Total Pageviews

1317356

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- व्यापारी पिके अंतर्गत सघन कापूस विकास कार्यक्रम

राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान - व्यापारी पिके अंतर्गत  सघन कापूस विकास कार्यक्रम

कापूस उत्पादनास चालना मिळावी या उद्देशाने सदर कार्यक्रम राज्यातील धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपुर, चंद्रपुर या प्रमुख 16 कापूस उत्पादक जिह्यात राबविण्यात येत आहे.

राबविण्यात येणारे घटक-
1. एकात्मिक पिक व्यवस्थापन (ICM) आद्यरेषीय प्रात्यक्षिके
2. आंतरपीक पद्धतीची आद्यरेषीय प्रात्यक्षिके
3. कपाशीच्या देशी/सरळ वाणां च्या अती घन लागवडीच्या चाचण्या-(HDPS)-
4. पिक संरक्षण औषधे व बायो एजंटस चे वितरण
5.स्थानिक पुढाकाराच्या बाबी-
अ.ऑनलाईन पेस्ट मॉनिटरींग अँड एडवाइज़री सर्वीसेस (opms)
ब. कॉटन श्रेडर चे वाटप

पिक प्रात्यक्षिके- 

पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने तंत्र ज्ञान प्रसाराचे साधन म्हणून पिक प्रात्यक्षिकांचे आयोजन शेतकरी यांच्या शेतावर करण्यात येते. 
यासाठी गावातील शक्यतो सलग 10 हेक्टर चे क्षेत्र निवडण्यात येते. या 10 हेक्टर क्षेत्रातील शेतकरी यांचा समूह/गट करण्यात येतो.
या 10 हेक्टर क्षेत्रात किमान 10 शेतकरी असणे आवश्यक आहे. 
प्रती शेतकरी किमान 0.40 हेक्टर व जास्तीत जास्त 1 हेक्टर क्षेत्र मर्यादेत लाभ देण्यात येतो. 
पिकां वरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत घेण्यात येणारे शेतकरी शेतिशाळा संलग्न प्लॉट वर सदर प्रात्यक्षिके घेण्यात येतात. 
सुधारित तंत्रज्ञानाचा वापर (सुधारित बियाणे, खते, औषधे इ .) या प्रात्यक्षिक क्षेत्रात करण्यात येतो. प्रात्यक्षिक प्लॉट शेजारीच पारंपारिक पद्धतीवर आधारित तुलनात्मक प्लॉट घेण्यात येतो. 
महाबिज/राष्ट्रिय बीज निगम/केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपुर/ यांचे कडील प्रमाणीत/सत्य प्रत बियाणे यासाठी वापरण्यात येते. 
तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद व राज्यातील कृषी विद्यापीठे यांनी तयार केलेल्या मान्यताप्राप्त बी.टी.कापसाचे  सरळ/संकरित वाण प्रात्यक्षिकां मध्ये वापरता येतात.

1. एकात्मिक पिक व्यवस्थापन (ICM) आद्यरेषीय प्रात्यक्षिके- 
यासाठी प्रती हेक्टर रु.8000 इतके अर्थ साह्य आहे. यामध्ये 7000 रु.निविष्ठां साठी व 1000 रु.आकस्मिक खर्चासाठी आहे. 

2. आंतर पीक पद्धतीची आद्य रेषीय प्रात्यक्षिके (कापूस पिकात मूग,उडिद)-
यासाठी प्रती हेक्टर रु.8000 इतके अर्थ साह्य आहे. यामध्ये 7000 रु.निविष्ठां साठी व 1000 रु.आकस्मिक खर्चासाठी आहे. 

3.कपाशीच्या देशी/सरळ वाणां च्या अती घन लागवडीच्या चाचण्या-(HDPS)-
पावसाची अनियमितता, पावसातील खंड, हलक्या व उथळ जमिनीत कापूस लागवड या पार्श्वभूमी वर ब्राज़ील तंत्रज्ञानावर आधारीत देशी कापसाच्या अती घन लागवडी ची पद्धत अधिक उपयुक्त ठरत आहे. रु.10000 प्रती हेक्टर इतके अर्थ्साह्य असुन त्यापैकी रु.1000 हेआकस्मिक खर्चासाठी उपलब्ध आहे.

4.पिक संरक्षण औषधी व बायो एजंटस चे वितरण-

ही बाब बिटि व नॉन बिटि दोन्ही प्रकारच्या कापुस पिकाला लागू आहे. 
यामध्ये बीज प्रक्रिया (carbendazim), पिक संरक्षण औषधे, कामगंध सापळे इ .साठी अर्थ सहाय्य देय आहे.  
खर्चाच्या 50 टक्के, कमाल रु.500 प्रती हेक्टर  इतके अर्थ साह्य देय आहे.याबाबतची कार्यवाही क्रॉपसैप च्या मार्गदर्शक सुचनां नुसार करण्यात येते.

5.स्थानिक पुढाकाराच्या बाबी-

अ.ऑनलाईन पेस्ट मॉनिटरींग अँड एडवाइज़री सर्वीसेस (opms)-

हा घटक पिकां वरिल किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प या कार्यक्रमाशी संलग्न करुन राबविण्यात येतो. हा घटक केवळ सर्वेक्षणा साठी मर्यादीत असुन यातुन निविष्ठां साठी खर्च केला जात नाही. सर्वेक्षण बिटि व नॉन बिटी दोन्ही प्रकारच्या कापसावर करण्यात येते. कापूस पिकाच्या सर्वेक्षणा चा खर्च या घटका मधून करण्यात येतो.

ब. कॉटन श्रेडर- 

कापुस पिकाच्या उत्पादना बरोबरच पिकाचे अवशेष देखील मोठ्या प्रमाणावर असतात. हे अवशेष विशेषत: पर्हाटी सरपणा साठी जळावू इंधन म्हणून वापरले जातात. मात्र डिसेंबर नंतरही हे अवशेष शेतातच राहात असल्याने किड व रोगाच्या जीवनक्रमासाठी पुरक ठरतात. त्यामुळे हे अवशेष कॉटन श्रेडर यंत्रा द्वारे बारीक करुन शेतात मिसळल्यास विघटना नंतर सेंद्रीय घटक म्हणून उपयुक्त ठरतात. शिवाय किड व रोगांचा जीवनक्रम खंडीत करण्यास ते उपयुक्त ठरते.
कॉटन श्रेडर खरेदी साठी अनुदान -
अल्प/अत्यल्प/अजा/अज/महिला- यांना खर्चाच्या 50 टक्के ,जास्तीत जास्त रु.1 लाख अनुदान.
इतर लाभार्थी - यांना खर्चाच्या 40 टक्के ,जास्तीत जास्त रु.80000/- अनुदान आहे.