Total Pageviews

महावेध mahavedh प्रकल्प

 


स्वयंचलीत हवामान केंद्र उभारण्यासाठी महावेध प्रकल्प


कृषी विभागाने डिसेंबर २०१६ मध्ये महावेध प्रकल्पाची सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून बांधा -मालक व्हा-चालवा (BOD) तत्वावर अंमलबजावणी करण्याकरीता निविदा प्रसिद्ध केली होती. 


या निविदा प्रक्रियेतून मे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. यांची या प्रकल्पाच्या अंमलबजावणी करीता सेवा पुरवठादार संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 


राज्यात सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलीत हवामान केंद्राची उभारणी Build-Own-Operate(BOD) तत्वावर करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणी करीता शासनाने व मे.स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा.ली.यांनी 15.2.2017 रोजी करारनामा केलेला आहे. महावेध प्रकल्पाची अंमलबजावणी सदर करारनाम्यातील तरतूदीनुसार करण्यात येत आहे व सदर करारनामा सर्व कायदेशीर बाबींसाठी अंतीम आहे.


महावेध मार्फ़त प्राप्त होणाऱ्या हवामानविषयक माहितीचा उपयोग मुख्यतः पिक विमा तसेच शेतकऱ्यांना कृषि विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी होत आहे. 


या संस्थेमार्फत राज्यात सर्व महसूल मंडळामध्ये आवश्यकतेनुसार स्वयंचलीत हवामान केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे.   


सर्व महसुली मंडळामध्ये स्वयंचलीत हवामान केंद्राच्या उभारणी करीता 5x7 मी.जागा शासनाने उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर जागांची मालकी शासनाचीच आहे. तथापी, महावेध प्रकल्पांतर्गत सदर जागांचा ताबा प्रकल्प कालावधीपर्यंत म्हणजे पुढील ७ वर्षे कालावधीसाठी मे.स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा.ली.यांना देण्यात आला आहे. 


सर्व महसूल मंडळा मध्ये स्वयंचलीत हवामान केंद्राची उभारणी पुर्ण झाल्यानंतर ७ वर्षे कालावधी साठी महावेध प्रकल्प, स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा.ली.यांनी स्वखर्चाने चालवून शासनास मोफत हवामान विषयक माहिती पुरवायची आहे.

 

महावेध प्रकल्पांतर्गत महसूल विभाग शासन निर्णय क्र. जमीन-२०१५/प्र.क्र.४५/ज-१ दि. १ जून २०१५ अन्वये प्रत्येक महसूल मंडळात शासकीय जागेचा ताबा मे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. यांना प्रकल्प कालावधी पर्यन्त देण्यात आलेला आहे. 


महावेध प्रकल्पांतर्गत सर्वसाधारण प्रदेशामध्ये १२x १२ किमी अंतरावर आणि डोंगराळ प्रदेशामध्ये ५ x ५ किमी अंतरावर एका स्वयंचलीत केंद्राची एका स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्याबाबत शासनाच्या सुचना आहेत. 


सर्व हवामान केंद्रांची देखभाल व दुरुस्ती आणी नादुरुस्त अथवा चोरी झालेल्या उपकरणांची बदली करावयाची जबाबदारी मे.स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा.ली.यांची आहे.


प्रत्येक स्वयंचलीत हवामान केन्द्राद्वारे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वार्याचा वेग आणि दिशा या हवामान विषयक घटकांची Real Time माहितीची प्रती 10 मिनिटांनी डेटा लॉगर मध्ये नोंद घ्यावयाची असुन सदर नोंदवलेली माहिती दर 1 तासाने सर्व्हर ला पाठवायची आहे. मे.स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा.ली. यांनी सदर हवामान विषयक Real Time माहिती शासनास क्लाउड सर्व्हरवर ७ वर्ष कालावधीकरीता मोफत उपलब्ध करुन द्यावयाची आहे.


सदर हवामान विषयक माहितीचा पिक विमा योजनेकरीता अधिकृत हवामान विषयक माहिती म्हणुन उपयोग करण्यात येईल. विमा कंपन्याना ही हवामान विषयक माहिती मे.स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा.ली.यांचेकडून विहित दराने खरेदी करणे बंधनकारक आहे.

मे.स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा.ली.यांना पिक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांना किमान 6 महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या हवामान विषयक माहितीची प्रती स्वयंचलीत हवामान केंद्र प्रती महिना रु.3250 अधिक कर व शुल्क या दरापेक्षा जास्त दराने विक्री करता येणार नाही. सदर मुळ दरामध्ये प्रकल्प कार्यान्वीत झाल्यापासून दर 3 वर्षानंतर 10 टक्के पर्यंत वाढ अनुज्ञेय राहील.आणि 6 वर्षानंतर सदर कमाल विक्री दर रु.3900 अधिक कर व शुल्क असा राहील. 

पिक विमा कंपन्यांना 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीची Real Time माहिती हवी असल्यास सदरच्या माहीतीच्या विक्रीचा दर ठरविण्याचा अधिकार मे.स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा.ली.यांना राहील.

प्रकल्पाचा 7 वर्षाचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर मे.स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा.ली.यांनी सर्व स्वयंचलीत हवामान केंद्रांचा ताबा शासनाकडे सोपवायचा आहे. सदर हवामान केंद्रावरील उपकरणे, डेटा लॉगर,सेन्सर्स, सोलर पैनेल, बैटरी व संबंधीत वायरींग मे.स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा.ली.घेउन जाऊ शकतील.तथापी प्रकल्प स्थळावरील कुंपण,फाऊंडेशन व अन्य स्थापत्य कामे शासन मालकीची राहतील.


महावेध प्रकल्प शासन निर्णय 8 मार्च 2017