Large Area Certification
परंपरागत कृषी विकास योजने अंतर्गत
Large Area Certification मोठ्या क्षेत्राचे प्रमाणीकरण-
पारंपारिक पद्धतीने सेंद्रिय शेती करणारे डोंगराळ क्षेत्र किंवा आदिवासी भागातील क्षेत्र यामध्ये कोणत्याही विशिष्ट पिकावर लक्ष केंद्रित न करता त्या भागातील संपूर्ण पारंपरिक क्षेत्र सेंद्रीय शेतीसाठी घोषित करून त्या गावातील सर्व शेतकरी हे शेतकरी समूहात गणल्या जातील. अशा शेतकरी समूहास विभागीय परिषदेद्वारा पीजीएस-इंडिया प्रमाणिकरणासाठी National Program for Organic Production अंतर्गत प्रमाणिकरणा साठी रु. ६००० प्रति हेक्टर अर्थसहाय्य देय आहे.
क्षेत्र निवडीचे निकष-
१. पारंपरिक (Default) असलेल्या नैसर्गिक/सेंद्रिय क्षेत्राची निवड करण्यात यावी.
२. सेंद्रीय शेतीचे धोरण आणि पद्धती या प्रदेशातील सर्व शेतकऱ्यांनी स्वीकारणे आणि ग्रामपंचायतीची त्यास मान्यता असणे आवश्यक आहे.
३. निवडलेल्या क्षेत्रात मागील ५ वर्षात रासायनिक निविष्ठा वापर केला नसलेले आणि GMO मुक्त क्षेत्र असणे आवश्यक आहे.
४. सदर भौगोलिक प्रदेशात सर्व कृषी रसायने वापरण्यावर बंदी असेल.
५. सेंद्रीय शेती पद्धतीचा वापर करणे आणि सर्व शेतकऱ्यांकडून अंमलबजावणी करणे बंधनकारक असेल.
६. सर्व लागवडीखालील जमीन आणि शेतकऱ्यांचे दस्तऐवज घेण्यात यावेत आणि गावनिहाय समूह/गट तयार करून एकूण क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या संख्येसह गावाची एक युनिट म्हणून नोंदणी करावी लागेल.
७. पीजीएस-इंडिया च्या मार्गदर्शक सुचने नुसार विभागीय परिषदेद्वारा (Regional Council-RC)वार्षिक तपासणी केली जाईल.
८. एकदा संपूर्ण क्षेत्र किंवा ते गाव प्रमाणित झाल्यानंतर ते संपूर्ण सेंद्रिय क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल.
९. क्षमता संवर्धन आणि प्रमाणीकरण सुविधा यासाठी रु. २०००/-प्रति हेक्टर प्रति वर्ष याप्रमाणे ३ वर्षासाठी अर्थसहाय्य देय असेल.