Total Pageviews

शेतकरी उत्पादक संस्थांची स्थापना व प्रसार ( एफपीओ)

शेतकरी उत्पादक संस्थांची स्थापना व प्रसार

योजनेचा ऊद्देश-
देशात 10000 (शेतकरी उत्पादक संस्था) एफपीओ स्थापन करणे
'एक जिल्हा एक उत्पादन' ही संकल्पना राबविण्यासाठी तसेच पणन, प्रक्रिया व निर्यातीला चालना देण्यासाठी समुहामध्ये एफपीओ ची निर्मिती करणे.

योजनेचा कालावधी-
2019 ते 2024

एफपीओ ची नोंदणी कोणत्या कायद्या अंतर्गत करावी-
कंपनी अधिनियम पार्ट- ixA किंवा राज्य सहकारी संस्था अधिनियम 1860 अंतर्गत.

एफपीओ मध्ये किमान किती सदस्य असावेत-
या योजने चा लाभ घेण्यासाठी एफपीओ मध्ये किमान 300 शेतकरी सभासद असावेत.  स्वयंसहायता गट एकत्र येउन एफपीओ स्थापन करु शकतात. हे एका उत्पादना चा समूह क्षेत्र असणारे असावेत. 

अंमलबजावणी यंत्रणा कोणत्या आहेत-
1.एसएफएसी( Small Farmers Agribusiness Consortium)
2. NCDC ( National Co-operative Development Corporation)
3. नाबार्ड NABARD ( National Bank for Agriculture and Rural Development)
4. कृषी विभाग (आत्मा)

एफपीओ स्थापन करण्यासाठी शासनामार्फत किती अर्थसाह्य मिळेल-
एफपीओ ची स्थापना झाल्या पासून तीन वर्षापर्यंत तिन्ही वर्ष मिळुन जास्तीतजास्त रु. 18 लाख.

हे अर्थसाह्य कशासाठी मिळेल-
1.एफपीओ ने नेमलेल्या व्यवस्थापक (कमाल रु.25000 प्रती माह)  तसेच लेखापाल ( कमाल रु.10000 प्रती माह) यांचे वेतन देणे.
2. एफपीओ चा नोंदणी खर्च (जास्तीत जास्त रु.40000)
3. कार्यालयाचे भाडे- जास्तीत जास्त रु.48000 प्रती वर्ष (तीन वर्षापर्यंत)
4. विद्युत व दूरध्वनी खर्च- जास्तीत जास्त रु. 12000 प्रती वर्ष (तीन वर्षापर्यंत)
5. फर्नीचर- जास्तीत जास्त रु. 20000/-
6. प्रवास व सभा खर्च- कमाल रु. 18000 प्रती वर्ष (तीन वर्षापर्यंत)
7. इतर (स्टेशनरी इ .)- कमाल रु. 12000 प्रती वर्ष ( तीन वर्षापर्यंत)

एफपीओ ला इक्विटी निधी किती मिळेल-
एफपीओ मधील सदस्यांच्या इक्विटी रकमे इतकाच इक्विटी निधी शासना कडून मिळेल. प्रती सदस्य कमाल रु.2000 अशा प्रकारे एफपीओ ला कमाल रु.15 लाख हा इक्विटी निधी मिळू शकतो.
एफपीओ ची आर्थिक स्तर सुधारावा तसेच त्यांना प्रकल्प राबविणे साठी वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळणेस मदत व्हावी त्याच प्रमाणे व्यवसायासाठी खेळते भांडवलाची  गरज भागावी यासाठी हा निधी देण्यात येतो.

एफपीओ ला पत हमी किती मिळेल-
कोणत्याही प्रकारचे तारण न देता बँकेकडून एफपीओ ला  प्रकल्प उभारण्यासाठी रु. 2 कोटी पर्यंतचे कर्ज मिळू शकते.

एफपीओ कोणती कार्ये करु शकते व कोणत्या सेवा देऊ शकते-
1.गुणवत्तापुर्ण निविष्ठा उदा. बियाणे,खते, कीटकनाशके व अशा प्रकारच्या इतर निविष्ठा शेतकरी यांना घाऊक व कमी दरात विकणे.
2. शेतकरी सदस्य यांना अवजारे भाडे तत्वावर पुरवणे उदा. ट्रॅक्टर, कम्बाईन हार्वेस्टर इ.
3. शेतकरी यांना मुल्यवर्धनच्या सुविधा पुरवणे- उदा. धान्य स्वच्छता,प्रतवारी, पैकिंग, शेतावर प्रक्रिया, धान्याची साठवणूक, वाहतुक.
4. उत्पन्न वाढीचे उपक्रम राबविणे- उदा. बिजोत्पादन, मधूमक्षिका पालन, अळिंबी उत्पादन इ.
5. शेतकरी सदस्य यांच्या शेतमाल उत्पादनाचे एकत्रीकरण करणे व त्यात मुल्यवर्धन करुन बाजारात विक्रियोग्य बनवणे.
6  एकत्रित केलेल्या शेतमालाची शेतकरी यांना योग्य किंमत मिळेल अशा प्रकारे बाजारात विक्री करणे
7. बाजार माहितीची सुविधा पूरवणे.

जिल्हास्तरीय नियंत्रण समिती-
1.मा.जिल्हाधिकारी - अध्यक्ष 
2.मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.- सदस्य
3.जिल्हास्तरीय अधिकारी(कृषी/फलोत्पादन/पशुसंवर्धन/मत्स्यव्यवसाय/ पणन/सहकार)- सदस्य
4. जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड- सदस्य
5. Lead District Manager  (LDM)- सदस्य
6. कृषी विज्ञान केंद्र,आत्मा, स्थानिक उत्पादक संघामधील तीन तज्ञ- सदस्य
7. प्रकल्प संचालक आत्मा- सदस्य सचिव.




https://drive.google.com/file/d/177t7XWBnqoaHqn-K0BqKyFpd4xhfgY8f/view?usp=drivesdk