Total Pageviews

hortsap

 CROPSAP योजने अंतर्गत फलोत्पादन पिकांवरील कीड -रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन कार्यक्रम (HORTSAP)-


सदर कार्यक्रम कोणत्या पिकांसाठी लागू आहे? 


आंबा काजू डाळिंब केळी संत्रा मोसंबी चिकू भेंडी आणि टोमॅटो ( ९ पिके )


यामध्ये शेती शाळा कोणत्या पिकांसाठी आयोजित करण्यात येतात? 


डाळिंब केळी संत्रा मोसंबी चिकू भेंडी आणि टोमॅटो


या योजनेचा उद्देश काय आहे -


कीड  रोगांच्या प्रादुर्भावा  बाबत शेतकऱ्यांना वेळीच उपाययोजना सुचवणे  

रोगांच्या आकस्मिक  प्रादुर्भावामुळे  शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळणे 

किडरोगांबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून कीड रोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे 

कीड रोग प्रादुर्भाव क्षेत्रा साठी  आपत्कालीन परिस्थितीत पीक संरक्षण औषधांचा पुरवठा करणे 

वारंवार येणाऱ्या कीड रोगांबाबत सांख्यिकी माहिती संकलित करणे आणि कायमस्वरूपी स्वरूपाच्या व्यवस्थापनाबाबत कृषी विद्यापीठाच्या सहाय्याने शिफारशी निश्चित करणे 


ही योजना कोणत्या पिकांसाठी आणि कोणत्या जिल्ह्यांसाठी राबवण्यात येत आहे-


आंबा - ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक नंदुरबार पुणे धाराशिव सोलापूर छत्रपती संभाजी नगर 

काजू -पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर 

डाळिंब- नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर सातारा सांगली छत्रपती संभाजी नगर जालना बीड 

केळी- जळगाव धुळे नंदुरबार पुणे सोलापूर हिंगोली नांदेड अकोला अमरावती अहिल्यानगर  धाराशिव 

संत्रा -अहिल्यानगर अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर बीड वर्धा व परभणी 

मोसंबी- जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजी नगर जालना बीड अमरावती नागपूर 

टोमॅटो- नाशिक पुणे अहिल्यानगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर 

भेंडी- ठाणे पुणे सोलापूर 

चिकू -पालघर


पीकनिहाय कोणत्या कीड रोगांचे सर्वेक्षण व सनियंत्रण  करण्यात येते-


आंबा- तुडतुडे फुलकेडे भुरी करपा फळभाशी 

काजू- ढेकण्या (टी मॉस्किटो बग), फुल किडे मूळ व खोड पोखरणारीअळी मोहरावरील करपा काजूवरील बोंड व बी पोखरणारी अळी

डाळिंब- फुल किडे फळ पोखरणारी अळी खोड भुंगे (शॉट होल बोरर), तेलकट डाग, मर 

केळी- सिगाटोका(करपा), फुलकिडे 

संत्रा व मोसंबी- काळी माशी पांढरी माशी सित्ट्रस सायला, पाणी पोखरणारी अळी कोळी फुलकडे फळातील रसशोषक पतंग साल खाणारी अळी फायटोप्थोरा 

टोमॅटो- फळ पोखरणारी अळी पांढरी माशी मावा फुलकीडे पाने पोखरणारी अळी (नागअळी) लाल कोळी, लवकर व उशिरा येणार करपा

भेंडी- शेंडा व फळ पोखरणारी अळी तुडतुडे मावा पांढरी माशी हद्दा बीटल , लाल कोळी भुरीरोग केवडा पिवळा मोझैक व्हायरस 

चिकू -फुलकळी पोखरणारी अळी फळातील बी पोखरणारी अळी फायटोप्थोरा रोग


पिकनिहाय सर्वेक्षण करण्याचा कालावधी -


डाळिंब केळी संत्रा मोसंबी चिकू भेंडी आणि टोमॅटो- १ जून ते ३१ मार्च 

आंबा काजू - १ ऑक्टोबर ते ३० जून 


या सर्वेक्षणाच्या आधारे आठवड्यातून दोनदा (सोमवार व गुरुवार) पीक संरक्षण सल्ले (Advisories) शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येतात. 


मार्गदर्शक सूचना दिनांक २९-५-२०२५