स्मार्ट अंतर्गत- पुरक व नाविन्यपुर्ण गुंतवणूक उपप्रकल्प
जागतीक बैंक अर्थसहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत-
पुरक व नावीन्यपुर्ण गुंतवणूक उप्रकल्प(CII) राबविणेसाठी अनुदान-
यामध्ये समुदाय आधारीत संस्थांना शासन नोंदणीकृत सेवा पुरवठादार यांचेकडून तंत्रज्ञान आधारीत सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी अनुदान देण्यात येते.
हे अनुदान कुणाला मिळेल-
ज्या समुदाय आधारीत संस्था (CBO) यांना स्मार्ट अंतर्गत उत्पादक भागीदारी उपप्रकल्प/बाजार सम्पर्कवाढ उपप्रकल्प/धान्य गोदाम आधारीत उपप्रकल्प या अंतर्गत अंतीम मान्यता प्राप्त झालेली आहे व अनुदानाचा प्रथम हप्ता वितरीत करण्यात आलेला आहे.
अनुदान कशासाठी मिळेल-
सिबिओ यांनी तंत्रज्ञान सेवा पुरवठादार संस्था (DAT) यांचेकडून सहा प्रकारच्या सेवांपैकी कोणतीही एक सेवा किंवा घेतल्यास.
कोणकोणत्या सेवा सिबिओ घेऊ शकतात-
सहा प्रकारच्या सेवा आहेत. यामध्ये
i) डिजिटायझेशन सोल्युशन
(Digitization solutions)
ii) मुल्य साखळी विकास व संकलन प्लैटफॉर्म (value chain actor aggregator platform)
iii) अचुक कृषी व ऑटोमेशन सेवा (Precision Agriculture and Automisation)
iv) शहरी अन्नप्रणाली व लॉजिस्टीक सोल्युशन (Urban Food System and Logistic Solitions)
v) मार्केट लिँकेज व ट्रेसिबिलिटी सोल्युशन (Market Linkage and Traceability Solutions)
vi) आर्थिक सेवा मधील सुलभ प्रवेश प्रक्रिया(Access to Financial Services)
सिबिओ यांना अनुदान किती मिळेल-
सिबिओ यांना या सेवा घेण्यासाठी येणार्या खर्चाच्या 60 टक्के अनुदान मिळेल.
अर्ज कुठे करावा-
आत्मा कार्यालय
सेवा पुरवठादार कंपन्या कोणत्या आहेत-
1. Fresh produce Value Creation Services pvt ltd (Go4Fresh)Mumbai- Mr.Maruti Chapake- 8692907771
2.Vesatogo Innovations pvt ltd Nashik- Mr.Akshay Dixit- 8552072365
3.Arya Collateral Warehousing services pvt ltd ,New Delhi- Mr. Subir Kumar-8800267396
4. Ace Ventura -Arth Agri ltd Pune- Mrs. Devyani Chimote- 9945458140
5. InQube innoventures Pvt Ltd Kolkata- Mr.Tridibesh Bandyopadhyay.9830094595, Mr.Sachin Zagade- 8380091803
6. Farmsio Technologies pvt ltd Chennai- Mr. Surjit Sinha- 9985255528
7. Suchet Agri LLP Pune- Mr.Nayan Bora- 9960541144
8. Agro NXT services ,Noida(UP) Mr. Rajat Vardhan- 9958194364
9. Emertech Innovations ltd. Belapur (Mumbai)- Mr. Gaurav Somwanshi -9561707654
अधिक माहिती साठी मार्गदर्शक सुचना दि. 29.8.23
--xx--