रानभाजी महोत्सव
रानभाजी महोत्सव
रानातील/जंगलातील/शेतशिवारातील नैसर्गीकरित्या उगवल्या जाणार्या रान पालेभाज्या, फळभाज्या व कंद भाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात. तसेच सदर रानभाज्या नैसर्गीकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनीक कीटकनाशक/बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही.
या रान भाज्यांचे आरोग्य विषयक महत्व व माहिती जास्तीत जास्त ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना होण्यासाठी व विक्री व्यवस्था करुन त्यांचे विक्रीतून शेतकर्यांनाही काही आर्थिक फायदा होण्यासाठी सन 2020-21 पासुन दरवर्षी जिल्हा व तालुकास्तरावर क्रांती दिनाचे निमीत्ताने 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये एक दिवसीय रानभाजी महोत्सव सप्ताह स्वरुपात आयोजित करण्यात येतो.
रानभाज्यांचे महत्व प्रसारीत करणे करीता व विपणन साखळी निर्माण करणे हा उद्देश आहे.
महोत्सवात उत्कृष्ट नमुन्यांची स्पर्धात्मक निवड करुन त्यांना बक्षिसे देण्यात येतात.
महोत्सवाच्या ठिकाणी रानभाज्या व रानफळांची वैशिष्टये, गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग, संवर्धन पद्धती, भाजीची पाककृती(रेसिपी) याची सचीत्र माहिती दाखविण्यात येतात.
रानभाज्यांची तांत्रिक माहिती व पाककृती यांची माहिती देणारी डिजिटल पुस्तिका तयार करुन शेतकर्याना पाठवण्यात येते.
चांगल्या पाककृतीच्या यू ट्यूब वर दाखविणेसाठी व्हिडिओ क्लीप तयार करण्यात येतात.
कृषी विज्ञान केंद्र/कृषी विद्यापीठ यांच्या मदतीने त्या भागात प्रायोगिक तत्वावर लागवड होवू शकते अशा पिकांची माहिती शेतकरी यांना देण्यात येते.
तसेच त्या त्या भागात व्यापारी तत्वावर लागवड होवू शकणार्या रानभाज्यांची लागवड व संवर्धन करणेकरिता आत्मा अंतर्गत उपलब्ध तरतुदीतून प्रात्यक्षिके/शेतिशाळा आयोजन करण्यात येते.
रानभाज्यांचा हंगाम व उपलब्धतेचा कालावधी विचारात घेउन शासकीय कार्यलयाचे परिसरात सुट्टीच्या दिवशी रानभाजी विकणारे शेतकरी यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येते.
रानभाज्या बाबत उत्कृष्ट माहिती/भाज्यांचे संकलन/भाजीची पाककृती केलेल्या शेतकरी/व्यक्तींची निवड करुन त्यांना स्वातंत्र्य दिनी प्रशस्तीपत्र देऊन गौरविन्यात येते.