Total Pageviews

राज्यातील शेतकरी यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे

 राज्यातील शेतकरी यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे-

विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान  व तेथील शेतकरी यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांचेशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी तसेच संस्थांना भेटी इ.द्वारे  राज्यातील शेतकरी यांचे ज्ञान आणी क्षमता उंचावणे हा या योजनेचा ऊद्देश आहे.यासाठी राज्यातील शेतकरी यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार आहेत.


कोणत्या देशात अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार -

जर्मनी, फ्रान्स, स्पेन, स्विटझरलँड, ऑस्ट्रिया, न्यूझीलंड, नेदरलॅंड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर इत्यादी.


सदर अभ्यास दौर्यात शेतकरी स्वत: जाऊ शकतात की प्रवासी कंपनी मार्फत आयोजन करण्यात येईल-

सदर दौर्यात शेतकरी स्वत: एकटे जाऊ शकणार नाहीत. प्रवासी कंपनी मार्फत दौरा आयोजित केला जाईल.

एका अभ्यास दौर्यात ४० ते ५० शेतकरी निवडले जातील.


या योजनेसाठी शेतकरी निवडीचे निकष काय आहेत-

१) लाभार्थी स्वत: शेतकरी असावा.

२) उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे.

३) शासकीय, निमशास्कीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरी नसावी. तसेच डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार इ.नसावा.

४) वय  २५ ते ६० असावे.

५) कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळेल. (कुटुंब म्हणजे पती, पत्नी व १८ वर्षाखालील मुले/मुली). स्वखर्चाने सुद्धा कुटुंबातील इतर सदस्यास सोबत नेता येणार नाही.

६) यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा.

७)  शेतकरी यांचे कडे वैध पासपोर्ट असावा. पासपोर्ट ची मुदत दौरा निघण्यापुर्वी किमान ६ महिने असावी.


अर्जासोबत कोणती कागदपत्रे लागतात-

१) अर्ज विहीत प्रपत्रात (प्रपत्र-९)

२) ७/१२ व ८ अ उतारा

३) उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असलेबाबतचे स्वयं घोषणापत्र( प्रपत्र-१)

४) शिधापत्रिकेची झेरॉक्स

५) आधार कार्ड ची प्रत

६)  १२ वी पास झाल्याचे प्रमाणपत्र

७)  पासपोर्ट ची वैधता/मुदत द

दर्शवणारे पान झेरॉक्स



सदर अभ्यास दौर्यासाठी अनुदान किती मिळेल-

एकुण खर्चाच्या ५० टक्के, जास्तीत जास्त १ लाख रु.अनुदान मिळेल.

सदर अनुदान हे अभ्यास दौरा पुर्ण करुन परत आल्यानंतर मिळेल.

शेतकरी यांनी अभ्यास दौरा खर्चाची १०० टक्के रक्कम प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरणे आवश्यक आहे. सदर रक्कम ही कैशलेस पद्धतीने स्वत:च्या आधार लिंक बँक खात्यातून एनइएफटी/आरटीजीएस/आयएमपीएस/धनाकर्ष/धनादेशाद्वारे प्रवसी कंपनीस देणे आवश्यक आहे.


शेतकरी निवडीची कार्यपद्धती काय आहे-

शेतकरी यांनी अर्ज केल्यानंतर पात्र शेतकरी यांची निवड जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात सोडत पद्धतीने करण्यात येईल.

सोडत ही जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती समोर घेण्यात येईल. सोडतीचा दिनांक वेळ ठिकाण स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल. शेतकरी या सोडतीच्या वेळी उपस्थीत राहू शकतात.

सोडत प्रक्रिया राबवून तयार केलेली जेष्ठता क्रमवारी यादी कार्यालयाबाहेर दर्शनी भागात प्रसिद्ध करण्यात येईल. व यामधूनं जिल्ह्यास प्राप्त लक्षांका इतके अर्ज वरिष्ठ कार्यालयास पाठवले जातील. 

शेतकरी यांची एका आर्थिक वर्षात निवड न झाल्यास पुढील आर्थीक वर्षात पुन्हा अर्ज करावा लागेल.


अर्ज कुठे करावा-

तालुका कृषी अधिकारी कार्यालय


अधिक माहितीसाठी- 

 मार्गदर्शक सुचना दिनांक १५ जानेवारी २०२४