१०० प्रती मिटर आहे. 
एच डी पी ई लैमिनेटेड पाईप च्या बाबतीत उच्चतम अनुदान रु.४० प्रती मिटर आहे. 

परसबाग-

बियाणे, कलमे/रोपे, खते व औषधे तसेच अवजारे( kitchen gardening tools) अधिकृत परवानाधारक विक्रेत्या कडून खरेदी करुन पावती सादर करावी.

अनुदान 

देय अनुदान इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर द्वारे लाभार्थीचे आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येइल.
अधिक माहिती साठी संपर्क- 
कृषी अधिकारी पं.स., गट विकास अधिकारी पं.स. व कृषी विकास अधिकारी जि.प.