पिक स्पर्धा
पिक स्पर्धा
पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकरी विविध प्रयोग करत असतात.अशा प्रयोगशील शेतकरी यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत पिक स्पर्धा योजना राबविण्यात येते.
कोणत्या पिकांसाठी पिक स्पर्धा घेण्यात येते-
खरीप हंगामासाठी-
भात ज्वारी बाजरी मका नाचणी सोयाबीन तुर सूर्यफूल मुग उडीद भुईमूग या 11 पिकांसाठी पिक स्पर्धा घेण्यात येते.
रबी हंगामासाठी-
ज्वारी, गहू, हरभरा, करडई , जवस या 5 पिकांसाठी पिक स्पर्धा घेण्यात येते.
स्पर्धेसाठी बक्षिसाची रक्कम किती आहे-
(रक्कम रुपये)
स्तर पहिले दुसरे तीसरे
तालुका 5000 3000 2000
जिल्हा 10000 7000 5000
राज्य 50000 40000 30000
लाभार्थी पात्रता-
1. शेतकरी यांचेकडे स्वत:च्या नावे जमीन असणे आवश्यक तसेच ती जमीन शेतकरी स्वत: कसत असला पाहिजे.
2. लाभार्थी शेतकरी यांचे स्वत:चे शेतावर त्या पिकाखाली भात पिकाचे क्षेत्र किमान 20 आर व इतर पिकांचे किमान क्षेत्र 40 आर वर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
3.शेतकरी यांना एकावेळी एकापेक्षा जास्त पिकामध्ये पिक स्पर्धेसाठी सहभागी होता येईल.
4. पीक स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळालेल्या शेतकरी यांना पुढील 5 वर्ष त्याच पिकाकरीता पिक स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.
5. विजेत्या स्पर्धकास ज्या स्तराचे बक्षिस मिळाले आहे त्यापेक्षा खालच्या स्तरावर स्पर्धेसाठी पुढील 5 वर्ष सहभागी होता येणार नाही.
तसेच एखाद्या स्तरावर ज्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले आहे त्या स्तरावर त्या क्रमांकाच्या खालच्या क्रमांकाकरिता पुढील 5 वर्ष स्पर्धक म्हणुन ग्राह्य धरले जाणार नाही.
पिक स्पर्धा पुरस्कारासाठी पात्र होण्यासाठी किमान किती उत्पादन होणे आवश्यक आहे-
ज्या शेतकरी यांची उत्पादकता तालुक्याच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा (मागील 5 वर्षाची सरासरी उत्पादकता) दिडपट किंवा त्यापेक्षा अधिक आहे असे शेतकरी पिक स्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येतील.
आवश्यक कागदपत्रे-
7/12,
8अ,
विहित नमुन्यातील अर्ज,
आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र,
प्रवेश शुल्क भरल्याचे चलन.
अर्ज भरण्याची अंतीम मुदत-
मुग व उडीद साठी- 31 जुलै
भात ज्वारी बाजरी मका नाचणी सोयाबीन तुर सूर्यफूल भुईमूग साठी- 31 ऑगस्ट
रबी पिकांसाठी- 31 डिसेंबर
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक पिकासाठी प्रवेश शुल्क किती आहे-
सर्वसाधारण शेतकरी -300 रु.
आदिवासी शेतकरी- 150 रु.
एकदा भरलेली फी परत मिळत नाही.
प्रवेश शुल्क कुठे भरावे-
प्रवेश शुल्क शेतकरी यांनी स्वत: खालील लेखाशिर्षामध्ये शासकीय कोषागारात विहित मुदतीत जमा करावे-
0401 पिक संवर्धन
104- शेती क्षेत्रापासून प्राप्त जमा रकमा
(00) (02) पिक स्पर्धा योजनेखालील जमा रकमा
0401047301
अधिक माहितीसाठी-
शासन निर्णय दिनांक 20 जुलै 2023
मार्गदर्शक सुचना दिनांक २८-७-२०२३