निर्यातक्षम फळे व भाजीपाला बागांचे ट्रेसिबिलिटी नेट द्वारे नोंदणी करणे -
निर्यातक्षम फळे व भाजीपाला बागांचे ट्रेसिबिलिटी नेट द्वारे नोंदणी करणे -
राज्यातील फळे व भाजीपाला पिकांचे उत्पादन करुन यूरोपियन व इतर देशांना निर्यात केले जाते. यूरोपियन देशांनी किडनाशक उर्वरित अंश मुक्त ची हमी अटघातल्याने सन २००४-०५ पासून राज्यात अपेडा च्या मार्गदर्शनाखाली ग्रेपनेट या ऑनलाइन कार्यप्रणाली द्वारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची ऑनलाइन नोंदणी करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. सन २०२२-२३ या वर्षाकरिता सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांना नोंदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. राज्यातून द्राक्षाची निर्यात वाढून त्याचा फायदा द्राक्ष बागायतदारांना होत आहे.
ग्रेपनेट ची यशस्वी अंमलबजावणी लक्षात घेऊन आंब्याकरीता मँगो नेट , डाळिंबाकरिता अनारनेट, भाजीपाला पीकांकरिता व्हेजनेट, संत्रा मोसंबी लिंबू करीता सिट्रस नेट, खाण्याचे पान करीता बीटल नेट, कांद्या करीता ओनियन नेट आणि बोर लिची अननस वाटरचेस्टनट कवठ व केळी या फळ पिकांसाठी ऑदरफ्रूट नेट या ऑनलाइन नोंदणी करीता अपेडा च्या साइट वर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ही निर्यातक्षम फळे व भाजीपाला बागांच्या नोंदणीची सुविधा ३४ जिल्ह्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
जागतिक बाजारपेठेतील ग्राहकां बरोबरच स्थानिक बाजार पेठेतील ग्राहकां मध्ये आरोग्याच्या सुरक्षेबाबत विशेषतः किडनाशक उर्वरित अंश बाबत जागरूकता निर्माण झालेली आहे. किटकनाशकांच्या अती वापरामुळे आरोग्याच्या सुरक्षिततेबाबत “सुरक्षित अन्न पिकवा (Grow Safe Food)”ची अंमलबजावणी करणे बाबत केंद्र शासनाने सूचित केले आहे. तसेच स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांना किडनाशक उर्वरित अंश ची हमी देण्याकरीता भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाने अधिकतम उर्वरित अंश मर्यादा (MRL-Maximum Residue Limit) निर्धारीत केल्या आहेत.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सप्टेंबर २०२२ पासून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये किड व रोगाचे नियंत्रणासाठी लेबल क्लेम औषधांच्या वापराबाबत , त्याचे रेकॉर्ड ठेवणे,किड रोग मुक्त क्षेत्र इ. बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सन २०२२-२३ मध्ये द्राक्ष,आंबा ,डाळिंब,भाजीपाला,संत्रा ,मोसंबी ,लिंबू या पिकांचे ट्रेसिबिलिटी द्वारे नोंदणी निर्यातक्षम बागची नोंदणी प्रशिक्षण करण्याच्या कामाकरीता कृषि उपसंचालक यांना समन्वय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. निर्यातक्षम बागांची तपासणी करण्याकरीता कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व कृषि अधिकारी यांना तपासणी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्याचा कालावधी -