मिनी दाल मिल
शेतकरी गटासाठी मिनी दाल मिल-
कड धान्याचे डाळी मध्ये रुपांतर करण्यासाठी मोठ्या दाल मिल उद्योगाची उभारणी करावी लागते व त्यासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक असते.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कमी भांडवल उभारणीतही सर्व प्रकारच्या डाळी तयार करण्यासाठी मिनी दाल मिल संयंत्राची निर्मिती करण्यात आली आहे.
हे संयंत्र ग्रामीण स्तरावर घरगुती उद्योग म्हणून स्वयंरोजगारास उत्कृष्ट आहे.
लाभ कुणाला घेता येइल-
शेतकरी/महिला गट यांना.
अर्थ साह्य-
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य अंतर्गत प्रत्यक्ष खर्चाच्या ६० टक्के किंवा कमाल रु.१. २५ लाख अनुदान देय आहे.
तसेच कृषि यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत अनुदान मर्यादा खालीलप्रमाणे आहे.
अल्प/अत्यल्प/महिला/अजा /अज भूधारक - प्रत्यक्ष खर्चाच्या ६० टक्के किंवा कमाल १. ५० लाख
बहू भूधारक - प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल १. २५ लाख

अर्ज कुठे करावा-
तालुका कृषी अधिकारी कार्यालय.