Total Pageviews

नविन विहिर

राष्ट्रिय कृषी विकास योजने अंतर्गत अनुसूचित जाती व 
अनुसूचित जमाती तील शेतकरी यांना नविन विहिरीचा लाभ

अ. अनुदान-
जास्तीत जास्त 2.50 लाख.

ब. लाभार्थी पात्रता व आवश्यक कागदपत्रे -
1) नावे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक. 
2) जात प्रमाणपत्र    
3) 7/12 व 8अ   
4) आधार कार्ड 
 6) आधार कार्ड संलग्न बँक खाते  
7) वार्षिक उत्पन्न 150000 पेक्षा जास्त नसावे.तहसीलदार यांचा 18-19चा उत्पन्नचा दाखला आवश्यक. 
7) यापूर्वी केंद्र/राज्य/जिल्हा परिषद अथवा इतर कोणत्याही शासकीय योजनेतून नविन सिंचन विहिरिचा लाभ घेतलेला नसावा. 
8) लाभार्थ्याच्या 7/12 वर तसेच प्रत्यक्ष विहिर असल्यास लाभ मिळनार नाही. 
9) नविन विहिर घ्यावयाच्या स्थळापासून 500 फुटाचे अंतरामध्ये दुसरी विहिर नसावी. 
10) भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक.         


क. लाभार्थी निवड - 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनां करिता ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेल्या शेतकरी यांच्या अर्जा मधुनच पात्र लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने (इन कमेरा) अतिरिक्त मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद यांचे अध्यक्षतेखालील जिल्हा स्तरीय समिती मार्फत करण्यात येते.  
त्यानंतर लाभार्थ्याच्या क्षेत्राची स्थळ पाहणी करण्यात येते. 
विहिर खोदण्याचे ठिकाण तांत्रिक दृष्ट्या योग्य आढळल्यास अंदाजपत्रक करुन कृषी विकास अधिकारी यांची तांत्रिक मान्यता मिळते. 
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हे प्रशासकीय मान्यता देतात.
त्यानंतर लाभार्थ्याला पुर्वसम्मती/ कृषी अधिकारी (विघयो पं.स.) हे कार्यारंभ आदेश देतात. 
कार्यारम्भ आदेश दिल्यानंतर 30 दिवसाच्या आत लाभार्थ्याने विहिरीचे काम सुरु न केल्यास निवड रद्द होते. कृषी अधिकारी(पं.स.) हे विहिरीच्या कामाची मापन पुस्तिका नोन्दवतात.काम पुर्ण झाल्याचा पुर्नत्वाचा दाखला जिल्हा कृषी अधिकारी(विघयो) हे देतात. 
केलेल्या कामाचे अनुदान कृषी अधिकारी (विघयो पं.स.) व गट विकास अधिकारी पं.स. यांचे अहवालानुसार, कृषी विकास अधिकारी यांचे शिफारशी नुसार पी एफ एम एस प्रणालीद्वारे  लाभार्थ्याचे आधार संलग्न बँक खात्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हे थेट लाभ हस्तांतरणा द्वारे (डीबिटी )जमा करतात.        

अधिक माहितीसाठी -
नवीन विहीर मार्गदर्शक सूचना