नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-२ - बांबू लागवड (वैयक्तिक लाभ)
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-२ -
बांबू लागवड (वैयक्तिक लाभ)
अ .लाभार्थी पात्रता-
शेतकरी यांचे स्वत:चे नावे ७/१२ असणे आवश्यक. वैयक्तिक शेतकरी यांनाच लाभ देय.
जर ७/१२ उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे बांबू लागवडी साठी संमती पत्र आवश्यक.
७/१२ उताऱ्यावर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमतीपत्र आवश्यक.
लाभार्थी यांच्या मालकीची किमान ०.१० हे व कमाल ५ हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
कमाल ५ हेक्टर क्षेत्रापर्यंत लागवडीचा लाभ घेता येईल. इतर योजनेतुन यापूर्वी लाभ घेतला असल्यास (फळबाग, बांबू, वृक्ष इ.) लाभ घेतलेले क्षेत्र ५ हेक्टर या कमाल मर्यादेतून वगळून उर्वरित क्षेत्रासाठी लाभ घेता येईल.
ब. बांबू लागवड कुठे करता येईल-
लाभार्थीच्या शेतात,
पडित क्षेत्रात ,
शेताच्या बांधावर,
वैयक्तिक/सामुदायिक शेततळ्याच्या बांधावर
क. अनुदान किती मिळेल-
१) शैताचे परिघीय क्षेत्र व बांधावर लागवड-
यासाठी ५ मीटर अंतरावर प्रति हेक्टर कमाल ८० झाड़े यासाठी प्रति झाड़ कमाल ३०० रु. अनुदान आहे.
२) सलग लागवड-
शेतात सलग लागवडीसाठी ५ x ५ मीटर अंतरावर लागवड (हेक्टरी ४०० झाड़े) यासाठी रु. १२००००/- प्रति हेक्टर इतके अनुदान आहे. प्रति झाड़ कमाल ३०० रु. अनुदान
अनुदान दोन टप्प्यात देण्यात येते -पहिल्या वर्ष ६० टक्के व दुसऱ्या वर्ष ४० टक्के.
दुसऱ्या वर्षी किमान ८० टक्के झाड़े जिवंत उसने आवश्यक आहे तरच दुसऱ्या वर्षाचे अनुदान मिळते.
दुसऱ्या वर्षाचे अनुदान हे लागवड केलेल्या दिनांकांपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर देण्यात येते.
ड. लागवड केंव्हा करावी-
लागवड वर्षभरात केव्हाही करता येईल.
तालुका कृषि अधिकारी यांचेकडून पूर्व संमती प्राप्त झाल्यानंतर शेतकरी यांनी बांबू रोपे वन विभाग/कृषि संशोधन केंद्र/कृषि विज्ञान केंद्र/शासकीय रोपवाटीका / राष्ट्रीय बांबू बोर्डाने प्राधिकृत केलेल्या रोपवाटिका यामधून खरेदी करावीत व बांबू लागवड करावी
पूर्वसंमती मिळाल्यानंतर बांबू लागवडीची कार्यवाही १२० दिवसात पूर्ण करावी.
लागवड पूर्ण झाल्यानंतर रोपे खरेदो व इतर साहित्य खरेदीची देयके ऑनलाइन अपलोड करुन अनुदान मागणी करावी .
ड.अर्ज कुठे करावा -
इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी पूर्ण झाल्यानंतर DBT App द्वारे ऑनलाइन अर्ज करावा.
शेताचे परिघीय क्षेत्र/बांधावरील बांबू लागवड साठी प्रति झाड़ आर्थिक मापदंड -
अंतर-५ मीटर प्रति हेक्टर झाड़े- ८०
सलग बांबू लागवड - आर्थिक मापदंड -
अंतर-५ x ५ मीटर प्रति हेक्टर झाड़े- ४००
प्रति झाड़ ३०० रु. आर्थिक मापदंड
अधिक माहितीसाठी -
मार्गदर्शक सूचना दिनांक २८-१०-२०२५