Total Pageviews

रोपवाटीका स्थापन करणे (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

 रोपवाटीका स्थापन करणे  साठी अनुदान - (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

१) मोठी रोपवाटीका  ( १ ते २ हे.)  (अधिसूचित क्षेत्रासाठी किमान क्षेत्राची मर्यादा--०.५० हे)-

मापदंड - रु. ३० लाख/हे. 

अर्थसाह्य -  सार्वजनिक क्षेत्र -१००%, खाजगी क्षेत्र - ४०%

बॅंक कर्जाशी निगडीत 

सदर रोपवाटिकेमधून दरवर्षी बहुवर्षीय फळपिके , वृक्ष प्रजातीय मसाला पिके व वृक्ष प्रजातीय सुगंधी  वनस्पतीची कमीत कमी १००००० कलमे/रोपे प्रती हेक्टर तयार करणे बंधनकारक राहील. ही कलमे/रोपे गुणवत्तापूर्ण तसेच गुणवत्तेबाबत प्रमाणीकरण केलेली असावीत. 

अनुदान मिळाल्यापासून १८ महिन्याच्या आत नामांकन प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक राहील. 

२) लहान  रोपवाटीका (०.४० ते १ हे.)-

मापदंड - रु. २० लाख/हे. 

अर्थसाह्य - सार्वजनिक क्षेत्र -१००%, खाजगी क्षेत्र - ५०%

बॅंक कर्जाशी निगडीत 

सदर रोपवाटिकेमधून दरवर्षी बहुवर्षीय फळपिके , वृक्ष प्रजातीय मसाला पिके व वृक्ष प्रजातीय सुगंधी  वनस्पतीची कमीत कमी ५०००० कलमे/रोपे प्रती हेक्टर तयार करणे बंधनकारक राहील. ही कलमे/रोपे गुणवत्तापूर्ण तसेच गुणवत्तेबाबत प्रमाणीकरण केलेली असावीत. 

अनुदान मिळाल्यापासून १८ महिन्याच्या आत नामांकन प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक राहील. 

३) मानांकन प्राप्त करण्यासाठी रोपवाटिकेच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे (२ हे. पर्यंत )-

मापदंड - रु. ४  लाख/हे. 

अर्थसाह्य - सार्वजनिक क्षेत्र -१००%, खाजगी क्षेत्र - ५०%

बॅंक कर्जाशी निगडीत 

सदर रोपवाटिकेमध्ये पुढीलप्रमाणे सोयी सुविधांचा समावेश करावा-माती निर्जंतुकीकरण , विषाणु परिक्षण सुविधा (लिंबू वर्गीय व सफरचंद), हार्डनिंग चेंबर/नेट हाउस ,मिस्ट चेंबर,मातृवृक्ष लागवड,इरिगेशन आणि फर्टिगेशन सुविधा/यूनिट. 

अनुदान मिळाल्यापासून १८ महिन्याच्या आत नामांकन प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक राहील. 

४) उच्च तंत्रज्ञान आधारीत प्लग टाईप रोपवाटीका (०.२ ते १ हे.)-

मापदंड - रु. १२००/ चौ.मी. प्रकल्प आधारीत 

अर्थसाह्य - सार्वजनिक क्षेत्र -१००%, खाजगी क्षेत्र - ५०%

बॅंक कर्जाशी निगडीत 

कमित कमी ८० हजार प्लग/१०० चौ.मी./वर्ष उत्पादन करणे आवश्यक. २०००० प्लग च्या ४ सायकल.

अनुदान मिळाल्यापासून १८ महिन्याच्या आत नामांकन प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक राहील.