फार्म गेट पॅक हाऊस -राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत
फार्म गेट पॅक हाऊस -राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत
ऊद्देश-
1. उत्पादित फलोत्पादन, औषधी सुगंधी मालाची शेतावरच साफसफाई, प्रतवारी व आवश्यक वजनाचे पेकिंग करुन तात्पुरती साठवणूक करणे.
2. फळे फुले भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पती यासारख्या नाशवंत मालाचे आयुष्य व दर्जा वाढविणे.
3.कच्च्या मालावर प्राथमिक प्रक्रिया करुन उत्पादनाचे मुळ रुपात बदल न करता गुणात्मक वाढ करणे.
4. मध्यस्थांची संख्या कमी करुन प्रत्यक्ष उत्पादकाला वाजवी भाव मिळवून देणे व ग्राहकांना योग्य दरात माल उपलब्ध करुन देणे.
फळ्पीके/औषधी व सुगंधी वनस्पती/भाजीपाला पिके:-
फळ्पीके, भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पती यांच्या आवश्यकतेप्रमाणे किमान 30-50 मे.टन प्रतिवर्ष या क्षमतेच्या पैक हाऊस ची उभारणी करणे अपेक्षीत असून यामध्ये फळपीकांच्या व वनस्पतींच्या आवश्यकतेप्रमाणे स्वच्छता व प्रतवारी, मुळ रुपात बदल न करता काढणी पश्चात प्रक्रिया पैकिंग, सिलिंग यासाठी आवश्यक असणारी यंत्र सामुग्री,कच्चा माल व तयार मालासाठी साठवणूक सुविधा, हाताळणी साठी आवश्यक यंत्रना(ट्रॉली, प्लास्टिक क्रेटस), काढणी पश्चात व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना, पाण्याची सुविधा, टाकाऊ पदार्थांचा निचरा अथवा पुनर्वापर करणारी यंत्रणा या बाबींचा समावेश राहिल.
फुलपिके:-
फुलांसाठी उभारावयाच्या पैक हाऊस साठी येणारे खर्चात कटफ्लावर्स व कंदवर्गिय फुलां साठी प्रती वर्ष 2 लक्ष फुल दांडे किंवा सुट्या फुलां साठी 20-30 टन फुले प्रती वर्ष या क्षमतेचे पॅक हाऊस उभारणे अपेक्षीत आहे. यामध्ये फुलांची आवश्यकते प्रमाणे स्वच्छता, प्रतवारी, काढणी पश्चात प्रक्रिया, पैकिंग, सिलिंग यासाठी आवश्यक यंत्रणा , साठवणूक सुविधा, मोजमापे व हाताळणी यंत्रणा (ट्रॉली, प्लास्टिक क्रेटस), काढणी पश्चात व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना, टाकाऊ पदार्थांचा निचरा अथवा पुनर्वापर करणारी यंत्रणा या बाबींचा समावेश राहिल.
अर्थसहाय्य्य-
ग्राह्य भांडवली खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रु. २.४० लाख.
बांधकामाचे आकारमान - ९ x ६ मी.
अधिक माहितीसाठी-
मार्गदर्शक सूचना दिनांक २०-८-२०२५