Total Pageviews

उन्हाळी हंगाम-21-22 भुईमूग प्रमाणित बियाणे वितरण- ग्राम बिजोत्पादन अनुदान

 राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत 


बियाणे लागवड व साहित्य उपअभियान 


उन्हाळी हंगाम-भुईमुग प्रमाणित बियाण्याकरिता 


ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम २०२१-२२  ( कोकण विभाग वगळता सर्व जिल्ह्यात हा कार्यक्रम आहे)



योजना कोणत्या विभागामार्फत  राबवली जाते  -



महाबीज व कृषी विभाग 



योजनेची माहिती -




शेतकरी यांना भुईमुग  बियाण्याचे प्रमाणित  बियाणे अनुदानावर मिळते. 


या शेतकऱयांना महाबीज मार्फत बीजोत्पादन कार्यक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते. 


सर्व तांत्रिक बाबींची  काळजी घेऊन यापासून उत्पादित होणारे बियाणे शेतकरी यांनी योग्य रीतीने जातं करून पुढील दोन हंगामापर्यंत स्वतः साठी व उर्वरित बियाणे आजूबाजूचे शेतकरी यांना पेरणीसाठी देणे आवश्यक आहे. 


परंतु तीन हंगामानंतर शेतकरी यांनी बियाणे बदल करणे आवश्यक आहे. 



योजनेत शेतकरी यांना काय लाभ मिळतो -



शेतकरी यांना भुईमूग  बियाण्याचे प्रमाणित बियाणे अनुदानावर मिळते. 


भुईमूग बियाण्यासाठी (टीएजी-24) 

पैकिंग साईज- २० किलो

विक्री किंमत- १६५०० रु.

अनुदान -रु. ७० प्रति किलो . 

शेतकरी यांनी भरावयाची रक्कम- रु.९५ प्रती किलो.


लाभार्थी शेतकरी अनुदान वगळता उर्वरित बियाण्याची रक्कम भरून महाबीज चे तालुक्यातील अधिकृत विक्रेते यांचेकडून बियाणे उचल करतील. 


 



लाभार्थी निवड-


सन 2021-22 पासून सदर योजना केंद्रीभूत दृष्टीकोन स्वरुपात राबवण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षाकरीता तालुक्यातील प्रती वर्ष १/३ गावांची निवड करुन या गावांमधील लाभार्थी निवड करण्यात येणार आहे.


निधी खर्चाचे प्रमाण-

अनुसूचित जाती करीता- 31 टक्के

अनुसूचित जमाती करीता- 17 टक्के

सर्वसाधारण प्रवर्गा करीता- 52 टक्के 



बियाणे कसे आणि कोठे मिळेल-




बियाणे परमिट वर मिळेल. बियाणे हे तालुक्यातील महाबीज च्या अधिकृत विक्रेते  कृषी केंद्रात मिळेल.



बियाणे परमिटची छपाई करून परमिटचा पुरवठा महाबीज कडून कृषी विभागास करण्यात येईल. परमिट चे वाटप कृषी विभागामार्फत करण्यात येते.  


 


शेतकऱ्यांना किती बियाणे मिळेल-



एक एकर क्षेत्र मर्यादे पर्यंत . 




अर्ज कुठे करावा-


महाडीबिटी वर https://mahadbtmahait.gov.in 


अर्ज करण्याची अंतीम तारीख- 28 जानेवारी 2022


ऑनलाईन अर्ज कमी आल्यास ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेण्यात येतील.


 


आवश्यक कागदपत्रे-


७/१२ व आधार कार्ड, मोबाईल नंबर


 


संपर्क-



महाबीज कार्यालय 


कृषी विभाग कार्यालये 


 


मार्गदर्शक सूचना दि. २०.१.२०२२


https://drive.google.com/file/d/1npsct7QiJyUpErhJjFMd3uzZEY0Ucm1t/view?usp=drivesdk