Total Pageviews

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना-

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन  योजना-


ऊद्देश- 

 

अनुसूचीत जाती/ नवबौद्ध प्रवर्गातील शेतकरी यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावणे.


अनुसूचीत जाती/ नवबौद्ध प्रवर्गातील शेतकरी यांना देण्यात येणारे अनुदान-

 

1. नविन विहिर- रु.250000/-

2. जुनी विहिर दुरुस्ती- रु. 50000/-

3. इनवेल बोअरिंग- रु.20000/-

4. विज जोडणी आकार- रु.10000/-

5. शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरिकरण- रु.100000/-

6.सूक्ष्म सिंचन संच- ठिबक सिंचन- रु.50000/-, तुषार सिंचन- रु. 25000/-

7. पंप संच (डीझेल/विद्युत)- रु.20000/- (10 एचपी क्षमते पर्यंतच्या पंप करिता)


मार्गदर्शक सुचना- 


सदर योजने अंतर्गत वरिल 7 बाबींचा समावेश असुन लाभ पैकेज स्वरुपात देण्यात येइल. ज्या शेतकरी यांनी यापूर्वी 

नविन विहिर व जुनी विहिर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेतला असेल अशा लाभार्थ्यां व्यतिरीक्त इतर सर्व लाभार्थ्याना

खालील 3 पैकी कोणत्याही एकाच पैकेज चा लाभ लाभार्थिस देय आहे.


2.1. नविन विहिर पैकेज-

 

नविन विहिर, विज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन, पंप संच व आवश्यक्तेनुसार इनवेल बोअरींग.


2.2 जुनी विहिर दुरुस्ती पैकेज-

 

जुनी विहिर दुरुस्ती, विज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन, पंप संच, व आवश्यक्तेनुसार इनवेल बोअरींग.

जुनी विहिर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणारे शेतकरी यांच्या 7/12 वर विहिरिची नोंद असावी.


2.3. शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरी करण-

 

शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरी करण,विज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन व पंप संच. ज्या शेतकरी यांनी मागेल त्याला 

शेततळे या योजने अंतर्गत शेततळे पुर्ण केलेले आहे तेच शेतकरी या पैकेज चा लाभ घेऊ शकतात.


2.4. ज्या शेतकरी यांनी यापूर्वीच योजनेतून/स्वखर्चाने विहिर घेतली असेल त्यांना विज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन,

 पंप संच यासाठी अनुदान अनुज्ञेय आहे.


2.5. सोलर पंपा साठी अनुदान-

जर शेतकरी यांना महावितरण कंपनीकडून सोलर पंप मंजूर झाला असेल तर पंप संच व विज जोडणी साठी अनुज्ञेय 

अनुदानाच्या मर्यादेत (रु.30000/-) लाभार्थी हिश्याची रक्कम महावितरण कंपनीस अदा करता येइल.


2.6. वरिल घटकां पैकी काही घटक शेतकरी यांचे कडे  असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी 

खालील घटकांची निवड करावी- वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन, पंपसंच.


पुर्वसंमती-

 

पुर्वसंमती मिळाल्या नंतरच शेतकरी यांनी वरिल बाबींची अंमल बजावणी करावयाची आहे.


लाभार्थी पात्रता-


1. लाभार्थी हा अनुसूचित जाती/ नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र आवश्यक.

2. शेतकरी यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.150000 पेक्षा जास्त नसावे.

3. नविन विहिरिचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकरी यांचे कडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. 

तसेच यापूर्वी अन्य कोणत्याही योजनेतून नविन विहिर चा लाभ घेतलेला नसावा.

4. लाभार्थ्याच्या 7/12 वर तसेच शेतात प्रत्यक्ष विहिर असल्यास विहिर या घटकाचा लाभ घेता येणार नाही.

5. नविन विहिर घ्यावयाच्या स्थलापासून 500 फुटाचे अंतरामध्ये दुसरी विहिर नसावी.

