Total Pageviews

फवारणी करणेसाठी संरक्षक कीट

फवारणी करणेसाठी 90 टक्के अनुदानावर सुरक्षा किट

              फवारणी करणेसाठी शेतकरी/शेतमजुर यांना 90 टक्के अनुदानावर यवतमाळ जिल्ह्यात सुरक्षा किट कृषी सेवा केंद्रावर उपलबध करुन देण्यात आल्या आहेत. 
           ही योजना जिल्हा नियोजन समिती ने मंजूर केली आहे. शेतकरी/शेतमजुर यांनी कृषी सेवा केंद्राकडे आधार कार्ड व बँक पासबूक ची झेरॉक्स द्यावी व सुरक्षा किट रोखीने खरेदी करावी. 
           सुरक्षा किट ची कमाल किंमत रु. 350 इतकी ठरवण्यात आली आहे. 
         तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत 90 टक्के अनुदान थेट शेतकरी/शेतमजुर यांचे बँक खात्यात जमा करण्यात येते. 


 अधिक माहितीसाठी मार्गदर्शक सूचना

@ कृपया सुरक्षा किट वापरुनच  फवारणी करा @