Total Pageviews

फळबाग , फुलपिके , औषधी वनस्पती , मसाला पिके , भाजीपाला लागवड-नविन बागांची स्थापना- (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

 

फळबाग , फुलपिके , औषधी वनस्पती , मसाला पिके लागवड (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

फळपिके, फुलपिके , औषधी वनस्पती , सुगंधी वनस्पती,  मसाला पिके-

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत फळपिके /पिके, फुलपिके, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती  लागवडी साठी म्हणजेच नवीन बागा स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. 

 फळपिके /पिके, फुलपिके, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती  लागवडी साठी जास्तीत जास्त २ हेक्टर प्रति लाभार्थी या मर्यादे प्रमाणे अनुदान देण्यात येते. 

हे अनुदान देण्यासाठीचे  खर्चाचे मापदंड हे ठिबक  सिंचनाशिवायचे आहेत. त्यामुळे या पिकांना  ठिबक सिंचन करण्यासाठी अनुदान इतर योजनेतून घेता येईल. 

दुसरी बाब म्हणजे या फळपिके /पिके, फुलपिके, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती या सर्वच पिकांच्या लागवडीसाठी चे अनुदान हे एकाच वेळी न देता दोन टप्प्यात ६०:४० या प्रमाणे देण्यात येते. 

खालील पिकांची लागवड केल्यानंतर दुसऱ्या वर्षी ८० टक्के झाडे जिवंत असणे आवश्यक आहे.  

मात्र  स्ट्रॉबेरी,फुलपिके, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती  साठी दुसऱ्या वर्षी ८० टक्के झाडे जिवंत असणे बाबत ची अट नाही. 

नविन बागांची स्थापना करणे -फळपिकेमापदंडअर्थसाह्य (रु.) प्रति हेक्टर
सर्वसाधारण क्षेत्र-४०%अधिसूचित क्षेत्र -५०%
स्ट्रॉबेरी२ लाख/हे.८००००१०००००
ड्रैगन फ्रूट६.७५ लाख/हे.२७००००३३७५००
पैशन फ्रूट२.७५ लाख/हे.११००००१३७५००
किवी२.५० लाख/हे.१०००००१२५०००
द्राक्षे३ लाख/हे.१२००००१५००००
खजूर (टिश्यू कल्चर)४ लाख/हे.१६००००२०००००
केळी आणि अननस (सकर्स)१.१० लाख/हे.४४०००५५०००
केळी आणि अननस (टिश्यू कल्चर )१.७५ लाख/हे.७००००८७५००
फळे -जसे अवोकेडो, पसीमोन, ड्यूरियन , जर्दाळू(Apricot), नाशपती (Pear),पीच , प्लम , चेरी, ब्लूबेरी,अंजीर, मैंगोस्टीन, रामबुटान इ.१.२५ लाख/हे.५००००६२५००
फळे - पपई , फालसा, चिकू, चिंच, जांभूळ,बेल, करवंद,बोर,फणस,खिरणी, कवठ, आवळा, सी बकथॉर्न, गार्सिनिया, हनुमानफळ इ.७५०००/हे.३००००३७५००
आंबा ,पेरू,लीची, डाळिंब, मोसंबी इ. च्या नविन बागा
नियमित अंतर१.२५ लाख/हे.५००००६२५००
उच्च घनता२ लाख/हे.८००००१०००००
अतिउच्च घनता२ लाख/हे.१२००००१५००००
सफरचंद
नियमित अंतर१.२५ लाख/हे.५००००६२५००
सपोर्ट सिस्टम सह उच्च घनता (किमान २२२२ झाड़े/हेक्टर)५ लाख/हे.२०००००२५००००
सपोर्ट सिस्टम सह अतिउच्च घनता (किमान ३३३३ झाड़े/हेक्टर)७.५० लाख/हे.३०००००३७५०००
काजू
नियमित अंतर७५०००/हे.३००००३७५००
आंतरपीक सह५००००/हे.२००००२५०००
उच्च घनता (किमान ४०० झाड़े/हेक्टर)१.५० लाख/हे.६००००७५०००
कोको
नियमित अंतर७५०००/हे.३००००३७५००
आंतरपीक सह५००००/हे.२००००२५०००
बदाम३ लाख/हे.१२००००१५००००
अक्रोड४ लाख/हे.१६००००२०००००



पुष्पोत्पादन -फुलपिके
नविन बागांची स्थापना करणे -पुष्पोत्पादन
मापदंड
अर्थसाह्य (रु.) प्रति हेक्टर
सर्वसाधारण क्षेत्र-४०%अधिसूचित क्षेत्र -५०%
दांडयाची फुले१.२५ लाख/हे.५००००६२५००
कंदवर्गीय फुले२.५० लाख/हे.१०००००१२५०००
सूटी फुले५००००/हे.२००००२५०००
मसाला पिके
नविन बागांची स्थापना करणे -मसाला पिके
मापदंड
अर्थसाह्य (रु.) प्रति हेक्टर
सर्वसाधारण क्षेत्र-४०%अधिसूचित क्षेत्र -५०%
बी वर्गीय मसाला पिके५००००/हे.२००००२५०००
कंद वर्गीय मसाला पिके१ लाख/हे.४००००५००००
बहुवर्षीय मसाला पिके१ लाख/हे.४००००५००००
औषधी व् सुगंधी वनस्पती लागवड
नविन बागांची स्थापना करणे -औषधी व् सुगंधी वनस्पती
मापदंड
अर्थसाह्य (रु.) प्रति हेक्टर
सर्वसाधारण क्षेत्र-४०%अधिसूचित क्षेत्र -५०%
खर्चीक सुगंधी वनस्पती (Rose, Rosemary, Tuberose, Geranium, Chamomile, sandalwood, Davana, Jasmine, Lavender etc.)१.२५ लाख/हे.५००००६२५००
इतर सुगंधी वनस्पती (Palmarosa, Lemongraas, Tulsi,Vetiver, Java, Citronella, Sweet Basil)५००००/हे.२००००२५०००
औषधी वनस्पती (Mulethi, शतावरी,, Kalihari, Shwet Musali, Guggle, मंजिष्ठा, कुटकी, Atees, जटामानसी, अश्वगंधा,ब्राम्ही,तुलसी,Vidarikand, Pippali, Chirata,Pushkarmool etc.)१.५० लाख/हे.६००००७५०००



भाजीपाला
नविन बागांची स्थापना करणे -भाजीपाला
मापदंड (रु.)
अर्थसाह्य (रु.) प्रति हेक्टर
सर्वसाधारण क्षेत्र-४०%अधिसूचित क्षेत्र -५०%
संकरीत भाजीपाला६००००/हे.२४०००३००००
कांदा आणि लसुन खुले परागीकरण५००००/हे.२००००२५०००