ड्रोन drone
ड्रोन बाबत मार्गदर्शक सुचना-
अंमलबजावणी यंत्रणा कोण आहेत-
सद्यस्थितीत केंद्रीय कृषी यंत्रे/अवजारे परीक्षण व प्रशिक्षण संस्था, भारतीय कृषी अनुसंधान संस्था, कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादक संघ आणि कृषी विद्यापीठे तसेच राज्य शासन यांचा अंमलबजावणी यंत्रणा म्हणून समावेश आहे.
योजनेचे घटक कोणते आहेत-
यामधे दोन बाबी राबविण्यात येत आहेत -
1. ड्रोन ची प्रात्यक्षिके
2. ड्रोन खरेदी साठी अर्थसाह्य
अनुदान किती आहे-
ड्रोन ची प्रात्यक्षिके आयोजित करण्यासाठी कृषी यंत्रे/अवजारे परीक्षण व प्रशिक्षण संस्था, भारतीय कृषी अनुसंधान संस्था, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठे यांना ड्रोन खरेदी करणेसाठी 100 टक्के किंवा जास्तीत जास्त रु. 10 लाख इतके अर्थसाह्य आहे. त
शेतकरी उत्पादक संघ यांना 75 टक्के कमाल रु. 7.50 लाख अर्थसाह्य देय आहे.
तसेच अवजारे बँके मध्ये ड्रोन चा समावेश करण्यात आलेला असून अवजारे बँक स्थापन करून इतर शेतकऱ्यांना ड्रोन भाडेतत्वावर देण्यासाठी अवजारे बँक साठी 40 टक्के किंवा जास्तीत जास्त रु. 4.00 लाख इतके अर्थसाह्य शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संघ आणि खाजगी उद्योजक यांना देय आहे.
कृषी पदवीधर यांना अवजारे बँक स्थापन करण्यासाठी 50 टक्के किंवा जास्तीत जास्त रु.5.00 लाख इतके अर्थसाह्य देय आहे
अधिक माहितीसाठी-
केंद्र शासनाच्या दि. 17 जानेवारी 2022 च्या मार्गदर्शक सुचना-
मार्गदर्शक सुचना दि.28 फेब्रुवारी 2023
ड्रोन साठी करावयाचा अर्जाचा नमुना-