Total Pageviews

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत- मृद आरोग्य पत्रिका योजना

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत-
मृद आरोग्य पत्रिका योजना

या योजने अंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक गाव निवडले जाते. या निवडलेल्या गावातील सर्व खातेदारांचे शेतातील मृद नमुने काढुन त्यांना जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात येते. गावातील वहितिखालील संपुर्ण शेत जमिनितील माती नमुन्यांची तपासणी करुन गावतील सर्व शेतकरी यांना मृद आरोग्य पत्रिका वितरित करण्यात येते.

योजनेचे महत्वाचे ऊद्देश-
1.रासायनीक खतांचा अनिर्बंध वापर कमी करुन मृदा तपासणीवर आधारीत, अन्नद्रव्यांच्या कमतरते नुसार खतांच्या संतुलीत आणि कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देणे.
2.मृदा आरोग्य सुधारण्यासाठी तसेच अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रीय खते, गां डू ळ खत, निंबोळी/सल्फर आच्छ्यादीत युरिया सारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणारे खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे.
3.एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापना द्वारे पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे.

ही योजना राबविण्याकरिता केंद्र शासनाचा 60 टक्के आणि राज्य शासनाचा 40 टक्के आर्थिक सहभाग आहे.
जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकरी यांना त्यांच्या शेतजमिनिची रासायनीक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी, सूक्ष्म मुलद्रव्यांची कमतरता स्थिती व त्यानुसार पिकांना दयावयाच्या खत मात्रेची माहिती मिळते.

योजनेतील घटक-
1) जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण-
तालुक्यातून निवडलेल्या एका गावातील सर्व खातेदारांना त्यांच्या वहितिखालील जमिनिची मृद आरोग्य पत्रिका वितरित करणे. जमीन आरोग्य पत्रिके साठी रु.300 इतका कमाल खर्च अनुज्ञेय आहे. (नमुना पिशवी, नमुना चिठ्ठी, मृद नमुना काढणे, वाहतुक व जमीन आरोग्य पत्रिक वितरण यासाठी रु.40 आणि मृद नमुना विश्लेषण, विश्लेषणाचे निष्कर्ष संगणक प्रणालीवर अपलोड करणे, रंगीत जमीन आरोग्य पत्रिका तयार करणे,प्रयोगशाळा व्यवस्थापन व आनुषंगिक सर्व बाबी इ .यासाठी रु.260 असा एकुण खर्च रु.300/-). हा खर्च शासना मार्फत करण्यात येतो. व शेतकरी यांना रंगीत जमीन आरोग्य पत्रिका (A4 100 जीएसएम पेपर वर)मोफत देण्यात येते.

2) सूक्ष्म मूलद्रव्ये व भुसुधारक वापराच्या प्रात्यक्षिकांना अर्थसहाय्य-
जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशी नुसार निवडलेल्या गावातील वहितिखालील सर्व क्षेत्रासाठी  सूक्ष्म मुलद्रव्ये व भुसुधारक (जिप्सम,फोस्फो जिप्सम, बेन्टोनेट सल्फर, जैविक खते,चुना, लाइमिंग मटेरीयल) वापराच्या प्रात्यक्षिका साठी प्रती हेक्टर रु.2500 इतके अर्थसहाय्य आहे.

3) अभियान व्यवस्थापन

प्रत्येक तालुक्यातून एक गाव निवडीचे निकष-

अ. तालुक्यातील एकुण शेतकरी खातेदार संख्या भागिले एकुण गावांची संख्या या परिगणने नुसार सरासरी एवढी किंवा किंचीत जास्त खातेदार संख्या असलेले गाव निवडावे. 
ब.या गावात यापूर्वी योजनेच्या दुसरे सायकल मधील पहिल्या वर्षामध्ये (सन 2017-18) जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण झालेले नसावे.
क. गाव मध्यवर्ती असावे जेणेकरुन तालुक्यातील इतर शेतकरी यांना त्या ठिकाणी भेटी देता येतील.
ड. रासायनीक खतांचा जास्तीचा वापर, सेंद्रीय कर्बाचे कमी प्रमाण, सूक्ष्म मुलद्रव्यांच्या वापराचा अभाव इ. असलेले गाव.

मृद नमुने कोण काढतील-
कृषी विभागातील क्षेत्रीय कर्मचारी
विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी व त्यांच्या मृद चाचणी प्रयोगशाळेतील कर्मचारी वर्ग
कृषी विद्यापीठ आणि मृद चाचणी कर्मचारी वर्ग
प्रशिक्षित/तज्ञ शेतकरी, कृषी मित्र, नोंदणी कृत मृद तपासणी प्रयोगशाळांचे कर्मचारी.

कोणते घटक तपासुन जमीन आरोग्य पत्रिका देण्यात येइल-
खालील 12 घटक तपासण्यात येतात.
अ) जमिनीचा सामू (pH), क्षारता(EC), सेंद्रीय कर्ब (OC).
ब) प्रमुख अन्न द्रव्ये- उपलब्ध नत्र(N), उपलब्ध स्फुरद (P), उपलब्ध पालाश(K), गंधक(S).
क) सूक्ष्म अन्नद्रव्ये- उपलब्ध जस्त (ZN), तांबे (Cu), लोह (Fe), मंगल (Mn), व बोरॉन (B).


------------------------------------------------------------------

1 comment: