Total Pageviews

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा)

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प-
              विदर्भ व मराठवाड्यातील  हवामान बदलास अती संवेदनक्षम ठरणारी 4210 दुष्काळग्रस्त गावांमध्ये तसेच विदर्भातील पुर्णा नदीचे खोरे  यातील खारपाण पट्यातील  932 गावे या प्रकल्पात निवडण्यात आलेली आहेत. यामध्ये राज्यातील 15 जिल्ह्यांचा समावेश आहे (औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बुलढाना, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ,वर्धा, व जळगाव ). या गावांमध्ये 6 वर्ष कालावाधीत  जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्याने रु.4000 कोटी अन्दाजीत खर्चाचा हवामान अनुकूल कृषी विकास प्रकल्प राबविण्यास शासनाने 2017 मध्ये मान्यता दिलेली आहे. 
गाव निवडीचे निकष -
१. हवामान विषयक अनुमानाबाबतचे निकष- (पर्जन्यमानाची  वारंवारता, तापमान, पावसातील खंड, अतिवृष्टी, अवेळी पाऊस इ.)
२. निव्वळ पेरणी क्षेत्राचे एकूण भौगौलिक क्षेत्राशी प्रमाण.
३. एकूण अवनत जमिनीचे एकूण भौगौलिक क्षेत्राशी प्रमाण
४. अवर्षण प्रवणता (दुष्काळाची वारंवारता)
५. भूजल स्थिती
६. अत्यल्प व अल्प भूधारक शेतकर्‍यांचे एकूण शेतकर्‍यांशी प्रमाण.
७. मासिक रु. ५००० पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोक संखेचे प्रमाण.
८. अनुसूचीत जाती व जमातीचे एकूण लोकसंखेची प्रमाण.
९. शेत मजुरांचे एकूण मजुरांशी प्रमाण.
१०. शेतकरी आत्महत्या
११. एकूण साक्षरता व महिला साक्षरतेमधील तफावत.
१२. गावांचा पशुधन निर्देशांक.
            या गावांचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करणेस प्रकल्प यंत्रणेस सहाय्य करणे,या आराखड्यास ग्राम सभेची मान्यता घेणे तसेच मंजूर वार्षिक कृती आराखड्या नुसार घटकांची अंमल बजावणी करणे, पात्र लाभार्थी यांची संबंधीत घटकांच्या  लाभासाठी निवड करणे यासाठी प्रकल्पांतर्गत समाविष्ट गावांच्या प्रत्येक ग्राम पंचायती मध्ये महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1959(49) अन्वये ग्राम सभेद्वारे ग्राम कृषी संजीवनी स्थापन करण्यात येते. या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे सरपंच तर सदस्य सचिव हे ग्रामसेवक असतात. कृषी संजीवनी समितीचे आर्थिक व्यवहार व प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सरपंच व कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यात येते. 
                   या प्रकल्पा मध्ये शेतकरी यांचेसाठी वैयक्तीक लाभाचे घटक उदा. वृक्ष लागवड, फळबाग लागवड, पॉली हाऊस, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस/शेड नेट यामध्ये फुलपीके/भाजीपाला लागवड, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, इतर कृषी आधारित उद्योग, गांडुळ खत यूनिट,नाडेप कंम्पोस्ट,सेद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट, शेततळे ,शेततळे अस्तरिकरण, विहिर, ठिबक संच, तुषार संच,पंप संच, पाईपलाईन यासाठी शेतकरी यांना अनुदान मिळते. 
                तसेच भूमीहीन कुटुंबातील व्यक्ती,विधवा,परित्यक्ता महिला, घटस्फोटीत महिला, अनुसूचित जाती / जमाती मधिल महिला शेतकरी याना बंदिस्त शेळीपालन व कुक्कुट पालन या घटकां चा लाभ मिळतो. 
               तसेच हवामान अनुकूल वाणांचे बिजोत्पादन, बियाणे प्रक्रिया उपकरणे, बियाणे सुकवणी यार्ड, बियाणे साठवण गोदाम यासाठी ही या प्रकल्पांतर्गत अर्थ सहाय्य देण्यात येते.
              या प्रकल्पातील गावांमधील अल्प/अत्यल्पभुधारक शेतकरी (2 हेक्टर पर्यंत जमीन असलेले) आणि भूमीहीन कुटुंबे यांना वैयक्तीक लाभाच्या बाबीं साठी 75 टक्के अर्थ सहाय्य देण्यात येते. तसेच 2 हेक्टर पेक्षा जास्त परंतू 5 हेक्टर पर्यंत जमीन असलेले शेतकरी यांना वैयक्तीक लाभाच्या बाबीं साठी 65 टक्के अर्थसहाय्य देण्यात येते. 
             त्याचप्रमाणे शेतमाल वृद्धिसाठी हवामान अनुकूल उदयोन्मुख मुल्य साखळ्यांचे बळकटी करण अंतर्गत बँका यांनीं मुल्यांकन केलेल्या व्यावसायिक प्रस्ताव, कृषी  अवजारे बँक यासाठी  शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी गटांना 60 टक्के अर्थ सहाय्य देण्यात येते.


सामुदायिक व वैयक्तिक लाभासाठीचे घटक 
संकेतांक 
घटक व उपघटकाचे नाव 
उपक्रम संकेतांक 
उपक्रम वर्णन 
A 2
हवामान अनुकूल कृषि पाद्दती 


A 2.1
हवामान अनुकूल आधुनिक शेती तंत्रज्ञांनाची प्रत्याशिके (शेती शाळा )
A 2.1.1
हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेती शाळा 
A 2.2
जमिनिमध्ये कर्ब ग्रहणाचे प्रमाण वाढविणे (वक्ष व फळबाग लागवड )
A 2.2.1
वक्ष लागवड (बांधावर /गटामध्ये )


A 2.2.2
फळबाग लागवड
A 2.3
क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन
A 2.3.1
सबसरफेस ड्रेनेज


A 2.3.2
भुसुधारके (Soil Amendments )


A 2.3.3
हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेती शाळा 


A 2.3.4
शेतताळे (जैवीक बांधासह इनलेट व आऊटलेट असलेली )


A 2.3.5
पाणी उपास साधने (पंप संच ) व तुषार सिंचन 
A 2.4
संरक्षित शेती 
A 2.4.1 
पोंली (GI पाईप )


A 2.4.2
शेडनेट हाऊस (बांबू  )


A 2.4.3
पोंली  हाऊस 


A 2.4.4
पोंली टनेल  


A 2.4.5
पोंली हाऊस /शेडनेट हाऊस मध्ये भाजीपाला /फूल पिकांचे लागवड साहित्य 


A 2.4.6
पोंली टनेल मध्ये  भाजीपाला /फूल पिकांचे लागवड साहित्य 
A 2.5
एकात्मिक शेती पध्दती 
A 2.5.1
बंदिस्त शेळीपालन


A 2.5.2
परस बागेतील कुक्कुटपालन 


A 2.5.3
रेशीम उद्योग 


A 2.5.4
मधु मक्षिका पालन


A 2.5.5
गोड्या पाण्यातील मस्त्या पालन


A 2.5.6
इरत कृषि आधारित उदयोग 
A 2.6
जमिनीचे आरोग्य सुधारणे 
A 2.6.1
गांडूळ खत उत्पादन युनिट, नाडेप उत्पादन युनिट


A 2.6.2
सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट 
संकेतांक 
घटक व उपघटकाचे नाव 
उपक्रम संकेतांक 
उपक्रम वर्णन 
A 3 
पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पध्दती ने वापर करण्यास प्रोत्साहन देणे 


A 3.1
क्षेत्र उपचार 
A 3.1.1 A 3.1.2
सलग समतल चर माडेल (CCT)


A 3.1.3
खोल सलग समापतळी चर (DEEP CCT )
A 3.2
ओघळी वरचे उपचार 
A 3.2.1
अनघड दगडाचे बांध 


A 3.2.2
माती नाला बांध 


A 3.2.3
सिमेट नाला बांध 


A 3.2.4
गबियन बांध 
A 3.3
नवीन पाणी साठवण संरचनाची निर्मिती 
A 3.3.1
शेततळे (इनलेट व आऊटलेट असलेले ) सामुदायिक व वैयक्तिक 


A 3.3.2
शेततळे (इनलेट व आऊटलेट  शिवाय व अस्तरीकरणासह  ) सामुदायिक व वैयक्तिक 


A 3.3.3
शेततळे अस्तरिकरन


A 3.3.4
विहीर
A 3.4
जुन्या जलसठ्याचे पुनरुजजजीवण करणे (गाळ काढणे /खोली करण /दूरस्ती )
A 3.4.1
जुन्या जलसठ्याचे पुनरुजजजीवण करणे (गाळ काढणे /खोली करण /दूरस्ती )
A 3.5
भूजल पुनर्भरण 
A 3.5.1
भूजल पुनर्भरण (विहीरीचे)
A 3.6
कृषि क्षेत्रा वरील पाणी संरक्षितता 
A 3.6.1
मूल स्थानी जलसांधरण (शेत बांघ बंदिस्ती/ ढाळीचे बांध बंदिस्ती )
A 3.7
सूष्म सिंचन पद्धती 
A 3.7.1
ठिंबक सिंचन 


A 3.7.2
तुषार  सिंचन 
A 3.8
संरक्षित सिंचन 
A 3.8.1
पाणी उपास साधने (पंप संच )  


A 3.8.2
पाईप (एचडीपि /पिव्हिसी )
हवामान अनुकूल काढणी पश्चात व्यवस्थापन व मूल्य साखळीचे बळकटिकरण


B 1
शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देणे 


B 1.1
अस्तीत्वतील FIG /FPO/FPCS यांना सहाय्य करणे
B 1.1.1
शेतकरी गट /शेतकरी उत्पादक संघ / शेतकरी उत्पादक कंपनी यांचे सशक्तीकरणकरणे 
संकेतांक 
घटक व उपघटकाचे नाव 
उपक्रम संकेतांक 
उपक्रम वर्णन 
B 1.2
भाडे तत्वावर कृषि अवजारे सेवा  केंद्राची निर्मिती करणे 
B 1.2.1 B 1.2.2
भाडे तत्वावर कृषि अवजारे सेवा  केंद्राची निर्मिती करणे -अवजारे खरेदी व शेड बांधकाम 
B 2
हवामान अनुकूल उद्योन्मूख  मूल्य -श्ंखला बळ कट करणे


B 2.1
वित्तीय संस्था /व्यावसायिक बँका यांनी मूल्यांकन केलेल्या व्यावसायिक प्रस्तावांना सहाय्य करणे ( शेतकरी गट /शेतकरी उत्पादक संघ / शेतकरी उत्पादक कंपनी)


B 3
बियाणे पुरवठा श्ंखला ची कामगिरी सुधारणे 


B 3.1
हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत व प्रमाणित बियान्यांचे बिजोत्पादन करणे 
B 3.1.1
हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत व प्रमाणित बियान्यांचे बिजोत्पादन करणे 
B 3.2
बियाणे हबसाठी पायाभूत सुविधाचा विकास करणे
B 3.2.1
बियाणे प्रक्रिया उपकरणे 


B 3.2.2
बियाणे सुकवणी यार्ड 


B 3.2.3
बियान्याची साठवण /गोदाम 


B 3.2.4
बियाणे उत्पादक शेतकर्‍यांचे प्रशीक्षन 


B 3.2.5
शासकीय बियाणे चाचणी प्रयोगशाळचे बळकटीकरण 


No comments:

Post a comment