6. ज्या शेतकरी यांना नविन विहिरी व्यतिरीक्त अन्य बाबींचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी किमान 0.20 हेक्टर 

क्षेत्र असणे आवश्यक आहे.

7. सामुहिक शेत जमीन किमान 0.40 हे.धारण करणारे एकत्रित कुटुंब नविन विहिर या घटकाचा लाभ घेण्यासाठी 

पात्र आहे.

8. सदर योजने अंतर्गत कमाल शेत जमिनीची अट 6 हेक्टर आहे.


आवश्यक कागदपत्रे- 


1) 7/12 व 8अ (नगर पंचायत, नगर पालिका व महा नगर पालिका क्षेत्रा बाहेरील)

2) आधार कार्ड

3) लाभार्थ्याचे बँक खाते आधार लिन्कड असणे आवश्यक आहे.

4) तहसीलदार यांचेकडील सन 2018-19 चा उत्पन्नचा दाखला.

5) नविन विहिरीचे बाबतीत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील  पाणी उप्लब्ध्तेचा दाखला आवश्यक आहे.


अर्ज कुठे करावा-

 

ग्राम सभेने शिफारशीत केलेल्या  इच्छुक शेतकरी यांनी अर्ज  www.agriwell.mahaonline.gov.in या संकेत 

स्थळावर ऑनलाईन करावा. व प्रस्तावाची मुळ प्रत कृषी अधिकारी पंचायत समिती यांचेकडे सादर करावी.


नविन विहिर-


पुर्वसंमती व कार्यारंभ आदेश-

 

नविन विहिरी साठी लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर कृषी अधिकारी पं.स.हे कर्यारम्भ आदेश देतील. त्यानंतर 30

 दिवसाच्या आत काम सुरु करावे.


इनवेल बोअरिंग-

 

नविन विहिर/जुनी विहिर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणारे लाभार्थी यांनी इनवेल बोअरींग ची मागणी केल्यास 

रु.20000 च्या मर्यादेत अनुदान देय राहिल. यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा योग्यता अहवाल आवश्यक आहे.


शेततळे अस्तरिकरण- 


शेततळे अस्तरिकरण साठी 500 मायक्रॉन जाडी ची प्लास्टीक फिल्म रीइनफोर्सड एचडीपीई जिओ मेंबरेन 

फिल्म (IS:15351:2015 Type II) वापरावी. मागेल त्याला योजने अंतर्गत पुर्ण झालेले शेततळे असावे.


ठिबक सिंचन-


प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून 55 टक्के अनुदान व या योजनेतून 35 टक्के(रु.50000 मर्यादेत) अनुदान 

असे 90 टक्के अनुदान लाभार्थ्याला देय राहिल.


तुषार सिंचन- 


प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून 55 टक्के अनुदान व या योजनेतून 35 टक्के  कमाल रु. 25000 असे 90 टक्के 

अनुदान लाभार्थ्याला देय राहिल.


पंप संच- 


10 अश्वशक्ती पर्यंतचे विद्युत पंप घेता येतील. कृषी अधिकारी (विघयो) पंचायत समिती यांचेकडून पुर्व संमती 

मिळाल्यानंतर लाभार्थी यांनी एक महिन्याच्या आत पंप संच बाजारातील अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावी.


वीज जोडणी आकार-


नविन विहिर पैकेज/ जुनी विहिर दुरुस्ती पैकेज/शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरिकरण पैकेजमधील तथा 

आवश्यकतेनुसार केवळ वीज जोडणी मागणी करणारे लाभार्थी यांनी विद्युत वितरण कंपनीकडे कोटेशन 

भरल्याची पावती कृषी अधिकारी (विघयो) पंचायत समिती यांचे कडे सादर करावी.


अनुदान-  


देय अनुदान इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर द्वारे लाभार्थीचे आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येइल.


अधिक माहिती साठी संपर्क- 

 

कृषी अधिकारी पं.स., गट विकास अधिकारी पं.स. व कृषी विकास अधिकारी जि.प.