आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला पिकाची लागवड योजना 2023-24
आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला पिकाची लागवड योजना 2023-24
योजनेची माहिती-
राज्य शासना मार्फत ही योजना 2003-04 पासून राबविण्यात येत आहे. ही योजना राज्यातील आदिवासी भागातील 14 जिल्ह्यामध्ये (पालघर, ठाणे, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव,नांदेड़, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपुर, गोंदीया) राबविण्यात येत आहे.
आपल्या राज्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने पौष्टिक आहार निर्माण करण्यासाठी आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड करण्यासाठी ही योजना राज्य शासना मार्फत राबविण्यात येत आहे.
या योजने मध्ये फळझाडांची कलमे रोपे आणि भाजीपाला बियाणे ची कीट आदिवासी कुटुंबाला त्यांच्या परस्बागेत किंवा शेतात लावण्यासाठी दिली जाते.
एका कीट मध्ये रु. 390/- इतक्या रकमे पर्यंतची कलमे/रोपे आणि भाजीपाला बियाणे मोफत पुरविण्यात येतात.
ही योजना कोणत्या तालुक्यात राबवली जाते-
ही योजना राज्यातील ठाणे पालघर पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव नांदेड़ अमरावती यवतमाळ गोंदीया चंद्रपुर गडचिरोली या 14 जिल्ह्यामध्ये व या 14 जिल्ह्यातील आदिवासी विभागामार्फत जे तालुके आदिवासी उपाययोजने मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत अशा तालुक्यांमध्ये ही योजना राबावली जाते.
आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला पिकाची लागवड योजना राबविण्यात येणारे जिल्हानिहाय तालुके-
लाभार्थी निवड कशी केली जाते-
1.आदिवासी क्षेत्रामधील ज्या कुपोषण ग्रस्त गावातील आदिवासी कुटुंबाकडे शेतजमीन किंवा परसबाग उपलब्ध असेल असे लाभार्थी निवडण्यात येतात.
2.ज्या आदिवासी कुटुंबात कुपोषीत बालके असतील अशा आदिवासी शेतकरी यांच्या कुटुंबाला प्राधान्याने लाभ देण्यात येतो.
3.यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
4. विशेष बाब म्हणुन ज्या जिल्ह्यातील सर्व आदिवासी शेतकरी यांना यापूर्वी योजनेचा लाभ दिला असेल तर, चक्रीय पद्धतीने किमान 5 वर्षाचे कालावधीनंतर पुनश्च लाभ देण्यात यावा.
योजनेत कोणती फळझाडे कलमे/रोपे व भाजीपाला बियाणे दिली जातात-
यामध्ये चिकू,आंबा, पेरू, दोडका, गवार, मेथी , पालक, दुधी भोपळा तसेच इतर भाजीपाला उदा.आळू, वांगी इ .स्थानिक गरजेनुसार आवश्यक/मागणी असलेली फळझाडांची कलमे/रोपे व भाजीपाला रोपे/बियाणे पुरविण्यात येतात.
ही कलमे/रोपे आणि भाजीपाला रोपे/बियाणे कुणाकडून घेण्यात येतात-
लाभधारकांना आवश्यकतेनुसार फळ्झाडे कलमे/रोपे व भाजीपाला बियाणे पुरवण्यात येते. फळ्झाडे व भाजीपाला कलमे रोपे ही शासकीय रोपवाटीका, कृषी विद्यापीठ रोपवाटीका, कृषी विज्ञान केंद्र , त्यानंतर नोंदणीकृत खाजगी रोपवटीकेतून घेण्यात येतात. तसेच भाजीपाला बियाणे हे महाबिज मार्फत उपलब्ध करुन दिले जाते. लागवड साहित्यामध्ये किमान 3 फळझाडे घेणे अनिवार्य आहे.
फळे/भाजीपाला परिमाण अंदाजित रक्कम(रु.)
1. चिकू 1 90
2. आंबा 1 80
3. पेरू 1 60
4. दुधी भोपळा 100 ग्रॅम 45
5. दोडका 100 ग्रॅम 56
6. गवार 100 ग्रॅम 35
7. मेथी 100 ग्रॅम 12
8. पालक 100 ग्रॅम 12
एकुण 390/-
लाभार्थी यांना प्रशिक्षण देण्यात येते का-
रोपांची लागवड,जोपासना,फळे काढणी व भाजीपाला यांचे खाद्य पदार्थ तयार करणे इ. बाबत प्रशिक्षण ग्रामस्तरावर देण्यात येते. प्रशिक्षणासाठी होणारा खर्च आत्मा अंतर्गत तरतुदीतून करण्यात येतो.
योजनेत सहभाग घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत-
7/12 किंवा 8अ
आधारकार्ड/ इतर ओळख पुरावा
घराचे मालकी कागदपत्र
अनुसूचित जमाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र
परसबाग उपलब्ध असलेबाबत स्वयंघोषणापत्र
अधिक माहिती साठी मार्गदर्शक सुचना दि. १६-६-२०२३