Total Pageviews

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना

 राष्ट्रीय कृषी विकास  योजने अंतर्गत 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना 

 

योजनेचा उद्देश-

भाजीपाला उत्पादनाला  प्रोत्साहन देऊन शेतकऱयांचे उत्पन्न वाढविणे. 

भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीडरोग मुक्त रोपे निर्मिती करणे 


अनुदान कशासाठी मिळणार -

नवीन रोपवाटिका तयार करण्यासाठी. 

प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका.

टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची कांदा इ.व इतर भाजीपाला पिकांची रोपे तयार करता येतील.


रोपवाटिकेमध्ये काय असणे आवश्यक -

१. शेडनेटहाऊस (१००० चौ.मी.) 

२. पॉली टनेल  (१००० चौ.मी.)

३. पॉवर नॅपसॅक स्प्रेअर-१

४. प्लास्टिक क्रेट्स-६२ 


कोण लाभार्थी पात्र आहेत -

१. अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान एक एकर जमीन असणे आवश्यक.

२. रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असावी.

३. महिला कृषी पदवीधारक यांना प्रथम प्राधान्य. 

४. महिला गट/महिला शेतकरी यांना  व्दितीय प्राधान्य. 

५.  भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य.                                                                               


कोण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत-.                                                                                

१. यापूर्वी शासनाचा लाभ घेतलेले  खाजगी रोप वाटिका धारक ,                                                            

२. शासनाचा लाभ न घेता उभारलेल्या खाजगी रोपवाटिका                                                                    

३.  शासकीय योजनेतून शेडनेट , हरितगृह या बाबीचा लाभ घेतलेले शेतकरी 


अनुदान किती मिळणार -

खर्चाच्या ५० टक्के , कमाल रुपये २३००००/- अनुदान आधार लिंक बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

(शेडनेट साठी ५० टक्के ,कमाल रु. १९००००/- , पॉली टनेल साठी ५० टक्के, कमाल रु.३००००/-, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर-१साठी ५० टक्के, कमाल रु.३८००/-, प्लास्टिक क्रेट्स-६२ साठी ५० टक्के, कमाल रु.३८००/- असे एकूण रु. २३००००/- )

प्रकल्प उभारणींनंतर प्रथम टप्प्याचे ६० टक्के अनुदान कमाल रु. १.३८ लाख हे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी प्रथम मोका तपासणी केल्यानंतर मिळेल.

उर्वरित ४० टक्के अनुदान रु. ०. ९२ लाख हे रोपवाटिकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री/उचल झाल्यानंतर मंडळ कृषी अधिकारी यांनी व्दितीय मोका तपासणी केल्यानंतर मिळेल.


अर्ज कुठे करावा-

https://mahadbtmahait.gov.in/  या संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात.


रोपवाटिकेची उभारणी कधी करावी-

तालुका कृषी अधिकारी यांचे कडून पूर्व संमती मिळाल्यानंतर.

पूर्वसंमती मिळाल्यापासून १५ दिवसाच्या आत काम सुरु करणे आणि ३ महिन्याच्या कालावधीत काम पूर्ण करणे आवश्यक आहे.

अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत-

बँक खाते पासबुक प्रथम पानाची छायांकीत प्रत , ७/१२ उतारा , ८-अ , स्थळ दर्शक नकाशा , चतु :सीमा , आधार कार्ड ची छायांकीत प्रत, संवर्ग प्रमाणपत्र (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती शेतकरी यांचेसाठी), हमी पत्र , कृषी पदवी बाबतची कागद पत्रे , शेतकरी गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र . 


अधिक माहितीसाठी- 


शासन निर्णय



मार्गदर्शक सुचना-