Total Pageviews

कांदा चाळ- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत

महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणुन कांदा चाळ-


कांदा चाळ या बाबीचा लाभ कोण घेऊ शकतात?

वैयक्तीक शेतकरी,  शेतकरी गट 


कांदा चाळ उभारण्या साठी अनुदान किती आहे-


मजुरीसाठी-(मजुरी रु.२७३ x  लागणारे मनुष्यदिन- ३५२.४५)= रु. ९६२२०

सामुग्रीसाठी (मजुरी: सामुग्री ६०: ४० प्रमाणे)-  रु. ६४१४७


असे एकुण अनुदान - रु. १६०३६७


याव्यतिरिक्त लागणारा कुशल खर्च (लोकवाटा) - २९८३६३


असा कांदा चाळी साठी येणारा एकुण खर्च- रु.४५८७३०



कांदा चाळ किती क्षमतेची उभारावी लागेल-


२५ मे. टन क्षमतेची.

आकारमान- लांबी- १२ मी. रुंदी- ३.९० मी. उंची- २.९५ मी.


कोणते विभाग कार्यान्वयीन यंत्रणा म्हणुन काम करतात?

पंचायत, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,  जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पणन विभाग.


अधिक माहिती साठी-

नियोजन विभाग, शासन निर्णय दि. १८.५.२०२३